जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने मुंबईतही प्रवेश केला आहे. या कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी आता शासनासह पालिकेने सुद्धा कंबर कसली आहे. यानुसारच ३ एप्रिल पर्यंत पवईतील ३ विविध परिसरांना सिल करण्यात आले आहे. जर पवईकर नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येणे बंद नाही केले तर पवईतील अजूनही काही परिसर सिल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यकता […]
Tag Archives | जनजागृती
मीच माझा रक्षक: पवईतील तरुणाची अनोख्या पद्दतीने कोरोनाबद्दल जनजागृती
@प्रतिक कांबळे – दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव बघता महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनात जनजागृतीसाठी पवईतील समाजसेवक विलास कुशेर यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी पवई परिसरातील प्रमुख दोन रस्त्यांवर ‘गो कोरोना’ आणि ‘मीच माझा रक्षक’ असा संदेश लिहीत लोकांमध्ये याबाबत जनजागृती केली आहे. ‘महाराष्ट्र शासनाने लॉकआउटचा निर्णय घेत नागरिकांना घरी बसण्याच्या सूचना केल्या […]
एड्स जनजागृतीसाठी हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये वादविवाद स्पर्धेचे आयोजन
१ डिसेंबर रोजी जगभरात साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक एड्स दिनानिमित्त विविध जागरूकता उपक्रम राबविण्यात आले. परंतु पवई येथील डॉ. एल एच हिरानंदानी रुग्णालयाने जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नात एक पाऊल पुढे टाकले. ‘एचआयव्ही/ एड्स साथीची समाप्ती’ या विषयावर शालेय मुलांची वादविवाद स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये मुंबई शहरातील अनेक शाळांनी सहभाग घेतला. पवईतील पोद्दार इंटरनॅशनल […]
“खिसेकापू, चोरांपासून सावधान” पवई पोलिसांची पोस्टर जनजागृती
सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी बसमधे, ट्रेनमध्ये चढणाऱ्या लोकांची पाकिटे, मोबाईल, किंमती सामान लांबवणाऱ्या टोळ्या संपूर्ण मुंबईभर धुडगूस घालत आहेत. पवई, साकीनाका भागात गेल्या महिनाभरात अशा प्रकारच्या ७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांना आळा बसावा आणि मुंबईकरांच्यात जनजागृतीसाठी पवई पोलीस ठाण्याच्यावतीने पवईतील गर्दीच्या आणि प्रमुख बस थांब्यांवर “खिसेकापू, मोबाईल चोरांपासून सावधान” असा इशारा देणारे […]
नशाखोरी रोखण्यासाठी पवईकर एकवटले
पवई भागात वाढत्या नशाखोरीला आळा घालता यावा आणि या समस्येला परिसरातून पूर्ण नष्ट करता यावे म्हणून पवईकर एकत्रित आले आहेत. बुधवारी, ४ जानेवारी रोजी संध्याकाळी ८ वाजता या समस्येवर चर्चा करण्यासाठी सर्व पक्ष आणि संघटनांनी एकत्रित येवून, पवई पोलिसांसोबत चैतन्यनगर येथे याबाबत एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. तर पोलिसांनी यावर […]
आज पवईत गर्दुल्यांच्या विरोधात पोलिसांचे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
पवईत गांजा, ड्रग्स, मद्यप्राशन करून सामान्य नागरिकांना त्रास देणारी टोळी सक्रीय झाली आहे. या टोळीने संपूर्ण पवईला हैराण केले आहे. यांच्या विरोधात नागरिक आणि पोलीस सहकार्याने कसा आळा बसेल या विषयाला घेवून आज दुर्गादेवी शर्मा उद्यान, आयआयटी पवई येथे संध्याकाळी ८ वाजता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई […]