एक रुपया देण्याचे आमिष दाखवून, पवईमधील फुलेनगर भागात राहणाऱ्या एका ५४ वर्षीय क्रूरकर्म्याने, आपल्या शेजारी राहणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी घडली आहे. या प्रकरणी क्रूरकर्म करणारा अशोक चाळके यास पवई पोलिसांनी अटक केली असून, वैद्यकीय तपासणी करून उद्या न्यायालयात सादर केले जाणार आहे. पिडीत मुलगी ही आपल्या आई वडिलांसह आयआयटी येथील […]
Tag Archives | पवई पोलिस
हिरानंदानीत सायप्रेस, डॅफोडिल मार्केटला पालिकेचा दणका, बेकायदा बांधकामावर कारवाई
बुधवारी सकाळी महानगरपालिका ‘एस’ विभागाच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने कडक पोलीस बंदोबस्तात हिरानंदानी येथील सायप्रेस, डैफोडिल मार्केटमध्ये फुटपाथ भागात थाटण्यात आलेल्या दुकानावर आणि बेकायदा बांधकामांवर बुल्डोजरसह कारवाई करत हिरानंदानीकरांना नववर्षाची भेट दिली. यावेळी अनेक स्थानिक नागरिकांनी पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईसाठी धन्यवाद देत अभिनंदन केले. हिरानंदानीमधील शॉपिंग प्लाझा आणि मार्केट्समध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून लोकांनी फुटपाथवर […]
हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पडून चिमुरडी जखमी, मृत्यूशी देतेय झुंज
पवईतील एका नामांकित हॉटेलमध्ये साडेसहा वर्षाची चिमुरडी शुक्रवारी स्विमिंग पूलमध्ये पडून गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या हिरानंदानी रुग्णालयात उपचार चालू असून, ती अत्यावस्थेत असल्याबद्दल बोलले जात आहे. याबाबत नातेवाईकांनी हॉटेल प्रशासन विरोधात कोणत्याही प्रकरचा गुन्हा दाखल केला नसून, आम्ही अधिक तपास करत असल्याचे पवई पोलिसांनी सांगितले. मध्यप्रदेशची असणारी आस्था रमानी ही एका नातेवाईकाच्या लग्नासाठी […]
आंदोलन झाले, अटक झाली, कोर्ट कचेरी सुद्धा झाली, पण मुतारी मात्र अजून नाही झाली
लोकप्रतिनिधींच्या भूलथापांना न भूलता पवईकर व सर्वपक्षीय कार्यकर्ते लवकरच पूर्वीपेक्षाही मोठ्या आंदोलनाच्या तयारीत जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील पवई उद्यान ते गांधीनगर या पट्यात सार्वजनिक मुतारी बनवण्यासाठी स्थानिक भागातील नागरिक व सर्वपक्षित कार्यकर्त्यांनी मिळून १६ मार्च २०१५ रोजी आयआयटी मेनगेट येथील फुटपाथावर पत्र्याचे सार्वजनिक स्वच्छतागृह उभारून शांततेत मुतारी बनाव आंदोलन केले होते. मात्र त्याकाळात जमावबंदीचे आदेश असल्याने, […]
आम्ही समाज हितासाठीच छाटले झाड – बौद्ध विकास मंडळ
रमाबाई आंबेडकरनगर येथील चंद्रमणी बुद्ध विहाराच्या समोरील पिंपळाच्या झाडाचे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारिप बहुजन महासंघ व धम्मदीप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशन तर्फे हे झाड धनदांडगे आणि चिरीमिरीच्या लोभापायी काही समाजकंठ्कांनी तोडल्याचा आरोप केला जात असतानाच या बुद्द विहाराची व्यवस्था पाहणाऱ्या बौद्ध विकास मंडळाच्या वतीने आम्ही समाजासाठी येथे एक छत उभे करत असून त्यासाठी […]
पिंपळाच्या झाडाची पालिकेच्या संगनमताने कत्तल, संतप्त पवईकरांचा आंदोलनाचा इशारा
