Online fraud crimes have increased largely in the last few years. Day by day many people are falling prey to these cyber thieves and their scams. An unknown person sitting in some corner of the world and is deceiving. Investigating crime and recovering the amount is a big challenge for police. However, the recent significant […]
Tag Archives | cyber fraud
पवई पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, काही तासातच परत मिळवली ऑनलाईन फसवणूकीची रक्कम
ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले असून, दिवसभरात कित्येक लोक या सायबर चोर आणि त्यांच्या फसवणुकीला बळी पडत आहेत. या गुन्ह्यांचा तपास आणि रक्कम मिळवणे मोठे आव्हान असते. जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात बसून अनोळखी इसम फसवत असतो. मात्र पवई पोलिसांच्या सायबर टीमने नुकत्याच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची संपूर्ण मुंबईभर चर्चा असून, त्यांच्या या कार्यासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव […]
आयफोन आणि २० हजार पौंड पाठवण्याच्या नावाखाली महिलेची ४.१५ लाखांची फसवणूक
सोशल मिडीयावर मैत्री करून आयफोन आणि २० हजार पौंड पाठवण्याच्या नावाखाली एका ३३ वर्षीय महिलेची ४.१५ लाखांची फसवणूक केल्याचे नुकतेच पवईत उघडकीस आले आहे. फसवणूककर्त्याने परदेशी नागरिक असल्याची तोतयागिरी करून इंस्टाग्रामवर तिच्याशी मैत्री करत भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले. गिफ्ट मिळवण्यासाठी प्रोसेसिंग फी आणि इतर विविध शुल्क म्हणून ४.१५ लाख रुपये फसवणूककर्त्याने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने उकळले. […]
महिलेचा वीज बिल भरण्याचा प्रयत्न, २.३८ लाखांची फसवणूक
वीजबिल भरण्याच्या नावाखाली एका ६३ वर्षीय महिलेची २.३८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच पवईत घडली आहे. वीज बिल भरण्यास सांगणारा संदेश पाठवत रिमोट ऍक्सेस ऍप्लिकेशन वापरून सायबर चोरट्यांने हा डाव साधला आहे. पोलीस ठाण्यात नोंद गुन्ह्यानुसार, तक्रारदार महिला पवई येथे एकटीच राहत असून, व्यवसायाने वकील आहे. ती कामासाठी वांद्रे येथे जात असताना तिला तिचे […]
झटपट कमाईचा ऑनलाईन फंडा, मनोरंजन कंपनीत काम करणाऱ्याला १.६ लाखाचा गंडा
एका अज्ञात सायबर भामट्याने मनोरंजन कंपनीत काम करणाऱ्याला पवईतील २५ वर्षीय व्यक्तीची १.६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शनिवारी घडला आहे. तक्रारदाराने वेबसाइटवर विक्रीसाठी ठेवलेल्या रेफ्रिजरेटर आणि फुट मसाजर मशीन खरेदीच्या बहाण्याने सायबर चोरट्याने ही फसवणूक केली आहे. सायबर चोरट्याने त्या वस्तू खरेदीसाठी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधला आणि देय स्वीकारण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. […]
ज्येष्ठ नागरिकाचे ई-फ्रॉडने पळवलेले ७४.५ हजार रुपये पोलिसांनी काही तासात दिले परत मिळवून
ऑनलाईन फसवणूकीत एका ज्येष्ठ नागरिकाने गमावलेले ७४,५०० रुपये काही तासातच साकीनाका पोलिसांनी कारवाई करत परत मिळवून दिले आहेत. घर भाड्याने घेण्याच्या बहाण्याने रिअल इस्टेट ब्रोकरच्या माध्यमातून कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून, लष्करात अधिकारी असल्याचे सांगत महिलेने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली होती. पोलिसांच्या या कारवाईची प्रशंसा करताना ज्येष्ठ नागरिक यांनी मुंबई पोलिस दलाची स्कॉटलंड यार्डशी तुलना केली आहे. […]