पवई परिसरात असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेच्या (IIT-Bombay) कॅम्पसमध्ये असलेल्या वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. दर्शन रमेशभाई सोळंखी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मृत विद्यार्थी हा मूळचा गुजरातमधील अहमदाबादचा असून, केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेकला प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आहे. आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट […]
Tag Archives | IIT Mumbai
पाईपवर चढून डोकावत होता विद्यार्थिनी वसतिगृहाच्या शौचालयात, पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
चंदीगड विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या शौचालयात विद्यार्थिनींचे कथित गुप्त चित्रीकरण केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरलेला असतानाच पवईमध्ये सुद्धा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयआयटी बॉम्बेमधून हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आयआयटी बॉम्बेमधील महीला वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या शौचालयापर्यंत पाईपवरून चढून खिडकीतून डोकावल्याच्या गुन्ह्यात पवई पोलिसांनी एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. चंदीगड विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या […]
आयआयटी मुंबई देशात पुन्हा नंबर वन
जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी ‘क्यूएस युनिव्हर्सिटी रँकिंग’ नुकतीच जाहीर झाली आहे. या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत पुन्हा बाजी मारत देशातील विद्यापीठांमध्ये आयआयटी मुंबई नंबर एकवर कायम राहिले आहे. आयआयटी मुंबईने जागतिक क्रमवारीत १७२ वा क्रमांक मिळवला आहे. शैक्षणिक प्रतिष्ठा, संस्थेची प्रतिष्ठा, शिक्षक विद्यार्थी सरासरी, शिक्षकांची कामगिरी, परदेशी शिक्षकांची सरासरी, परदेशी विद्यार्थ्यांची सरासरी असे निकष लक्षात घेत […]
आयआयटीतील शिक्षक, विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास मनाई; कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने निर्णय
पवई स्थित इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) मुंबई कॅम्पसमध्ये पाठीमागील काही दिवसात समोर येणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या पाहता आयआयटीतील शिक्षक, विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रसार रोखण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कॅम्पस बाहेर सलूनमध्ये जाण्याने हा संसर्ग झाला असण्याची शक्यता येथील पथकाने वर्तवली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात […]
७२ तासांत वसतिगृहे खाली करण्याचा आयआयटी मुंबईचा विद्यार्थ्यांना आदेश
जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाचा महाराष्ट्रात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयआयटी मुंबईमधील सर्व विद्यार्थ्यांना ७२ तासांत म्हणजेच शुक्रवार, २० मार्चपर्यंत वसतिगृहे खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंगळवारी संस्थेच्या सर्व विभागप्रमुख आणि प्रशासकीय प्रमुखांची तातडीची बैठक घेऊन येणाऱ्या ७२ तासांत आयआयटीमधील येण्या-जाण्यावर कडक निर्बंध लादण्याचा, वसतिगृहे खाली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेचे संचालक सुभाषिश चौधरी […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये मराठी पाऊले पडली पुढे
२७ फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ पासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या दोन्हीचे औचित्य साधत पवई इंग्लिश हायस्कूल ने गुरुवार, २७ फेब्रुवारीला […]
तंत्रज्ञानाच्या नावाखाली सामान्याच्या हातातील काम हिसकावतेय – मेधा पाटकर