रविराज शिंदे आयआयटी: निसर्ग संवर्धनाच्या नावावर करोडो रुपये खर्च करणाऱ्या महानगरपालिकेतर्फे आयआयटी रमाबाई आंबेडकरनगर येथील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याऐवजी, बांधकामास अडसर निर्माण करणारे पिंपळाचे झाड छाटण्याचे काम केल्याने स्थानिक आक्रमक झाले असून, त्यांनी पालिका अधिकारी आणि झाडांची कत्तल करणाऱ्या धनदांडग्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा पोलीस, महापौर आणि पालिका आयुक्तांना पत्र लिहून दिला […]
दक्ष तरुणांच्या मदतीने सराईत पाकिटमार व मोबाईल चोर गजाआड
सुषमा चव्हाण गर्दिच्या काळात पवईमधील बस स्थानकांवर बसमध्ये चढणाऱ्या लोकांचे पाकिट आणि मोबाईल चोरी करून, पसार होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका सराईत चोरास, पवईतील युवा पत्रकार रविराज शिंदे आणि त्यांचे मित्र अजय सावंत, दत्ता दाभोळकर, राजेश हजारे यांनी पकडून पवई पोलिसांच्या स्वाधीन केले. सुरेश चव्हाण उर्फ सुर्या असे पकडण्यात आलेल्या चोराचे नाव असून; सूर्या हा पोलिसांच्या अभिलेखावरील […]
पवईमध्ये अपघात सत्र, वेगवेगळ्या ३ अपघातात तिघांचा मृत्यू
पवईच्या रस्त्यांवर गुरुवारी रात्री ७ पासून शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ३ वेगवेगळे अपघात घडले. या तिन्ही अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या ३ तरुणांचा गाडीखाली येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवण्याच्या गुन्ह्यात अपघातास जबाबदार वाहनचालकांना अटक केली आहे. गुरुवारची रात्र ही पवईतील रस्त्यांसाठी काळरात्र ठरली. रात्री ७ ते सकाळी ७ या […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये भरली वाहतूक नियमांची शाळा
आयआयटी: प्रतिनिधी भावी पिढीला वाहतुकीचे नियम समजावेत आणि जनजागृती व्हावी म्हणून, मुंबई वाहतूक पोलीस व पवई इंग्लिश हायस्कूल तर्फे शाळेच्या प्रांगणात प्रात्यक्षिक स्वरूपातील ‘वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण’ या विषयावर एका कार्याक्रमाचे आयोजन केले होते. यात शाळेतील लहान मोठ्या अशा सर्व मुलांनी सहभाग घेऊन वाहतुकीचे नियम समजून घेतले. वाहन ही चैनीची वस्तू नसून, ती सध्याची […]
पवई विहारमध्ये गाडीवर पडले झाड, जीवित हानी नाही
पवई विहार येथील इमारत क्रमांक १ मधील १५ ते १६ वर्ष जुने झाड, बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक मुळासकट उन्मळून रोडवर उभ्या असणाऱ्या एका गाडीवर पडल्याने गाडीचा चुराडा झाला आहे. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने या वेळेस रस्त्यावर कुणी नसल्यामुळे जीवितहानी टळली, परंतु कॉम्प्लेक्सच्या प्रवेशाच्या काहीच अंतरावर संपूर्ण रस्त्यावर झाड आडवे पडल्याने वाहतूक खोळंबली आणि […]
गांधीनगर पुलावर ट्रेलर उलटला, २ जखमी, ८ तास वाहतूक ठप्प
सिमेंट मिक्सरच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गांधीनगर पुलावर गुरुवारी सकाळी ७.१५ वाजता मिक्सर पलटी होऊन दुसऱ्या मार्गिकेवरून जाणाऱ्या इको कारसह, रिक्षा व दुचाकीला त्याने आपले शिकार बनवले. या अपघातात २ लोक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत पार्कसाईट पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवण्याच्या गुन्ह्यात मिक्सर चालक शंकू कुमार प्रसाद (३५) याला […]
पवईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा
