Tag Archives | Chandivali

1

३२ एक्टिवा, ६ कारसह सराईत गुन्हेगाराला पवईत अटक

पोउनि समीर मुजावर व टिमची वाहन चोरीच्या गुन्ह्यातील या वर्षीची मुंबईतील सर्वात मोठ्या गुन्ह्याची उकल पवई भागातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या नासीर सद्दान खान (४८) या सराईत गुन्हेगाराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून आतापर्यंत ३२ एक्टिवा मोटरसायकल व ६ कार पोलिसांनी हस्तगत करत, मुंबईतील सर्वात मोठ्या वाहन चोरीच्या गुन्ह्याची उकल केली […]

Continue Reading 0
vs

प्रबोधनकार ठाकरे जयंती निमित्त पवईत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

परिवर्तनवादी विचारवंत मा. प्रबोधनकार ठाकरे यांच्या १३० व्या जयंती निमित्त आयआयटी, पवई येथे धम्मदिप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशनच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ सप्टेंबर २०१५ रोजी संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत पवईतील तिरंदाज महानगरपालिका शाळेत ‘प्रबोधनकार ठाकरे आणि परिवर्तनवादी विचार’ या विषयावर ही वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. पवईतील जनतेसाठी शैक्षणिक […]

Continue Reading 0
govinda re gopala

गोविंदा रे गोपाळा

चांदिवली गावाची मानाची हंडी – श्री साई गणेश मित्र मंडळ यांच्यावतीने अण्णाभाऊ साठे चौक, संघर्ष नगर येथे हंडीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार पूनम महाजन यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

Continue Reading 0
mobile chor

मोबाईल चोर पवई पोलिसांच्या जाळ्यात

चालत्या बसमधून लोकांचे मोबाईल फोन, पाकीट चोरून पसार होणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळण्यात पवई पोलिसांना यश आले आहे. अटक आरोपीचे नाव इजाज शेख (३८) असे असून, तो गोवंडी येथील रहिवाशी आहे. त्याच्याकडून पवई पोलिसांनी दोन महागडे मोबाईल फोन हस्तगत करून त्याला तुरुंगाची हवा दाखवत असे गुन्हे करणारांना एक जरब बसवलेली आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या निर्मितीमुळे पूर्व […]

Continue Reading 0
raheja second road

रहेजा विहारचा पर्यायी मार्ग अखेर खुला

गेली अनेक वर्ष पर्यायी मार्गासाठी लढणाऱ्या रहेजाकरांना त्यांचा हक्काचा पर्यायी मार्ग अखेर खुला झाला आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन भाऊ आहिर यांच्या हस्ते रहेजा विहार ते साकीविहार रोड हा पर्यायी मार्ग रहेजाकरांसाठी खुला करण्यात आला आहे. कुर्ला तालुका अध्यक्ष शरद पवार, स्थानिक नगरसेविका सविता पवार, महानगरपालिका अधिकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी […]

Continue Reading 0
dr

सुकृतः फाऊन्डेशन – गरिब गरजूंना मोफत शिक्षण, वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक गोष्टी देणारी संस्था

माझ्या प्रत्येक कृतीतून मला फायदा कसा होईल, या विचाराने वागणाऱ्या समाजात. आपल्याला प्रत्येक कार्यात मदत करणाऱ्या, गरीब आणि गरजू अशा घरकाम करणाऱ्या स्त्रिया, त्यांचा परिवार, अनाथ, रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांसाठी मोफत शिक्षण, वैद्यकीय सुविधा देण्याचे काम, पवईमधील रहेजा येथील सुकृतः ही संस्था करत आहे. एवढ्यावरच न थांबता ही संस्था, या लोकांसाठी चांगले काहीतरी करा म्हणून लोकांना […]

Continue Reading 0
sm shetty traffic

बेजाबदारपणे उभ्या शालेय बस आणि पालकांच्या गाड्यांमुळे पवईमध्ये वाढतोय वाहतूक कोंडीचा प्रश्न

