शैक्षणिक वर्षाचा शाळेचा पहिला दिवस उजाडला आणि पवईच्या रस्त्यांवर ‘राजा उदार आन जनता बेजार’ अशी अवस्था सकाळी सकाळी पवईकरांनी अनुभवली. कामाला जाणाऱ्यांची गडबड आणि त्यात शाळेत मुलांना घेवून येणारे बस चालक आणि पालक अशा दोघांनीही शाळेच्या आवारात भर रस्त्यांवर लावलेल्या गाड्यांमुळे पवईचे सगळे रस्ते सकाळी-सकाळी ‘हाउस फुल्ल’ झाले होते. आधीच पावसाळ्यात गाड्यांच्या कमी झालेल्या वेगांवर […]
Tag Archives | पवई
पवई लेक होममधील भीषण आगीत ७ लोकांचा मृत्यू, २२ पेक्षा जास्त जखमी
पवई लेक होम, फेज तीन मधील इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर शनिवारी ५.३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत, एका महिलेसह ७ जणांचा मृत्यू झाला असून २२ पेक्षा जास्त लोक जखमी असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगितले जात आहे. मृतांपैकी तीन जणांचा मृत्यू हा लिफ्टमध्ये अडकल्याने गुदमरून झाला आहे. एका जखमीला ऐरोली येथील नॅशनल बर्न्स सेंटर येथे उपचारार्थ हलविण्यात आले […]
आजाराला कंटाळून हिरानंदानीत घरकाम करणाऱ्या मुलीची आत्महत्या
हिरानंदानीतील हेरिटेज इमारतीत घरकाम करणाऱ्या श्रद्धा गायकवाड (बदलेले नाव) या १९ वर्षीय मुलीने आजाराला कंटाळून तेराव्या मजल्यावरून उडी मारून जीव दिल्याची घटना पवईमध्ये काल सकाळी घडली. पवई पोलिसांना ती काम करत असलेल्या घरात तिने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी सापडली असून, तिने निराशेतून आत्महत्या केली असल्याचे चिठ्ठीतून समोर येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या आत्महत्येमुळे मात्र […]
पवईचा अवलिया: मुकेश त्रिवेदी, चित्रकार ते छायाचित्रकार एक प्रवास
सुषमा चव्हाण | [email protected] लोकांचा मित्र, गुरु, मास्टर छायाचित्रकार, भाऊ, एक उत्तम मार्गदर्शक, छाया-पत्रकार, कलाकार अशी विविध विशेषणांनी ज्यांना संबोधले जाते, असे विविधांगी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे मुकेश त्रिवेदी उर्फ मुकी आणि सगळ्या पवईकरांचे लाडके दादा. लहानपणी शाळेत असताना चित्रकलेची आवड असणारा बाल-चित्रकार ते प्रख्यात छायाचित्रकार असा प्रवास करताना कॅमेऱ्याच्या पाठीमागे राहून सुद्धा लोकांच्या मनात घर करून राहिलेला हा पवईचा अवलिया. एकेकाळी जंगल, डोंगराळ, खाणीचा […]
पवईकरांच्या भीतीचा फुगा फुटला, पॅराशूट नसून निघाले फुगे
विमानतळ परिसरात दिसलेले पॅराशूट हे कदाचित घातपाताच्या उद्देशाने तिथे आले होते, परंतु ते त्यात सफल होऊ शकले नाहीत आणि ते थेट पवईच्या दिशेने आले आहेत. अशी बातमी पवई परिसरात फिरत असतानाच, सोमवारी दिवसभर विविध तपास यंत्रणांनी पवई भागात राबवलेल्या तपास मोहिमेने पवईकरांची चांगलीच पाचावर धारण बसली. परिसरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु मंगळवारी […]
आयआयटी पवईची विदयुत कार ईवो ४, ‘फॉम्युला स्टुडंट’ स्पर्धेसाठी सज्ज
९ ते १२ जुलै या कालावधीत इंग्लंडमधील सिल्वरस्टोन सर्किटवर ‘फॉम्युला स्टुडंट’ स्पर्धा भरवण्यात येणार आहेत. जागतिक स्तरावरील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेत, जगभरातील १०० पेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये सहभाग घेणार आहेत. गेली चार वर्ष ह्या स्पर्धेत सहभाग घेणारी आयआयटी मुंबईची रेसिंग टिम, ह्या वर्षी आपल्या वेगवान इलेक्ट्रिक कार ईवो 4 सह मैदानात उतरत आहे. […]