“हिरानंदानीचा राजा” – तेजस्विनी महिला सेवा संस्था आणि हिरानंदानी ग्रुपच्या वतीने संस्कृती जपण्याचे काम या गणेशोत्सवाच्या निमित्ताने केले गेले आहे. देखाव्यातून दुर्ग-किल्ले यांची महाराष्ट्राला लाभलेली अद्वितीय संपदा दाखवण्याचा प्रयत्न व त्यांची जपणूक याबद्दल संदेश दिला गेला आहे. किल्यामध्ये विराजमान असणाऱ्या बाप्पारुपी राजाच्या सेवेत असणारा मूषक वाद्यवृंद खूप उत्तमरित्या सादर केला आहे. “पवईचा सम्राट” – स्टार […]
गौरी-गणपती विसर्जन
प्रमोद चव्हाण
माझा बाप्पा
दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गर्जनेत, ढोल-ताशे, डीजे व बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा पाहुणचार घेतल्यानंतर शुक्रवारी […]
३२ एक्टिवा, ६ कारसह सराईत गुन्हेगाराला पवईत अटक
पोउनि समीर मुजावर व टिमची वाहन चोरीच्या गुन्ह्यातील या वर्षीची मुंबईतील सर्वात मोठ्या गुन्ह्याची उकल पवई भागातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या नासीर सद्दान खान (४८) या सराईत गुन्हेगाराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून आतापर्यंत ३२ एक्टिवा मोटरसायकल व ६ कार पोलिसांनी हस्तगत करत, मुंबईतील सर्वात मोठ्या वाहन चोरीच्या गुन्ह्याची उकल केली […]
हिरानंदानीत कामगाराची आत्महत्या
दिर्घ आजारावर उपचार चालू असून, त्रास असह्य होत असल्याने, हिरानंदानी येथील मार्बल यार्डमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने इलेक्ट्रिसिटीच्या वायरने झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली आहे. पिडीत व्यक्तीचे नाव श्रीकांत नंदकिशोर प्रसाद (३५) असे असून तो बिहारचा रहिवाशी आहे. याबाबत पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून त्याचे राजावाडी येथे शवविच्छेदन केले असता त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट […]
मोबाईल चोर पवई पोलिसांच्या जाळ्यात
चालत्या बसमधून लोकांचे मोबाईल फोन, पाकीट चोरून पसार होणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळण्यात पवई पोलिसांना यश आले आहे. अटक आरोपीचे नाव इजाज शेख (३८) असे असून, तो गोवंडी येथील रहिवाशी आहे. त्याच्याकडून पवई पोलिसांनी दोन महागडे मोबाईल फोन हस्तगत करून त्याला तुरुंगाची हवा दाखवत असे गुन्हे करणारांना एक जरब बसवलेली आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या निर्मितीमुळे पूर्व […]
पवईचा अवलिया: पवईच्या आदिवासी पाड्यातील मुलांना शिक्षणाचा हात देणारा ‘देवदूत’ देवरे मास्तर
भारत देश आज चंद्रावर पोहचला आहे, तो केवळ तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या जोरावर. भारताने शिक्षणाच्या आणि विद्वतेच्या बळावर अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवलेल्या आहेत. परंतु मुंबईचे हृदय समजले जाणाऱ्या पवई, जिथे देशाचे भविष्य घडवणारे घडवले जातात अशी आयआयटी सारखी शैक्षणिक संस्था आहे, तिथेच असाही एक परिसर आहे जिथल्या मुलांना विज्ञान तंत्रज्ञान तर दूरच, शिक्षणापासूनच दूर […]
पवई तलावाची बत्ती गुल, प्रशासन कुंभकरणाच्या झोपेत
पवईची वाढती लोकप्रियता आणि पर्यटन स्थळ म्हणून मुंबईकरांचा ओढा पाहता मरीन ड्राईव्ह येथील क्वीन नेक्लेसच्या धर्तीवर करोडो रुपये खर्च करून पवई तलाव परिसरात सुशोभिकरण करण्यात आले आहे, परंतु जवळपास एक महिन्यापासून या सुशोभिकरण करण्यात आलेल्या परिसरात बनवलेल्या पदपथावरील दिवेच बंद पडलेले आहेत. त्यामुळे पवईच्या राणीचा नेकलेस चोरीला गेली कि काय असा प्रश्न आता मुंबईकरांना पडलेला […]