शैक्षणिक वर्षाचा शाळेचा पहिला दिवस उजाडला आणि पवईच्या रस्त्यांवर ‘राजा उदार आन जनता बेजार’ अशी अवस्था सकाळी सकाळी पवईकरांनी अनुभवली. कामाला जाणाऱ्यांची गडबड आणि त्यात शाळेत मुलांना घेवून येणारे बस चालक आणि पालक अशा दोघांनीही शाळेच्या आवारात भर रस्त्यांवर लावलेल्या गाड्यांमुळे पवईचे सगळे रस्ते सकाळी-सकाळी ‘हाउस फुल्ल’ झाले होते. आधीच पावसाळ्यात गाड्यांच्या कमी झालेल्या वेगांवर […]

Continue Reading 3
छायाचित्र: ऑलीविया डिसुझा

पवई लेक होममधील भीषण आगीत ७ लोकांचा मृत्यू, २२ पेक्षा जास्त जखमी

पवई लेक होम, फेज तीन मधील इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर शनिवारी ५.३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत, एका महिलेसह ७ जणांचा मृत्यू झाला असून २२ पेक्षा जास्त लोक जखमी असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगितले जात आहे. मृतांपैकी तीन जणांचा मृत्यू हा लिफ्टमध्ये अडकल्याने गुदमरून झाला आहे. एका जखमीला ऐरोली येथील नॅशनल बर्न्‍स सेंटर येथे उपचारार्थ हलविण्यात आले […]

Continue Reading 0
छायाचित्र: विपिन पवार

पवईचा अवलिया: मुकेश त्रिवेदी, चित्रकार ते छायाचित्रकार एक प्रवास

सुषमा चव्हाण | [email protected] लोकांचा मित्र, गुरु, मास्टर छायाचित्रकार, भाऊ, एक उत्तम मार्गदर्शक, छाया-पत्रकार, कलाकार अशी विविध विशेषणांनी ज्यांना संबोधले जाते, असे विविधांगी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे मुकेश त्रिवेदी उर्फ मुकी आणि सगळ्या पवईकरांचे लाडके दादा. लहानपणी शाळेत असताना चित्रकलेची आवड असणारा बाल-चित्रकार ते प्रख्यात छायाचित्रकार असा प्रवास करताना कॅमेऱ्याच्या पाठीमागे राहून सुद्धा लोकांच्या मनात घर करून राहिलेला हा पवईचा अवलिया. एकेकाळी जंगल, डोंगराळ, खाणीचा […]

Continue Reading 1
air baloon

पवईकरांच्या भीतीचा फुगा फुटला, पॅराशूट नसून निघाले फुगे

विमानतळ परिसरात दिसलेले पॅराशूट हे कदाचित घातपाताच्या उद्देशाने तिथे आले होते, परंतु ते त्यात सफल होऊ शकले नाहीत आणि ते थेट पवईच्या दिशेने आले आहेत. अशी बातमी पवई परिसरात फिरत असतानाच, सोमवारी दिवसभर विविध तपास यंत्रणांनी पवई भागात राबवलेल्या तपास मोहिमेने पवईकरांची चांगलीच पाचावर धारण बसली. परिसरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु मंगळवारी […]

Continue Reading 0
b

आमच्या सिंघमला फसवले आहे, खाटपेंच्या समर्थनात स्थानिक जनता रस्त्यावर, मूक मोर्चा आणि सह्यांची मोहीम

साकिनाका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील खाटपे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश सूर्यवंशी आणि पोलिस शिपाई योगेश पोंडे सह एकूण आठ जणांना मुंबई पोलिसांच्या एमआयडीसी गुन्हे शाखेने एका मॉडेलवर बलात्कार आणि खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. मात्र ह्या प्रकरणात स्थानिकांचे वेगळेच मत आहे. हे सर्व कट-कारस्थान आहे, कोणीतरी त्यांना ह्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला आहे, […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!