स्पॉटेड: अभिषेक बच्चन, अनुराग बासू यांच्या आगामी चित्रपटाचे चांदिवली येथे शूटिंग करताना

अनुराग बासू यांच्या दिग्दर्शनाचे, ज्याचे शीर्षक अजून नक्की करण्यात आलेले नाही, याच्या शुटींग दरम्यान आवर्तन पवईने अभिनेता अभिषेक बच्चन याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

अनुराग बासू यांच्या मल्टीस्टारर चित्रपटाचे शुटींग सध्या विविध ठिकाणी सुरु आहे. याच सिनेमाच्या एका भागाच्या शुटींगसाठी बुधवारी “जुनिअर बि” चांदिवली स्टुडीओमध्ये आला होता.

अनुराग बासू यांच्या २००७ च्या लाइफ इन ए… मेट्रोच्या धर्तीवर त्यांच्या आगामी चित्रपटाचे काम सुरु असल्याचे म्हटले जात होते, मात्र हा त्याचा सिक्वेल नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अभिषेक बच्चन चित्रपटातील एक्शन सिन करताना

बासू यांचा आगामी चित्रपट एक एक्शन कॉमेडी फिल्म असून, अभिषेक बच्चन सोबतच आदित्य रॉय कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा लीड रोलमध्ये असणार आहेत.

अभिषेक बच्चन या चित्रपटात जीन्स आणि शर्ट या लुकमध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. चांदिवली स्टुडीओ येथे या चित्रपटातील एक एक्शन सिन बुधवारी शूट केला जात होता. यावेळी अभिषेक सेटवर हातात कलर करण्याचा ब्रश घेवून कृमेंबर्स सोबत मस्ती करत आपल्या कामाचा आनंद घेताना आढळून आला.

छायाचित्रे: प्रमोद चव्हाण

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d