पाकिस्तानने कथित ‘रॉ’चे एजंट म्हणून अटक केलेले कुलभूषण जाधव हे एक व्यावसायिक असून, भारताला खबर न देता नागरिकाला अटक करणे, त्याला फाशीची शिक्षा देणे हे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे. जाधव यांच्याकडून जबरदस्ती आरोप कबुली केली असल्याचा आरोप करत भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपला दमदार पक्ष ठेवत पाकिस्तानचे सगळे पितळ उघडे पाडले आहे. गेल्या महिन्यात मिलिटरी कोर्टाचा […]
Tag Archives | NEWS
गटारात पडलेला फोन काढायला गेलेल्या दोघांचा मृत्यू
गटार सफाईवेळी आतमध्ये पडलेला मोबाईल काढायला गेलेल्या दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी साकीनाका परिसरात घडली. पवईतील तुंगा गावात राहणारा सचिन सुरेश पवार (२३), कुर्ला येथे राहणारा अजय उर्फ श्रीनिवास भगत कुंचीकरवे (२१) अशी या तरुणांची नावे आहेत. अजय आणि सचिन हे पालिकेच्या सफाई विभागात कंत्राटवर सफाई कामगार म्हणून काम करतात. याव्यतिरिक्त फावल्या […]
पवई तलाव भरला, धरण भागात कडेकोट बंदोबस्त
गेल्या आठवडाभर पडलेल्या पावसामुळे पवई तलाव भरला असून, मुंबईकरांचे आकर्षण असणारे पवई तलाव धरण ओसंडून वाहू लागले आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी तलाव भागात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शनिवारी सकाळपासूनच या भागात मुंबईकरांनी गर्दी केली होती. आठवडाभर मुंबईला पावसाने झोडपले आहे. तलाव क्षेत्रात मुबलक पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होत, शुक्रवारी संध्याकाळ पासून पवई तलाव तुडुंब […]
दुर्गादेवी शर्मा उद्यानाला मिळणार नवसंजीवनी, ४० लाखांचा फंड मंजूर
आयआयटी, चैतन्यनगर येथील दुर्गादेवी शर्मा उद्यान पुनर्जीवित करण्यासाठी आमदार निधीतून ४० लाख रुपयाचा फंड मंजूर झाला आहे. रविवारी ३ जुलै रोजी कामाचे उदघाटन आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते केले जाणार असून, लवकरच आयआयटीकरांना आपले हक्काचे उद्यान मिळणार आहे. शहरात अनेक मैदानांवर एकतर अतिक्रमण झाले आहे किंवा त्यांची दुरावस्था झाली आहे. पवईच्या आयआयटी भागात दुर्गादेवी शर्मा […]
जेवीएलआर मार्गावरील पहिले शौचालय जनतेसाठी खुले
रविराज शिंदे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर बनवण्यात येणाऱ्या चार शौचालयांपैकी, आयआयटी मार्केट येथे पहिले शौचालय बनवण्यात आले आहे. या शौचालयाचे उद्घाटन रविवारी स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले असून, मंजुरीनंतर एक वर्षानंतर अखेर आता ते जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. पुढील दोन महिन्यात उरलेल्या शौचालयांचे काम पूर्ण करून ती जनतेसाठी खुली केली जाणार आहेत. […]
पवई तलावातील मगरींचे संवर्धन, पालकत्व स्विकारण्यास पालिका, वन विभागाची टोलवाटोलवी
पवई तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे पवई तलाव प्रदूषित झाला असून, मगर दर्शन घडणाऱ्या मुंबईतील एकमेव पवई तलावातील मगरींचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. तलावातील वाढत्या प्रदूषणामुळे तलावात असणाऱ्या मगरींचा आधिवास संपुष्टात येत असल्याबाबत प्राणीमित्र आणि पर्यावरणवादी संस्थांनी तक्रारी दिल्या आहेत. मात्र, या मगरींचे संवर्धन करण्यास व पालकत्व घेण्यास महापालिका आणि ठाणे वन विभाग एकमेकांकडे बोटे दाखवत […]
तलावाला वाचवण्यासाठी काय करताय? उच्च न्यायालयाने म्हाडा व पालिकेला मागितले उत्तर
नैसर्गिक संपत्ती असणाऱ्या पवई तलावात गेले अनेक महिने दुषित, घाण, गटाराचे पाणी सोडून प्रदूषण केले जात आहे. पवई तलावाची गेल्या काही वर्षात झालेली दुर्दशा विचारात घेता, पवई तलाव वाचवण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने म्हाडा व मुंबई महानगरपालिकेने तलावाला वाचवण्यासाठी काय पावले उचलली आहेत? अशी विचारणा केली […]
पवई तलाव वाचवण्यापासून पालिका शोधतेय पळवाटा – स्थानिक नागरिक
पवई तलावाला गेल्या अनेक दिवसापासून गटाराचे सांडपाणी सोडून प्रदूषित केले जात आहे. यासंदर्भात स्थानिक जनता आणि पर्यावरणवादी संस्थेने पालिकेला तक्रारी दिल्या आहेत. मात्र हे सर्व पालिकेच्या संगनमताने होत असल्याने, पालिका अधिकारी संस्थेच्या प्रतिनिधिंना भेट देण्यास टाळाटाळ करत आहेत व बेजबाबदार वक्तव्य व उडवाउडवीची उत्तरे देवून पळवाटा शोधत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा […]