शुक्रवारी, २५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पवईतील एल अँड टी कंपनीजवळ एक सिमेंट मिक्सर पलटी झाल्याची घटना घडली. पवईकडून गांधीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर हा कंटेनर पलटी होत रस्त्यावर आडवा झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास २ तासानंतर क्रेनच्या मदतीने मिक्सर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. यासंदर्भात पवई पोलिसांनी […]
Tag Archives | IIT Main Gate
पवई पोलिसांनी केलं असंही संरक्षण; पोलीस कर्मचाऱ्यांचे रक्तदान
@प्रमोद चव्हाण | कोविड – १९ रुग्णांचा महाराष्ट्रातील वाढता आकडा पाहता आणि पुढील काळात रक्ताचा तुटवडा भासू शकतो याला पाहता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. दिवसरात्र खाकीच्या माध्यमातून मुंबईला सुरक्षा पुरवणाऱ्या आणि कायदा – सुव्यवस्था निर्माण करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पवई पोलीस ठाण्यात कार्यरत विजय घागरे, अंबादास काळेल, शिवराज कोळी यांनी […]
पवईत हायजेनिक रक्तदान शिबीर
@रविराज शिंदे, रमेश कांबळे: देशात कहर माजवणाऱ्या कोरोना वायरसशी लढा लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. देशात लॉकडाऊन असून, या काळात रक्ताची कमतरता जाणवण्याची शक्यता असल्याने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी छोट्या छोट्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आव्हान केले होते. या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर पवई बीजेपी वॉर्ड १२२ तर्फे आयआयटी पवई येथील जैन मंदिर हॉलमध्ये […]
गांधीनगर उड्डाणपुलावर सिमेंट मिक्सर पलटला
जेव्हीएलआरवर अपघात सत्र सुरूच; अपघात, वाहतूक कोंडीमुळे चाकरमानी संतप्त आज (शुक्रवार) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास गांधीनगर उड्डाणपुलावर सिमेंट मिक्सर पलटी झाल्याची घटना घडली. पवईकडून पूर्व धृतगती मार्गाकडे जाणाऱ्या मार्गावर हा कंटेनर पलटी होत रस्त्यावर आडवा झाल्याने उड्डाणपुलावरील वाहतूक रोखण्यात आली होती. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या मदतीने मिक्सर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या घटनेत क्लिनर […]
वाहतूक कोंडीचा ‘महामार्ग’; जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर गर्दीच्या काळात व्यावसायिक तीन चाकी वाहनांना बंदी
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेव्हीएलआर) वाहतुक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रयोगाच्या निमित्ताने सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या काळात जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड वापरण्यास हलक्या व मध्यम व्यावसायिक तीन चाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे आणि या मार्गावरून चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे जेव्हीएलआरच्या दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत […]
जेव्हीएलआरवर आयआयटीजवळ कंटेनर पलटला, ३ तास वाहतूक कोंडी
दुभाजक ठरतोय अडथळा, यापूर्वीही या ठिकाणी अपघाताच्या, दुभाजकावर गाड्या चढल्याच्या अनेक घटना. स्थानिकांची दुभाजक हटवण्याची मागणी. पालिका – वाहतूक विभाग यांची टोलवाटोलवी. आज (गुरुवार, १९ सप्टेंबर) पहाटे सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवर आयआयटी मेनगेट येथे एक कंटेनर (एमएच ४६ एफ ४९७१) पलटल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत कंटेनर चालकाने बाहेर उडी मारल्यामुळे तो बचावला. मात्र […]
पवई, जेव्हीएलआरवरील सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था; नागरिकांची प्रचंड गैरसोय
@प्रमोद चव्हाण, रविराज शिंदे आंदोलने, पोलीस कोठडी आणि सततच्या पवईकरांच्या पाठपुराव्याच्या खटाटोपीनंतर अखेर जुलै २०१५ मध्ये मंजुरी मिळून जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरील मुख्य गणेश विसर्जन घाट, आयआयटी मार्केट जंक्शन आणि गांधीनगर येथे महानगर पालिकेकडून सार्वजनिक शौचालय उभारण्यात आली. मात्र काही दिवसातच पालिकेच्या देखरेखेखाली असणाऱ्या आयआयटी मार्केट जंक्शन आणि गांधीनगर येथील शौचालयांची दुरावस्था झाली असून, पाठीमागील दोन […]
आयआयटीजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू
@रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण आयआयटी मेनगेटजवळ काल (शुक्रवारी) रात्री ७.३० वाजता झालेल्या अपघातात एका इसमाला आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना पवईत घडली. संजय सदानंद मयेकर (४३) असे या मृत इसमाचे नाव आहे. ओल्या रस्त्यावरून मोटारसायकल घसरून हा अपघात झाल्याचे प्रत्यक्ष दर्शीचे म्हणणे आहे. पवई पोलीस त्याला चिरडणाऱ्या अज्ञात वाहनाचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आहेत. यासंदर्भात पवई […]
युथ पॉवरच्या छत्री वाटप आंदोलनाला ‘बेस्ट’ यश; बस थांब्यावर बसवले छप्पर
रविराज शिंदे पवईमधील आयआयटी येथील सर्वच बस थांब्यांवर छप्पर नसल्याने प्रवाशांना पावसाळ्या सोबतच उन्हातान्हात सुद्धा त्रास सहन करत बस येईपर्यंत ताटकळत उभे राहावे लागत होते. या बस थांब्यावर छप्पर उभारण्यात यावेत यासाठी, ‘युथ पॉवर’ संघटनेच्यावतीने बेस्ट प्रशासनाला कानपिचक्या काढत प्रवाशांना छत्री वाटप करून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची बेस्ट प्रशासनाने दखल घेत अखेर पवईतील […]
आयआयटीचे बस स्टॉप हलवले, पण नक्की कोणासाठी? – संतप्त नागरिक
जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवरील आयआयटी मेनगेट येथील जोगेश्वरीच्या दिशेने जाणारा बेस्ट बस स्टॉप वाहतुकीला अडथळा आणत असल्याने, १ तारखेपासून आयआयटी मेनगेट पादचारी पुलाजवळ हलवण्यात आला आहे. बस स्टॉपला हलवले गेल्याने येथील स्थानिकांना रहदारीतून रस्ता काढत लांब बस स्टॉपवर जावे लागत आहे. यामुळे हा बस स्टॉप नक्की नागरिकांच्या सेवेसाठी हलवला आहे? की व्यावसायिकाला होणाऱ्या अडचणीला […]