Tag Archives | आवर्तन पवई

IMG_4058

दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

@रमेश कांबळे, प्रमोद चव्हाण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जनेत, ढोल-ताशे, बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा […]

Continue Reading 2
प्रातिनिधिक छायाचित्र

पवईत विधी शाखेच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

पवईतील हिरानंदानी येथे असणाऱ्या महाराष्ट्र नॅशनल लॉ-युनिवर्सिटीमध्ये विधी शाखेत शिकणाऱ्या सायली मेश्राम (२०) या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सायली लॉच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. पवई पोलिस तिच्या आत्महत्येमागच्या कारणाचा शोध घेत आहेत. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली आपल्या सहकारी विद्यार्थीनीसोबत हॉस्टेलमध्ये राहत होती. बुधवारी तिची मैत्रीण वैय्यक्तिक कामानिमित्त बाहेर गेली होती. […]

Continue Reading 0

पवईत महिलांसाठी मोफत नर्सिंग, ब्युटीपार्लर कोर्स डेमोचे आयोजन

आजच्या महिलांनी स्पर्धेच्या युगात स्वत:च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे; हेच लक्षात घेऊन बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, पवई यांच्यातर्फे महिला तसेच युवतींसाठी रविवारी मोफत नर्सिंग तसेच ब्युटीपार्लर कोर्स डेमो लेक्चरचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असून, इच्छुक महिला तसेच युवतींना  दिलेल्या लिंकवर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करता येणार आहे. बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, पवईचे […]

Continue Reading 0
landslide powai

पवईतील संरक्षक भिंत आणि दरडीचा प्रश्न ऐरणीवरच, पालिकेने उचलले हात

@रविराज शिंदे, रमेश कांबळे पवईतील डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार होत असून, वस्त्यांमधील संरक्षक भिंतचा प्रश्न सुद्धा येथील नागरिकांना सतावत असल्यामुळे येथे राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात २० – २५ वर्ष जुने असणाऱ्या संरक्षक भिंतीची डागडुजी करावी आणि काही भागात नवीन संरक्षक भिंत बांधण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून युथ […]

Continue Reading 0

बर्थडे पार्टी साजरी करायला गेलेल्या इसमाचा विहार तलावात बुडून मृत्यू

@रविराज शिंदे साई बांगुर्डा येथे पोहायला गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काल रविवारी विहार तलाव येथे मित्रांसोबत गेलेल्या एका ५२ वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना पवईत घडली आहे. अग्निशमन दलाच्या साहय्याने त्यांचा शोध सुरु असून, त्यांना अजूनपर्यंत यश लाभले नाही. मुंबईमध्ये मुसळधार पावसाने गेल्या तीन दिवसापासून हाहाकार माजवला आहे. […]

Continue Reading 0
devinagar kachra safai

आवर्तन पवई दणका:  देवीनगरच्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास; कचरा उचलला

पवईकरांचे आपले हक्काचे माध्यम असणाऱ्या ‘आवर्तन पवई‘चा दणका पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. आयआयटी पवई येथील देवीनगर येथे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या कित्येक वर्षापासून कचऱ्याचा पडलेला ढिगारा आवर्तन पवईच्या बातमी आणि पाठपुराव्यानंतर अखेर कालपासून पालिकेने उचलायला सुरुवात केली आहे. लवकरच संपूर्ण साफसफाई करून औषध फवारणी सुद्धा या भागात पालिकेतर्फे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईचे […]

Continue Reading 0
bike accident

मार्केट सिग्नलजवळ मुजोर बाईकस्वाराने तरुणीला उडवले; गंभीर जखमी

@अविनाश हजारे पवई गणेशनगर येथे भरधाव वेगात धावणाऱ्या मोटारसायकलने एका १९ वर्षीय तरुणाचा जीव घेतल्याची घटना ताजी असतानाच, अशाच एका भरधाव मुजोर बाईकस्वाराने तरुणीला उडवल्याची घटना आयआयटी मार्केट येथे घडली आहे. वेगाची ही झिंग फुलेनगर येथे राहणाऱ्या हिना कनोजिया (२०) या तरुणीच्या जीवावर बेतता बेतता राहिली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी सकाळी ८ […]

Continue Reading 0
Anti-narcotism-police-didi-awareness-program-in-powai-school 3

पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये ‘अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती’ आणि ‘पोलीस दीदी’

@प्रमोद चव्हाण तरुण पिढीला सध्या सहज उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांमुळे अनेक तरुण मुले-मुली त्याच्या आहारी गेल्याचे समोर येत असते. सोबतच लहान मुलांवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणे सुद्धा दिवसेंदिवस डोके वर काढत आहेत. अशावेळी आपल्या विद्यार्थ्यांना काय योग्य आणि काय अयोग्य, एक वाकडे पाऊल कुठल्या कुठे घेवून जावू शकते याची माहिती करून देण्यासोबत कायदे योग्य […]

Continue Reading 0
powai lake overflow

पवई तलाव ओसंडून वाहू लागला

  @रविराज शिंदे, सुषमा चव्हाण शनिवार, रविवार दोन दिवस मुंबईमध्ये पावसाचा तडाखा सुरू आहे. तलाव भागात पडलेल्या जोरदार पावसामुळे पवई तलाव तुडूंब भरून रविवारी वाहू लागला. पावसात भिजण्याचा आनंद आणि पिकनिक करण्यासाठी रविवारी पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तलाव भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!