Tag Archives | cheating

matrimonial site cheat

विवाह जुळवणाऱ्या साइटवर बनावट प्रोफाइल तयार करून महिलेने २३ लाखाला गंडवले

पवईतील कॉर्पोरेट कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीशी विवाह जुळवणाऱ्या साईटवर बनावट प्रोफाइलद्वारे मैत्री करून, वडिलांच्या वैद्यकीय उपचारांसाठी पैसे देण्याच्या प्रत्याशावर एका महिलेने २३.४४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पवई पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय तक्रारदाराने गेल्या वर्षी लग्न जुळवणाऱ्या साईटवर एका महिलेच्या प्रोफाइला […]

Continue Reading 0
प्रवीण बस्तानव नरोना, डेरिक बस्तानव नरोना, सेविअर जून नरोना आणि विल्सन अन्थोनी सवेरी मुथू

खोट्या कागदपत्रांच्या आधारे लोन काढून मुंबईकरांना लाखोंचा चुना लावणाऱ्या चौघांना पवईत अटक

खोटी कागदपत्रे तयार करून मुंबईकरांच्या नावाने बँकेतून लोन काढून लाखोंचा गंडा घालणाऱ्या चौघांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण बस्तानव नरोना, डेरिक बस्तानव नरोना, सेविअर जून नरोना आणि विल्सन अन्थोनी सवेरी मुथू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पवई पोलिसांनी आत्तापर्यंत त्यांच्याकडून लोनच्या पैशातून घेतेलेल्या ३ मोटारसायकली, फ्रीज, टीव्ही आणि घरगुती वापराच्या इलेक्ट्रोनिक वस्तूंसह […]

Continue Reading 1
डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना पवईत अटक

डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना पवईत अटक

भारतीय चलनाच्या बदल्यात अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना पवई पोलिसांनी काल अटक केली आहे. @प्रमोद चव्हाण माझ्याकडे खूप सारे डॉलर आहेत, मात्र मला त्याबदल्यात थोडे पैसे द्या, ते मी तुम्हाला देतो असे सांगून मुंबईकरांना टोप्या घालणाऱ्या टोळीतील दोघांना पवई पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. तीन लाखाचा गंडा घालून पशार होत असताना त्यांना […]

Continue Reading 0

स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून २४ लाखाची फसवणूक

जोगेश्वरीमध्ये एसआरएअंतर्गत स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून २४ लाख रुपयांना ठगणाऱ्या एका भामट्याला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. शिवलिंग कोळे असे या अटक आरोपीचे नाव असून, त्याला कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तक्रारदार मोहमद आमीर हे आपल्या परिवारासोबत साकीनाका परिसरात राहतात. मुंबईत हायवेजवळ एखादे स्वस्तातील घर मिळावे म्हणून ते आणि […]

Continue Reading 0
fraud

विदेशात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक

सौदी अरेबियात मोठ्या पगाराची नोकरी लावून देतो असे सांगून, अनेक तरुणांना गंडा घालणाऱ्या भामट्यांच्या टोळक्यातील एकाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. वलीउल्ला बेतुल्ला कुरेशी असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील ही दुसरी अटक आहे. जानेवारी महिन्यात यातील पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली […]

Continue Reading 0
aaropi

लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर मैत्री करून फसवणूक करणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेडया

मोठा उद्योगपती असल्याचे सांगून २७ वर्षीय एमबीए तरुणीशी लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर मैत्री करून, लग्नाचे वचन देवून, अश्लील फोटोद्वारे बदनामी करण्याची धमकी देत तिच्याशी संबंध बनवणाऱ्या कोलकता येथील एका चहावाल्याला पवई पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या. गौरव शाव (३०) असे या तरुणाचे नाव असून, बुधवारी त्याला अंधेरी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पवईतील एका नामांकित कंपनीत मोठ्या […]

Continue Reading 0
sakinaka cheating 200117

पोलीस असल्याचा बनाव करून फसवणूक करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नव्या नोटांच्या बदल्यात अधिक किंमतीच्या जुना नोटा देवून फायदा करून देण्याच्या बहाण्याने बोलावून, पोलीस असल्याची बतावणी करून सुनील तांबे (२६) या व्यावसायिकाची फसवणूक करून पळ काढलेल्या टोळीच्या म्होरक्याच्या गुरुवारी साकीनाका पोलिसांनी मुसक्या आवळल्या. जाफर सय्यद (२४) असे अटक आरोपीचे नाव असून, साकीनाका पोलीस त्याच्या इतर साथिदारांचा शोध घेत आहेत. अचानक ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

व्यावसायिकाला २० लाखाचा गंडा घालणाऱ्या अभियंत्याला दिल्लीतून अटक

कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने कांदिवली येथील एका व्यावसायिकाला २० लाखाचा गंडा घालणाऱ्या यांत्रिकी अभियंत्याला दिल्लीतून पवई पोलिसांनी गुरुवारी अटक केली. परवेश कुमार (२३) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याचे इतर दोन साथीदार आकाश आणि पंकज यांचा पोलीस शोध घेत आहेत. मुंबईतील नामांकित फर्निचर निर्माते गुरु सिंग (बदललेले अडनाव) यांना फर्निचर बनवण्यासाठी चीनमधून लाकूड आयात करण्यासाठी […]

Continue Reading 0
online-scam

अमेरिकन आर्मीमध्ये अधिकारी असल्याचे सांगून फेसबुकवर महिलेला गंडा

तीन लोकांच्या टोळीतील एकाला पवई पोलिसांनी केली अटक एक ४८ वर्षीय महिलेशी फेसबुक या सोशलसाईटवर अमेरिकन आर्मीत अधिकारी आहे आणि अफगाणिस्तान येथे पोस्टिंग असल्याचे सांगून, मैत्री करून ३ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या टोळीतील एकाला दिल्ली येथून पवई पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. रिचर्ड डेविड शेम्री (३०) असे अटक आरोपीचे नाव असून, अधिक तपासासाठी त्याला पोलीस […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!