पावसाच्या हजेरीत मुंबईत पडलेल्या खड्डयांमुळे एकंदरीत पालिका कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर ऍक्शन मोडवर असलेल्या पालिका आयुक्तांच्या निर्देशाला सहाय्यक अभियंत्यांनीच उघड्यावर सोडल्याचे चित्र समोर आले आहे. पवईतील आयआयटी भागात पडलेल्या खड्यांवर पालिकेने वेस्ट मटेरियल टाकून खड्डे भरण्याची अजब युक्ती लढवत लोकांच्या जीवाशी खेळ केला आहे. मुंबईत पाठीमागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी […]
Tag Archives | खड्डे
जेविएलआरवर सर्विस रोडला खड्डे
सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जेविएलआरवर (आदि शंकराचार्य मार्ग) नुकतेच दुरुस्तीचे काम केलेल्या सर्विस रोडला पुन्हा खड्डे पडले आहेत. ट्रिनीटी चर्च ते गांधीनगर उड्डाण पूल भागात हे खड्डे पडले आहेत. स्थानिक नागरिक जॉली मोरे यांनी यासंदर्भात पालिकेला तक्रार केली होती. जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड हा पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे. या मार्गावरून […]
जेव्हीएलआरवरील खड्यामुळे अपघात घडून मोटारसायकल चालक जखमी
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर खड्यात अडकून एक मुंबईकर गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पवई परिसरात घडली. प्रसाद मेस्त्री असे जखमी मुंबईकराचे नाव असून, त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रशासनाकडे आपली ही व्यथा मांडली आहे. या संदर्भात महानगरपालिका एस विभागाने उत्तर देताना आम्ही संबंधित विभागाला आपली तक्रार देवू असे उत्तर दिले. पावसाळा आणि रोडवरील खड्डे हे गणित मुंबईकरांना काही […]
याचे श्रेय आता कोण घेणार? – पवईकर
पवईतील हिरानंदानी – पवई विहार रोडला जोडणाऱ्या विजय विहार रोडच्या दुरुस्तीनंतर याचे श्रेय घेण्यासाठी पोस्टर, बॅनर आणि सोशल माध्यमातून लोकप्रतिनिधींमध्ये चांगलाच श्रेयवाद रंगला होता. मात्र, या श्रेयवादाला आठवडा उलटायच्या आधीच विजय विहार रोडवर पुन्हा खड्डे पडायला सुरुवात झाली. पावसाळ्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसानेच या रस्त्याची दुर्दशा करत रस्त्यावर खड्डे कि खड्यात रस्ते अशी याची अवस्था केली. […]
विजय विहार रोडवरून पवईत श्रेयवाद
पवईतील विजय विहार रोडवर सध्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असून, हा रस्ता आम्हीच दुरुस्त केला असल्याचा श्रेयवाद सध्या स्थानिक आमदार आरिफ नसीम खान आणि स्विकृत नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांच्यात रंगला आहे. दोघांनीही हे काम आमच्याच प्रयत्नातून आणि फंडातून केला जात असल्याचा दावा केला आहे. श्रेयवादात यांचे कार्यकर्ते सुद्धा उतरले असून, सोशल […]
नवनिर्मित विजय विहार रोडला खड्डे
पावसाळ्यात पालिकेने बनवलेल्या रस्त्यांवर खड्डे पडणे मुंबईकरांसाठी नवीन नाही आहे, मात्र पाऊस नसतानासुद्धा नुकत्याच दुरुस्तीचे काम केलेल्या विजय विहार रस्त्याला खड्डे पडल्याचा प्रकार घडला आहे. येथील विजय विहार ते पवई विहार जोडणाऱ्या रस्त्याला महिना भराच्या आतच खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी आमदार नसीम खान यांच्या प्रयत्नाने महानगर पालिकेच्यावतीने या रोडच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र […]
खड्डेमय पवईची वाहतूक पोलिसांकडून डागडुजी
@ रविराज शिंदे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला वाहतूक कोंडीने ग्रासले असतानाच या मार्गावर असणाऱ्या खड्यांनी त्यात आणखी भर घातली होती. एमएमआरडीए, पालिका व स्थानिक प्रतिनिधी यांना तक्रारी जावून सुद्धा त्यांनी याकडे कानाडोळा केल्याने अखेर गुरुवारी पावसाच्या उघडीपीची संधी साधत साकीनाका वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम केले. या कार्यातून त्यांनी स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनाला […]