Tag Archives | duped

online-scam

एनआरआय असल्याचे सांगत महिलेला ३ लाखाचा ऑनलाईन गंडा

साकीनाका येथील ३२ वर्षीय महिलेला तिच्यासोबत विवाहास इच्छुक असल्याचे सांगत एका भामट्याने ३ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. नीरज कपूर असे या भामट्याचे नाव असून, महिलेने वैवाहिक वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर दोघांची ओळख झाली होती. या भामट्याने आपण एनआरआय असल्याचा दावा करत तिला आपल्या जाळ्यात अडकवले. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,साकीनाका येथे राहणाऱ्या आणि खाजगी कंपनीत नोकरी […]

Continue Reading 0
Black Magic Powai

जादूटोणाच्या नावाखाली लोकांना फसवणाऱ्या पवईतील मायलेकाच्या जोडीतील एकाला अटक; एक पसार

पवईकरांसह अनेक मुंबईकरांना जादूटोण्यातून भूत उतरवत असल्याचे सांगत गंडा घालणाऱ्या आई आणि मुलाच्या जोडीतील मुलाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याची माहिती मिळताच आई पसार झाली आहे. पवईतील एका महिलेने आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची पोलिसांना तक्रार करताच पवई पोलिसांनी ही कारवाई केली. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईत राहणारी महिला कुसूम लता (बदललेले नाव) हिचा […]

Continue Reading 0
Black-Magic

धार्मिक विधीच्या नावाखाली चोरी करणाऱ्या महिलेविरोधात पवई पोलिस ठाण्यात गुन्हा

तुमच्या घरात आर्थिक चणचण आहे का? मुलबाळ होत नाही का? मग मी सांगते तो उपाय करा, असे सांगून धार्मिक विधी करण्याच्या निमित्ताने घरात घुसून, घरातील मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला आहे. तुमच्या घरात आर्थिक चणचण आहे का?, तुम्हाला मुलबाळ होत नाही का?, मी त्यासाठी उपाय करते, असे कारण सांगून घरात घुसत धार्मिक विधी करण्याच्या निमित्ताने […]

Continue Reading 0
cheating in name of police

पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाचे दागिने पळवले; हिरानंदानीतील घटना

आपले काम संपवून घरी परतत असणाऱ्या ७६ वर्षीय वृद्धाला पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने भामट्यांनी पळवल्याची घटना मंगळवारी पवईतील हिरानंदानी भागात घडली. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून सिसिटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील विजयविहार इमारतीत राहणारे विलास बांदेकर (७६) मंगळवारी सकाळी हिरानंदानी येथील आपल्या बँकेच्या शाखेत […]

Continue Reading 0
online-scam

सोशल मिडीयावर भेटलेल्या मैत्रिणीने सव्वा लाख उकळले

पूर्वी शाळा, कॉलेज आणि खेळाच्या मैदानावर मित्र भेटण्याची जागा आता सोशल माध्यमांनी घेतली आहे. समोर असणाऱ्या व्यक्तीपेक्षा दूरवर कुठेतरी बसलेल्या अनोळख्या व्यक्तीशी मैत्री करणे लोक जास्त पसंत करू लागलेत. याचाच फायदा घेत पाठीमागील काही वर्षात ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. मैत्री जुळवणाऱ्या सोशल माध्यमात अनोळखी तरुणीशी मैत्री करणे साकीनाका येथील तरुणाला चांगलेच महागात पडले […]

Continue Reading 0

डॉक्टरला प्रीमियमच्या भरण्यासाठी आलेल्या फोन कॉलने १.३५ लाख पळवले

सायबर गुन्हेगारीने आपले जाळे चांगलेच पसरवले असून, पवईतील ६२ वर्षीय ईएनटी तज्ज्ञ याची नुकतीच शिकार झाली आहे. बनावट टेलिकॉलरने पिडीतने घेतलेल्या विम्याची संपूर्ण माहिती देत प्रीमिअमची रक्कम त्वरित नाही भरली तर पॉलिसी लैप्स होवू शकते असे भासवत बँक खात्यात पैशांचे हस्तांतरण करण्यास सांगून १.३५ लाखाचा गंडा घातला आहे. ६ मार्चला पिडीत डॉक्टरला अनिता कोठारी आणि […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

वृद्धेला पोलीस असल्याचे सांगून २ लाखाचे सोन्याचे दागिने लांबवणारया भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात आपल्या मुलीच्या उपचारासाठी आलेल्या एका ६२ वर्षीय वृद्ध महिलेला पोलीस असल्याची बतावणी करून, २ लाखाचे दागिने लांबवणाऱ्या चोरट्याला अडीच महिन्यानंतर अखेर पोलिसांनी मालवणी येथून अटक केली आहे. गुलझार अली (३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मालवणी येथे इस्टेट एजंटचे काम करतो. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधा गौंडर (६२) […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने २० तरुणांना ठगणाऱ्या टोळीतील एकाला अटक

अमेरिकेत आणि कॅनडात नोकरी मिळवून देण्याचा बहाणा करून २० मुंबईकर तरुणांना १० लाखाला ठगणाऱ्या नोकरी रॅकेटमधील एकाला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. तरुणांनी साकीनाका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. आठवीतून शाळा सोडलेल्या बावीस वर्षीय अशोक चौधरी याला सदर गुन्ह्यात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. साकीनाका जंक्शन येथे असणाऱ्या ग्लोबस इमिग्रेशन सर्व्हिसेस या त्याच्या […]

Continue Reading 0
online cheating PPS

ऑनलाईन मैत्री करून फसवणूक करणाऱ्या ठगाला दिल्लीतून अटक

ऑनलाईन मैत्री करत चांदिवली येथील एका खाजगी बँकेत उच्च पदावर काम करणाऱ्या महिलेला विदेशातून आलेल्या महागड्या वस्तूवरील टॅक्स भरण्यासाठी पैशांची मागणी करून, फसवणूक करणाऱ्या टोळीतील एकाला पवई पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी दिल्लीतून अटक केली आहे. सत्येंदर प्रताप सोवरन सिंह उर्फ मॅनसन रॉड्रिक्स (३३) असे अटक आरोपीचे नाव असून, एक महिला सहकारी नेहा माथूर आणि नायजेरिन […]

Continue Reading 0
matrimonial site cheat

विवाह जुळवणाऱ्या साइटवर बनावट प्रोफाइल तयार करून महिलेने २३ लाखाला गंडवले

पवईतील कॉर्पोरेट कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीशी विवाह जुळवणाऱ्या साईटवर बनावट प्रोफाइलद्वारे मैत्री करून, वडिलांच्या वैद्यकीय उपचारांसाठी पैसे देण्याच्या प्रत्याशावर एका महिलेने २३.४४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पवई पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय तक्रारदाराने गेल्या वर्षी लग्न जुळवणाऱ्या साईटवर एका महिलेच्या प्रोफाइला […]

Continue Reading 0
accuse Zahid Noor Mohammad Shaikh

वाहनचालकांची फसवणूक करणाऱ्या बनावट मॅकेनिकला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तुमच्या गाडीतून धूर निघत आहे असे सांगून, गाडी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने अनेक मुंबईकरांना गंडा घालणाऱ्या बनावट मॅकेनिकच्या पवई पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात काल मुसक्या आवळल्या. झाहिद नुर मोहमद शेख (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोवंडी येथील रफिकनगर भागातून त्याला अटक करण्यात आली. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर टकटक गँग सोबतच, तुमच्या गाडीतून धूर निघत […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!