पवई विहार येथील अंतर्गत रस्त्याला बनवण्याचा कामाचा मोठा धुमधडाक्यात गाजावाजा करत शुभारंभ करूनही अखेर या पावसाळ्यात ही रस्ता खड्डयात गेल्याचे समोर येत आहे. यामुळेच या भागात राहणाऱ्या नागरिकांची आणि येथील शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच दैना झाली असून, प्रवाशाला येथून घेवून जाण्यास रिक्षावाले मनाई करू लागले आहेत. त्यामुळे किमान रस्ता दुरुस्त तरी करा अशी मागणी आता […]
Tag Archives | पवई विहार
याचे श्रेय आता कोण घेणार? – पवईकर
पवईतील हिरानंदानी – पवई विहार रोडला जोडणाऱ्या विजय विहार रोडच्या दुरुस्तीनंतर याचे श्रेय घेण्यासाठी पोस्टर, बॅनर आणि सोशल माध्यमातून लोकप्रतिनिधींमध्ये चांगलाच श्रेयवाद रंगला होता. मात्र, या श्रेयवादाला आठवडा उलटायच्या आधीच विजय विहार रोडवर पुन्हा खड्डे पडायला सुरुवात झाली. पावसाळ्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसानेच या रस्त्याची दुर्दशा करत रस्त्यावर खड्डे कि खड्यात रस्ते अशी याची अवस्था केली. […]
विजय विहार रोडवरून पवईत श्रेयवाद
पवईतील विजय विहार रोडवर सध्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असून, हा रस्ता आम्हीच दुरुस्त केला असल्याचा श्रेयवाद सध्या स्थानिक आमदार आरिफ नसीम खान आणि स्विकृत नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांच्यात रंगला आहे. दोघांनीही हे काम आमच्याच प्रयत्नातून आणि फंडातून केला जात असल्याचा दावा केला आहे. श्रेयवादात यांचे कार्यकर्ते सुद्धा उतरले असून, सोशल […]
युथ पॉवरच्या छत्री वाटप आंदोलनाला ‘बेस्ट’ यश; बस थांब्यावर बसवले छप्पर
रविराज शिंदे पवईमधील आयआयटी येथील सर्वच बस थांब्यांवर छप्पर नसल्याने प्रवाशांना पावसाळ्या सोबतच उन्हातान्हात सुद्धा त्रास सहन करत बस येईपर्यंत ताटकळत उभे राहावे लागत होते. या बस थांब्यावर छप्पर उभारण्यात यावेत यासाठी, ‘युथ पॉवर’ संघटनेच्यावतीने बेस्ट प्रशासनाला कानपिचक्या काढत प्रवाशांना छत्री वाटप करून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची बेस्ट प्रशासनाने दखल घेत अखेर पवईतील […]
नवनिर्मित विजय विहार रोडला खड्डे
पावसाळ्यात पालिकेने बनवलेल्या रस्त्यांवर खड्डे पडणे मुंबईकरांसाठी नवीन नाही आहे, मात्र पाऊस नसतानासुद्धा नुकत्याच दुरुस्तीचे काम केलेल्या विजय विहार रस्त्याला खड्डे पडल्याचा प्रकार घडला आहे. येथील विजय विहार ते पवई विहार जोडणाऱ्या रस्त्याला महिना भराच्या आतच खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी आमदार नसीम खान यांच्या प्रयत्नाने महानगर पालिकेच्यावतीने या रोडच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र […]
विजय विहार रोडला उजाळी; आमदार फंडातून रोड दुरुस्तीचे काम
पवई येथील विजय विहार रोड जो गेली ७ वर्षापासून खितपत पडला होता त्याच्या दुरुस्तीचे काम नुकतेच सुरु झाले आहे. आमदार आरिफ नसिम खान यांच्या फंडातून रोड दुरुस्तीचे काम केले जात असून, पावसाळ्यापूर्वी रोडचे काम पूर्ण होणार असल्याचे याच्या ठेकेदाराकडून सांगण्यात येत आहे. पवई विहार आणि लेक होम या कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी हिरानंदानी व जेव्हीएलआरकडून जलवायू […]
पवईच्या पावसाळापूर्व कामांची आमदारांनी केली पाहणी
स्थानिक आमदार व पवईचे लाडके नेते आरिफ नसीम खान यांनी आज पवई परिसराला भेट देवून पावसाळा पूर्व कामांची पाहणी केली. यावेळी पवईतील नागरिकांना भेटून त्यांनी परिसरातील समस्यांही जाणून घेतल्या. यावेळी पालिका अधिकारी, समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी, वाहतूक विभाग अधिकारी, मुंबई पोलीस अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात पवईकर उपस्थित होते. पावसाळा आता काही दिवसांवरच येवून ठेपलेला आहे. गेल्या दहा […]
लेक होममध्ये बाहेरील वाहनांना ‘प्रवेश बंद’
@pracha2005 लेकहोम, पवई विहार व एव्हरेस्ट हाईट कॉम्प्लेक्स परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी येथील स्थानिकां व्यतिरिक्त बाहेरील वाहनांना आता कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश नाकारला जाणार आहे. याबाबत तिन्ही कॉम्प्लेक्सच्या फेडरेशनच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला असून, १५ सप्टेंबर पासून यांची संपूर्ण अंमलबजावणी केली जाणार आहे. लोकांच्या पूर्व सुचणेसाठी संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी ‘Please leave our road alone’ […]
पवई तलावावर मगरींसोबत आता अजगरांचेही साम्राज्य
पवई तलाव भागात आता मगरीं सोबतच विविध जातीच्या साप आणि अजगरांचे साम्राज्य उभे होत आहे. गेल्या महिनाभरात पवई तलाव भागात किनाऱ्यावर अनेक मोठमोठाले अजगर रोडवर अथवा पदपथावर येऊ लागल्याने आता या भागात यांचे पण साम्राज्य असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र पवई तलाव भागात स्वच्छता मोहिम चालू असल्याने आता या अजगरांना लपण्यास जागा न उरल्याने ते […]
पवई विहारमध्ये गाडीवर पडले झाड, जीवित हानी नाही
पवई विहार येथील इमारत क्रमांक १ मधील १५ ते १६ वर्ष जुने झाड, बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक मुळासकट उन्मळून रोडवर उभ्या असणाऱ्या एका गाडीवर पडल्याने गाडीचा चुराडा झाला आहे. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने या वेळेस रस्त्यावर कुणी नसल्यामुळे जीवितहानी टळली, परंतु कॉम्प्लेक्सच्या प्रवेशाच्या काहीच अंतरावर संपूर्ण रस्त्यावर झाड आडवे पडल्याने वाहतूक खोळंबली आणि […]