चांदिवली येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या ‘नवोदित चांदिवली श्री २०१९ किताब चेंबूर येथील मसल इंजिनिअर्स व्यायाम शाळेच्या विनायक लोखंडे यांनी आपल्या नावे केला आहे. मुंबईतील विविध भागातून स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. चांदीवली, पवईच्या इतिहासात प्रथमच एक आगळी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली, ती म्हणजे ‘नवोदित चांदीवली श्री’ शरीर सौष्ठव स्पर्धा २०१९. महाराष्ट्र नवनिर्माण […]
Tag Archives | चांदिवली
डेबिट कार्ड क्लोनिंगद्वारे पवईकराचे १.५ लाख सायबर चोरट्याने पळवले
४२ वर्षीय पवईकराच्या खात्यातील १ लाख ५ हजार रुपयांवर कार्ड क्लोनिगच्या माध्यमातून सायबर चोरट्याने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार पवईमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिस अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन अधिक तपास करत आहेत. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले नगर येथे राहणारे राम शर्मा (४२) हे सुतारकाम करतात. त्यांचे इंडीयन बँकेच्या भांडूप […]
चांदिवली मर्डर केस: संपत्तीच्या वादातून भावानेच केली भावाची हत्या; आरोपी भावाला अटक
चांदिवली संघर्षनगर येथील एका खोलीच्या वादातून आपल्याच मावस भावाचा खून करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. राहुल शहा (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी भावाचे नाव आहे. साकीनाका येथील चांदिवली फार्म रोडकडून संघर्षनगरकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या एमसीजीएम पार्क जमीन भागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत कोपऱ्यात पडल्याचा […]
एस एम शेट्टी रोडच्या कामाची सुरुवात, वाहतूक वळवली
शिवभगतानी मार्गे चांदिवली आणि हिरानंदानीला जोडणाऱ्या एसएमशेट्टी शाळा मार्गावर बुधवारी, १३ तारखेपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील २० ते २५ दिवस हे काम चालणार असून, या मार्गाने चांदिवलीकडे जाणारी वाहतूक म्हाडा, प्रथमेश कॉम्प्लेक्स मार्गे वळवण्यात आली आहे. या मार्गावरून चालणाऱ्या बेस्ट बसेस क्रमांक ३५९ (लिमिटेड) आणि ४०९ (लिमिटेड) यांच्या मार्गात सुद्धा बदल करण्यात आला […]
पवईत भगवा फडकला – चांदिवलीतून दिलीप लांडे तर विक्रोळीतून सुनील राऊत विजयी
महाराष्ट्र राज्य विधानसभा २०१९ निवडणुकीचे निकाल गुरुवारी २४ ऑक्टोबरला घोषित करण्यात आले असून, पवईत शिवसेनेच्या उमेदवारांना पवईकरांनी पसंती दर्शवली आहे. चांदिवली मतदार संघातून दिलीप भाऊसाहेब लांडे तर विक्रोळी मतदार संघातून सुनील राऊत याना पवईकरांनी पसंती दर्शवत निवडून दिले आहे. विक्रोळी विधानसभेची निवडणूक एकतर्फी झाल्याप्रमाणे राऊत यांच्या झोळीत आली. मात्र चांदिवली विधानसभेत गेल्या २ दशकापासून आमदार […]
खड्यात ट्रेलर फसल्याने ९ तास जेव्हीएलआर ठप्प, चाकरमान्यांचे हाल
@रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर मिलिंदनगरजवळ बुधवारी एक भलामोठा ट्रेलर खड्यात चिखलात अडकल्याने तब्बल ९ तास जेव्हीएलआरवरील वाहतूक ठप्प झाली. या घटनेमुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र हाल झाल्याचे पहायला मिळाले. बुधवारी सकाळी ६ वाजता मेट्रोच्या कामासाठी लागणारे टीबीएम मशिन घेवून एक ट्रेलर सिप्झच्या दिशेला जात होता. पाठीमागील काही दिवसात सतत पावसाची […]
लेकहोममध्ये पुन्हा आग, ३ गंभीर जखमी
चांदिवली येथील लेकहोम कॉम्प्लेक्समधील लेक फ्लोरेन्स इमारतीच्या ‘बी’ विंगमधील १३व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना आज (मंगळवार) संध्याकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या साहय्याने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र आगीची माहिती मिळाल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांमध्ये धावपळ सुरु झाल्याने घसरून पडून आणि धूर शरीरात गेल्याने श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ११ जणांना हिरानंदानी रुग्णालयात […]
वाहतूक कोंडीचा ‘महामार्ग’; जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर गर्दीच्या काळात व्यावसायिक तीन चाकी वाहनांना बंदी
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेव्हीएलआर) वाहतुक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रयोगाच्या निमित्ताने सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या काळात जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड वापरण्यास हलक्या व मध्यम व्यावसायिक तीन चाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे आणि या मार्गावरून चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे जेव्हीएलआरच्या दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत […]
