आवर्तन पवई आणि पवईकरांच्या परिश्रमाला यश मिळाले असून, पवई तलाव भागात टाकला जाणारी डेब्रिज उचलण्यास सुरुवात झाली आहे. आवर्तन पवई सह पवईकर मुक्ताराम कांबळे, डीपीके उदास यांनी पालिकेला लेखी तक्रार करत याकडे लक्ष वेधले होते. अनेक पवईकरांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुद्दा लावून धरला होता. या सर्व प्रयत्नांना यश आले असून, फुटपाथ आणि चालण्यासाठी असणाऱ्या मार्गावरील […]
Tag Archives | कचरा
आवर्तन पवई इम्पॅक्ट: पवई तलाव भागात डेब्रिज टाकणाऱ्या विरोधात पालिका दाखल करणार फौजदारी गुन्हा
पाठीमागील काही दिवसांपासून पवई तलाव भागात अज्ञान व्यक्तींकडून बांधकाम आणि खोदकामाची डेब्रिज (मलबा) टाकला जात असून, यामुळे पवई तलावाचे भवितव्य धोक्यात येत आहे. या परिस्थितीला घेवून “आवर्तन पवई”ने ३० मे रोजी पवई तलाव भागाचा झाला “उकिरडा”, परिसरात टाकला जातोय मलबा या मथळ्याखाली बातमी करत पाठपुरावा करून पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत पालिकेने […]
पवई तलाव भागाचा झाला “उकिरडा”, परिसरात टाकला जातोय मलबा
ग्रामीण भागात घरातून निघणारा कचरा, घाण, जनावरांच्या गोठ्यातून निघणारे मैल–मुत्र टाकण्यासाठी परिसरात मोकळ्या जागेत भलामोठ्या रुंदीचा खड्डा मारून त्यात ते टाकले जाते. ज्यास ग्रामीण भाषेत “उकीरंडा” असा शब्द वापरला जातो. पवईतील पवई तलाव भागाची सुद्धा पाठीमागील काही वर्षात अशीच अवस्था झाली आहे. परिसरातील मैल, कचरा, घाणपाणी सध्या तलावात सोडले जात असून, त्याचा श्वास गुदमरू लागला […]
आवर्तन पवई दणका: देवीनगरच्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास; कचरा उचलला
पवईकरांचे आपले हक्काचे माध्यम असणाऱ्या ‘आवर्तन पवई‘चा दणका पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. आयआयटी पवई येथील देवीनगर येथे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या कित्येक वर्षापासून कचऱ्याचा पडलेला ढिगारा आवर्तन पवईच्या बातमी आणि पाठपुराव्यानंतर अखेर कालपासून पालिकेने उचलायला सुरुवात केली आहे. लवकरच संपूर्ण साफसफाई करून औषध फवारणी सुद्धा या भागात पालिकेतर्फे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईचे […]
देवीनगरकरांचा रस्ता कचऱ्यातून
प्रमोद चव्हाण, रमेश कांबळे भाजपा सरकार सत्तेत येताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतची हाक देत संपूर्ण देश कचरामुक्त करण्याचे स्वप्न पाहिले आहे. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेत याच पक्षाच्या निवडून दिलेल्या पवईच्या नगरसेवकांपर्यंत ही हाक पोहचलेली दिसत नाही. म्हणूनच की काय येथील देवीनगर भागात जाणाऱ्या लोकांच्या मार्गावर अंथरलेली कचऱ्याची चादर उचलण्याचा त्यांना विसर पडला आहे. […]
खोद्कामाने अडवला चैतन्यनगरकरांचा रस्ता, नागरिक त्रस्त
आयआयटी पवई येथील चैतन्यनगर भागात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम संपले नाही की, मलनिसारण वाहिनी टाकण्याच्या कामासाठी पुन्हा खोदकाम केल्याने येथील नागरिकांचा येण्या-जाण्याचा रस्ताच बंद झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत स्थानिक प्रतिनिधीना तक्रार करूनही ते याकडे काना डोळा करत असल्याचा आरोपही येथील नागरिक करत आहेत. जवळपास फेब्रुवारी महिन्यापासून गटार साफसफाई, पाण्याची पाईपलाईन टाकणे आणि मलनिसारण […]
चैतन्यनगरमधील कचऱ्याच्या प्रश्नामुळे नागरिक त्रस्त
नगसेवकांचे पालिकेकडे अंगुली दर्शन, तर नगरसेवकांनीच कचरा उचलण्यास मनाई केली असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे. रमेश कांबळे पवई, आयआयटी येथील चैतन्यनगर येथे गेले महिनाभर रस्त्यावर गटाराच्या शेजारी पडलेल्या कचऱ्याच्या ढिगामधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, या भागात निवडून दिलेले आणि नामनिर्देशित असे दोन नगरसेवक असून सुद्धा नागरिकांचा प्रश्न मिटताना दिसत नाही. विशेष म्हणजे नगरसेवकांनीच […]