Tag Archives | पर्यावरणाचा ऱ्हास

Nishedh copy

पार्कसाईटमधील उद्यान वाचविण्यासाठी जनता एकवटणार, काळे झेंडे दाखवून करणार विरोध

​​रविराज शिंदे पार्कसाईट येथील ४० वर्ष जुन्या सुभेदार रामजी मालोजी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकी पाठीमागे स्थानिक नगरसेवकाचा हे उद्यान हडपण्याचा डाव आहे, असा आरोप करीत स्थानिक व आंबेडकरी जनता उद्यान वाचवण्यासाठी या विरोधात एकवटली आहे. रविवारी १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उद्घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून जनता याला विरोध दर्शवणार आहे. पार्कसाईट येथे महानगरपालिकेचे ४० […]

Continue Reading 0
cyclothon web

पर्यावरण रक्षणासाठी पवईकर सायकलवर

पर्यावरण रक्षणासाठी यंग इन्वायरमेंटलिस्ट ट्रस्टच्या वतीने रविवारी हिरानंदानी येथे आयोजित सायक्लोथॉनमध्ये अबाल वृद्धांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. मुंबईचे डब्बेवाले, सायकलवर कर्तब करणारे, शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला आणि विविध संस्थांच्या मुलांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत प्रदूषण आणि वाहन विरहीत रविवारचा आनंद लुटला. त्यावेळी टिपलेली काही छायाचित्रे.  

Continue Reading 0
OLYMPUS DIGITAL CAMERA

पवई सायक्लोथॉनमध्ये मुंबईचे डब्बेवाले

ऊन, वारा, पाऊस काहीही असो सायकलवरून प्रवास करत वेळेच्या आत चाकरमान्यांना त्यांचा डब्बा पोहचवणारे आणि जगात मँनेजमेंट गुरु म्हणून स्थान असणारे मुंबईचे डब्बेवाले, पर्यावरण संरक्षणाच्या मुद्यावर पुढे सरसावत रविवारी १३ डिसेंबरला (उद्या) होणाऱ्या पवईच्या पहिल्या वहिल्या सायक्लोथॉनमध्ये विद्यार्थी, सायकल प्रेमी, मान्यवर, ज्येष्ठ नागरिकांसोबत शामिल होणार आहेत. हिरानंदानीच्या डोंगर, हिरवळीतून बनलेल्या रस्त्यातून आपल्या सायकलवर हे डब्बेवाले […]

Continue Reading 0
Advertiement for Cyclothon by Young Environmentalists

१३ डिसेंबरला पवईत सायक्लोथॉनचे आयोजन

मुलांना शाळेत, महाविद्यालयात जाताना सायकलचा वापर करण्यासाठी यंग इन्वायरमेंटलिस्टचे आवाहन वाहनाच्या बाहेर पडणाऱ्या धुरातून वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बन पसरल्याने वायूप्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याबरोबरच एक उत्तम आरोग्य मिळावे म्हणून पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी काम करणाऱ्या यंग इन्वायरमेंटलिस्ट ट्रुस्टच्या वतीने लोकांनी सायकल संस्कृती जपावी म्हणून सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे. १३ डिसेंबरला हिरानंदानीमधील हेरीटेज […]

Continue Reading 0
tree

आम्ही समाज हितासाठीच छाटले झाड – बौद्ध विकास मंडळ

रमाबाई आंबेडकरनगर येथील चंद्रमणी बुद्ध विहाराच्या समोरील पिंपळाच्या झाडाचे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारिप बहुजन महासंघ व धम्मदीप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशन तर्फे हे झाड धनदांडगे आणि चिरीमिरीच्या लोभापायी काही समाजकंठ्कांनी तोडल्याचा आरोप केला जात असतानाच या बुद्द विहाराची व्यवस्था पाहणाऱ्या बौद्ध विकास मंडळाच्या वतीने आम्ही समाजासाठी येथे एक छत उभे करत असून त्यासाठी […]

Continue Reading 1
tree

पिंपळाच्या झाडाची पालिकेच्या संगनमताने कत्तल, संतप्त पवईकरांचा आंदोलनाचा इशारा

रविराज शिंदे आयआयटी: निसर्ग संवर्धनाच्या नावावर करोडो रुपये खर्च करणाऱ्या महानगरपालिकेतर्फे आयआयटी रमाबाई आंबेडकरनगर येथील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याऐवजी, बांधकामास अडसर निर्माण करणारे पिंपळाचे झाड छाटण्याचे काम केल्याने स्थानिक आक्रमक झाले असून, त्यांनी पालिका अधिकारी आणि झाडांची कत्तल करणाऱ्या धनदांडग्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा पोलीस, महापौर आणि पालिका आयुक्तांना पत्र लिहून दिला […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!