“परिसरातील पाण्याच्या समस्येचा पाठपुरावा मी शिवसेना शाखाप्रमुख या नात्याने गेली अनेक महिने करत आहे. या संपूर्ण मंजुऱ्या या शिवसेनेच्या पाठपुराव्यातून झालेल्या आहेत आणि याचे संपूर्ण श्रेय हे शिवसेनेचेच आहे. याचे श्रेय लाटू इच्छिणाऱ्यांनी पाठपुराव्याचे पुरावे द्यावेत” – निलेश साळुंखे – शाखाप्रमुख ११५. “शाखाप्रमुख हे मंजुरीच्या स्तरावर असणाऱ्या प्रकल्पांची माहिती मिळवून पत्रव्यवहार करून नेहमीच श्रेय लाटण्याचा […]
Tag Archives | पवई तलाव
शुक्रवारी व शनिवारी पवई तलावावर मगर दर्शन
पवई तलाव भागात मॉर्निंग वॉकला येणारे, सकाळी कामावर जाणारे आणि पर्यटक अशा सर्वांना पवई तलावाच्या भागात जवळपास ८ फुटी मगरीचे दर्शन घडल्याने, शुक्रवारची सकाळ ही पवईकर आणि येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मगर दर्शन घडवणारी सकाळ ठरली. काही वेळाने तलावातील गाळ काढण्याचे काम करणारे यंत्र जवळ येताच मात्र ही मगर पुन्हा पाण्यात परतल्याने, याची खबर लागल्यावर उशिरा […]
पवईकरांच्या समस्या आता कार्टून बॅनरच्या माध्यमातून
अनेक वर्ष समस्यांशी लढणाऱ्या पवईकरांनी पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेट, आंदोलन, लोकप्रतिनिधींसाठी बनवलेली माध्यमे अशा अनेक प्रकारे आपल्या समस्या लोकप्रतिनिधीं समोर मांडल्या आहेत, परंतु त्याचे निवारण सोडा, साधे उत्तर सुद्धा लोकप्रतिनिधींकडून मिळत नाही आहे. म्हणूनच लोकप्रतिनिधींना आपल्या समस्या समजावून देण्यासाठी स्थानिक जनतेने आता लोकप्रतिनिधी वापरात असलेल्या बॅनरबाजी या माध्यमाचाच वापर केला आहे. मात्र या बॅनरवर अक्षरातून नव्हे तर […]
पवई प्रेसवर पवईकरांच्या वतीने नगरसेवकांना दहा प्रश्न
महानगरपालिका निवडणूका आता काही महिन्यांवर आल्या आहेत. अशात सध्याचे नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नांवर काय काम केले? कोणत्या समस्यांचे निवारण केले? याचा लेखाजोखा समोर यावा म्हणून, पवईकरांचे प्रतिनिधित्व करत रिपब्लिकन पक्षाचे वार्ड क्रमांक ११५ चे अध्यक्ष विनोद लिपचा यांनी ‘पवई प्रेस’च्या माध्यमातून स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांना दहा प्रश्न विचारले आहेत. ज्याची उत्तरे त्यांनी स्वतः किंवा आपल्या […]
पवई तलावावर मगरींसोबत आता अजगरांचेही साम्राज्य
पवई तलाव भागात आता मगरीं सोबतच विविध जातीच्या साप आणि अजगरांचे साम्राज्य उभे होत आहे. गेल्या महिनाभरात पवई तलाव भागात किनाऱ्यावर अनेक मोठमोठाले अजगर रोडवर अथवा पदपथावर येऊ लागल्याने आता या भागात यांचे पण साम्राज्य असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र पवई तलाव भागात स्वच्छता मोहिम चालू असल्याने आता या अजगरांना लपण्यास जागा न उरल्याने ते […]
प्राणी मित्र सुनिष सुब्रमण्यम कुंजू यांना ‘बिल्ड इंडिया’ पुरस्कार प्रदान
प्राणी हक्क कार्यकर्ता आणि प्लॅण्ट अॅण्ड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी – मुंबई व एनव्हीरो केअर वेलफेयर सोसायटीचे संस्थापक मा. श्री. सुनिष सुब्रमण्यनम कुंजू यांना नवी दिल्ली येथे आयोजित एकविसाव्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक समारोह २०१५ मध्ये ‘बिल्ड इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, भरात देशाला विविध क्षेत्रात […]
पवई तलाव स्वच्छता मोहिमेला अखेर सुरुवात