सात दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
माझा बाप्पा भाग ५
माझा बाप्पा भाग ४
माझा बाप्पा भाग ३
युवा पर्यावरण प्रेमींनी बनवला इको गणेशा, यंग एन्वायरमेंटलिस्ट्स ट्रस्टचा उपक्रम
गणेशोत्सवाची सगळीकडे धूमधाम सुरु आहे. या उत्सवादरम्यान पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणून मिठी नदी आणि पवई लेकच्या मातीपासून शेकडो पर्यावरण प्रेमी तरुणांनी लोकांनी पर्यावरणपूरक गणेशाची निर्मिती केली. यंग एन्वायरमेंटलिस्ट्स प्रोग्राम ट्रस्टने यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. गणेशोत्सवात होणारी निसर्गाची हानी टाळण्यासाठी निसर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या यंग इन्वायरमेंटच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘इको फ्रेंडली’ गणेशाची कार्यशाळा […]
माझा बाप्पा भाग २
दिड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जणेत, ढोल-ताशे आणि बॅंजोच्या निनादासह आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात दिड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपती बाप्पाचे मंगळवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. सोमवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दिड दिवस पाहूणचार घेतल्यानंतर मंगळवारी […]
संघर्षनगरकरांचा संघर्ष संपणार, नागरी सुविधांसाठी पालिकेकडून ८० कोटीची मंजूरी?
पाठीमागील १२ वर्षापासून नागरी सुविधांपासून वंचित असणाऱ्या चांदिवली येथील संघर्षनगरकरांना आता दिलासा मिळणार असल्याचे दिसत आहे. मंगळवारी स्थानिक नगरसेविका, शिवसेना पदाधिकारी, मुंबई महापौर आणि पालिका आयुक्त यांच्यात झालेल्या संयुक्त चर्चेत या परिसरातील नागरी सुविधांसाठी पालिकेतर्फे ८० कोटीचा फंड मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार ऍड अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे […]
पॅसेंजर म्हणून प्रवास करून पवईत रिक्षावाल्यांना लुटणारी टोळी गजाआड
पवई, साकीनाका भागात रात्रीच्या वेळी रिक्षात प्रवास करून रिक्षाचालकांना लुटणाऱ्या टोळीतील दोघांच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर त्यांच्या अजून एका साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. इम्रान पिरमोहम्मद शेख (वय २१ वर्षे), शिवम उर्फ गुड्डू ब्रम्हदेव झा (वय २० वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पाहिजे आरोपी युनुस उर्फ शेरू जावेदअली सैयद याचा […]
स्पॉटेड: अभिषेक बच्चन, अनुराग बासू यांच्या आगामी चित्रपटाचे चांदिवली येथे शूटिंग करताना
अनुराग बासू यांच्या दिग्दर्शनाचे, ज्याचे शीर्षक अजून नक्की करण्यात आलेले नाही, याच्या शुटींग दरम्यान आवर्तन पवईने अभिनेता अभिषेक बच्चन याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. अनुराग बासू यांच्या मल्टीस्टारर चित्रपटाचे शुटींग सध्या विविध ठिकाणी सुरु आहे. याच सिनेमाच्या एका भागाच्या शुटींगसाठी बुधवारी “जुनिअर बि” चांदिवली स्टुडीओमध्ये आला होता. अनुराग बासू यांच्या २००७ च्या लाइफ इन ए… […]
संघर्षनगरमध्ये सांडपाण्यात धुतल्या जातात भाज्या; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
संघर्षनगरमधील लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भाजीवाल्याला मनसेने शिकवला धडा चांदिवली, संघर्षनगर येथे गटाराच्या पाण्यात भाज्या धुवून त्या विक्रीस ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला आहे. येथील एका भाजीवाल्याचा लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा जीवघेणा प्रकार मनसे सैनिकांनी उघडकीस आणला आहे. संघर्षनगर येथील इमारत क्रमांक ११ येथे भाजी विक्री करणारा एक भाजी विक्रेता गटारात जाणाऱ्या सांडपाण्यात भाज्या […]
मुसळधार : पवई, चांदिवली भागात काय घडले?
विहार तलाव भरला मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत असलेला विहार तलाव बुधवारी रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी पूर्ण भरून वाहू लागला असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. मुंबई, ठाणे भागात दमदार पाऊस होत असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव भरून वाहू लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात […]