बनावट पॅकर्स आणि मुव्हर्स कंपनी बनवून मुंबईकरांच्या मौल्यवान वस्तू आणि गाड्या लांबवणाऱ्या टोळीतील दोघा मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात पवई पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. पाठीमागील महिन्यात पवईतील कोस्टगार्ड अधिकाऱ्याच्या पत्नीने पतीच्या एका मित्राला मिझोरम येथे पाठवलेल्या एसयुव्ही कारसह ३३.८ हजाराला गंडा घालणाऱ्या गुन्ह्याचा तपास पवई पोलीस करत होते. विकास करणसिंग भारद्वाज (२१) आणि अमितकुमार जयप्रकाश […]