स्थानिक आणि पर्यावरण प्रेमींनी कडक विरोध दर्शवला असतानाही, अखेर पवई तलाव स्वच्छता मोहिमेला सुरुवात झालेली आहे पवई तलावाची दिवसेंदिवस होत चाललेली दुर्दशा सावरण्याचा खटाटोप करणाऱ्या पालिका प्रशासनाने अखेर त्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. ७.१५ करोड खर्च करून पवई तलाव स्वच्छता आणि ५ वर्ष त्याच्या देखभालीचे काम किंजल कंस्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले असून, तलाव […]
आजपासून ३ दिवस पवई उद्यान व तलाव भागात थांबण्यास बंदी
आजपासून तीन दिवस, म्हणजेच २५, २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी पवई तलाव आणि उद्यान परिसरात पर्यटक आणि नागरिक यांना संध्याकाळी ५ नंतर थांबण्यास मनाई करण्यात आलेली आहे. शरद पोर्णिमाचे (कोजागरी पोर्णिमा) निमित्त साधत ही बंदी महापालिकेतर्फे घालण्यात आलेली आहे. पवई तलाव आणि परिसर हे पूर्व उपनगरातील पर्यटन स्थळांपैकी सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणून मानले जाते. रविवारी […]
पवई तलाव स्वच्छता मोहिमेला स्थानिकांचा विरोध, महापालिकेचा नवा ‘फंडा’ संशयाचा भोवर्यात
पवई / अविनाश हजारे पवई तलाव आणि परिसर सुशोभिकरणासाठी आजवर जवळपास १०० करोड रुपये खर्च केल्यानंतरही, ‘जैसे थे’ असणाऱ्या परिस्थितीला सावरण्यासाठी, सांडपाणी, कचरा, टाकाऊ पदार्थामुळे प्रदूषित झालेला पवई तलाव पुन्हा एकदा चकाचक करण्याची योजना महापालिकेने हाती घेतली आहे. यासाठी ७.१५ करोड रुपये खर्च ही मंजूर करण्यात आलेला आहे. हा सगळा खटाटोप आपले खिसे भरण्यासाठी तर […]
पवईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा
“हिरानंदानीचा राजा” – तेजस्विनी महिला सेवा संस्था आणि हिरानंदानी ग्रुपच्या वतीने संस्कृती जपण्याचे काम या गणेशोत्सवाच्या निमित्ताने केले गेले आहे. देखाव्यातून दुर्ग-किल्ले यांची महाराष्ट्राला लाभलेली अद्वितीय संपदा दाखवण्याचा प्रयत्न व त्यांची जपणूक याबद्दल संदेश दिला गेला आहे. किल्यामध्ये विराजमान असणाऱ्या बाप्पारुपी राजाच्या सेवेत असणारा मूषक वाद्यवृंद खूप उत्तमरित्या सादर केला आहे. “पवईचा सम्राट” – स्टार […]
गौरी-गणपती विसर्जन
प्रमोद चव्हाण
बाप्पा पावला; पावसाची दमदार हजेरी, झाडे उन्मळून पडली
मुंबईमध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाट आणि वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे हवेत बराच गारवा निर्माण झाला होता. पवई भागात वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ईडन इमारत परिसरात उभे असणारे एक झाड उन्मळून पडले. लागूनच असणाऱ्या सुरक्षा भिंतीवर हे झाड पडल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारचे मोठे नुकसान झाले नाही. पावसाने दडी मारल्याने राज्यावर दुष्काळाचा डोंगर […]
माझा बाप्पा
दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गर्जनेत, ढोल-ताशे, डीजे व बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा पाहुणचार घेतल्यानंतर शुक्रवारी […]
पवई तलावाची बत्ती गुल, प्रशासन कुंभकरणाच्या झोपेत
पवईची वाढती लोकप्रियता आणि पर्यटन स्थळ म्हणून मुंबईकरांचा ओढा पाहता मरीन ड्राईव्ह येथील क्वीन नेक्लेसच्या धर्तीवर करोडो रुपये खर्च करून पवई तलाव परिसरात सुशोभिकरण करण्यात आले आहे, परंतु जवळपास एक महिन्यापासून या सुशोभिकरण करण्यात आलेल्या परिसरात बनवलेल्या पदपथावरील दिवेच बंद पडलेले आहेत. त्यामुळे पवईच्या राणीचा नेकलेस चोरीला गेली कि काय असा प्रश्न आता मुंबईकरांना पडलेला […]