‘तंत्रज्ञानामुळे अनेक मानवी हातातील कामे मशिन्सकडे आल्यामुळे तंत्रद्यानाच्या नावाखाली सामान्यांच्या हातातील काम हिसकावले जात आहे, याकडे कोणाचेही लक्ष नाही.” असे मत समाजसेविका मेधा पाटकर यांनी नुकतेच व्यक्त केले. पवई येथील आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये त्या बोलत होत्या. या चर्चासत्रासाठी पाटकर यांच्यासोबत आरटीआय कार्यकर्ते शैलेश गांधी सुद्धा उपस्थित होते. ३ ते ५ जानेवारी […]
पवई इंग्लिश हायस्कुल ४०व्या वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सवाची ‘झलक’
पवईतील सर्वात जुनी इंग्रजी माध्यमातील शाळा पवई इंग्लिश हायस्कूलने यावर्षी आपली ४० वर्षे पूर्ण केली आहेत. या आनंदाचा भाग म्हणून शुक्रवारी मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात त्यांचा ४०वा वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव “झलक” मोठ्या उत्साहात पार पडला. दोन भागात झालेल्या या शालेय उत्सवात यावेळी छोट्या कलाकारांनी कलेचे विविध रंग उधळत सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध […]
आयआयटी पवईच्या क्लासरूममध्ये भटक्या गाईचा फेरफटका
आयआयटी बॉम्बेच्या पवई येथील कॅम्पसमध्ये बैलांच्या जोडीने धावपळ करताना एका इंटर्नला जखमी केल्याची घटना अजून ताजी असतानाच, येथील एका क्लासरूममध्ये भटकी गाई घुसल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. भटकी जनावरे येथील विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत असतानाच त्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यात प्रशासन गुंतले असल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करत आहेत. एका क्लासरूममध्ये लेक्चर सुरु असताना एक गाय त्या […]
विद्यार्थीनीला अश्लील मॅसेज पाठवणाऱ्या प्रोफेसरला अटक
मुंबईतील एका नामांकित अभियांत्रिकी विश्वविद्यालयाच्या विद्यार्थीनीला सोशल मीडिया आणि इमेलच्या माध्यमातून मानसिक त्रास देणाऱ्या माजी प्रोफेसरला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने या पीडितेसह अन्य मुलींनादेखील असेच छळले असल्याचे समोर आले आहे. पवईतील एका नामांकित विश्वविद्यालयाच्या विद्यार्थीनीला सोशल मीडियाच्या माध्यमातून छेडणाऱ्या, तिला अश्लील मॅसेज आणि व्हिडीओ पाठवून तिला मानसिक त्रास देणाऱ्या विश्वविद्यालयाच्या माजी प्रोफेसरला पवई […]
आयआयटीकराच्या बँक खात्यावर ऑनलाईन डल्ला
आयआयटी पवई भागात राहणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणाच्या खात्यातील पैसे चोरट्याने ऑनलाईन लांबवल्याची घटना पवईत उघडकीस आली आहे. एटीएममधून पैसे काढायला गेलेल्या तरुणाला ही बाब लक्षात येताच त्याने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पवई येथील आयआयटी परिसरात राहणारे अविनाश आगळे, आयआयटी मुंबई येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. इंडियन ओव्हर्सीस बँकेच्या पवई प्लाझा […]
आयआयटी मुंबईच्या पीएचडी विद्यार्थ्यांचे कॅम्पस गेटबाहेर आंदोलन
विद्यार्थी कॅम्पस बाहेर आंदोलन करताना रविराज शिंदे आयआय मुंबईतील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावतीने शुक्रवारी (२१ डिसेंबर) प्रशासना विरोधात घोषणाबाजी करत कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांतर्फे आयआयटीत निषेध रँली सुद्धा काढण्यात आली. यावेळी विविध विषयांवर पीएचडी करणारे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. आपल्या प्रमुख मागण्यासहित अस्तित्व टिकवण्यासाठी, जगण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी […]
आयआयटी बॉम्बे नव्हे मुंबईच; मनसेचे आयआयटी प्रशासनाला पत्र
आयआयटी बॉम्बेचा उल्लेख आयआयटी मुंबई असा करणे चुकीचे आहे अशी नाराजी व्यक्त करत गुरुवारी प्रसारमाध्यमांना आयआयटी प्रशासनाने बॉम्बे असा उल्लेख करण्याच्या सूचना दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. आयआयटी प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शवत सोमवारी मनसेचे विक्रोळी विधानसभा विभाग अध्यक्ष विनोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम, अशोक जाधव व शाखा अध्यक्ष (१२२) शैलेश वानखेडे, […]