रविराज शिंदे उन्हामुळे शरिराची काहिली होत असतानाचा आयआयटी भागात बसथांब्यांवर लोकांना सावलीसाठी छत नसल्याने, प्रवाश्यांना कडक उन्हाच्या झळा सोसत उभे रहावे लागत आहे. वर्षानुवर्ष सोसत असणाऱ्या पवईकरांच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी, येथील युथपॉवरच्यावतीने प्रवाश्यांना छत्री वाटून अनोखा निषेध नोंदवत या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधणारा चिमटा काढला आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड निर्मिती दरम्यान या रस्त्यावर ठिकठिकाणी […]
Tag Archives | Powai Lake
सोमय्यांची पवई तलावाला भेट, पालिका अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर
अविनाश हजारे पवई तलावाचे होणारे गटार रोखण्यासाठी आवर्तन पवई, पॉज मुंबई आणि पवईकर यांनी हाती घेतलेल्या पवई तलाव मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी खासदार किरीट सोमय्या यांनी तलावाला भेट देत त्याची पाहणी करून झालेल्या दुरावस्थेसाठी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्वरित समस्या सोडवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या पवई […]
पवई तलावाला मगर पार्क घोषित करा – पॉज मुंबई
पवई तलावात सोडले जाणाऱ्या दुषित, घाण पाण्यामुळे तलाव प्रदूषित होत आहे. जे पाहता प्लॅंट एंड एनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) मुंबईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री (वन आणि पर्यावरण) प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे पवई तलावाला ‘मगर पार्क’ घोषित करण्याची मागणी केली आहे. सोबतच तलाव भागात परवाना आणि विनापरवाना दोन्ही प्रकारे चालणारी मच्छिमारी रोखण्याची मागणी सुद्धा […]
पवई तलावाचे झाले गटार, निसर्गप्रेमी चिंतेत
करोडो रुपये खर्च करून सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या पवई तलावातील पाण्यात आसपासच्या परिसरातून गटाराचे पाणी सोडण्यात येत आहे, त्यामुळे तलावातील पाणी दुषित होत असून, तलावात घाणीचे साम्राज्य पसरून तलावाचे रूपांतर हळूहळू गटारात होत आहे. संपूर्ण पवई तलावाच्या परिसरातून जाताना लोकांना येथून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नाकावर रूमाल ठेवून प्रवास करावा लागत आहे. मुंबईकर राजेश पिल्लाई यांनी फोन आणि […]
बसमध्ये अश्लील चाळे करणाऱ्याला रणरागिनीचा दणका, केले पोलिसांच्या हवाली
बसमधून प्रवास करताना अठरा वर्षीय कॉलेज विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या एका विकृताला त्या रणरागिनीने चांगलाच इंगा दाखवला आहे. सहप्रवाशांची साथ मिळत नसतानाही तिने धाडस करून त्याला धरून पवई पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत पोलिसांनी आरोपी अशोक नलवे (४३) यास भादवी कलम ३५४ अन्वये गुन्हा नोंद करत अटक केली आहे. गोरेगाव येथील एका नामांकित कंपनीत प्रशिक्षण घेत […]
मगरीच्या हल्ल्यानंतर स्थानिकांची सुरक्षा कुंपणाची मागणी
पवई तलावात मासेमारीसाठी जाणाऱ्या लोकांवर होणारे मगरीचे हल्ले वाढलेले आहेत. जे पाहता तिरंदाज व्हिलेज आणि स्थानिक परिसरातील लोक पोलीस आणि पालिका प्रशासन यांना सुरक्षा कुंपणाची मागणी करणारे पत्र देणार आहेत. पवई तलावातील ठराविक भागात सुरक्षा कुंपण टाकून स्थानिक मच्छीमारांसाठी ती जागा मासे पकडण्यासाठी सुरक्षित करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात येणार आहे. स्थानिक नगरसेवक आणि […]
पवई तलावात मगरीचा हल्ला, मच्छिमार गंभीर जखमी
पवई तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या आयआयटी तिरंदाज व्हिलेजमध्ये राहणारे मच्छिमार बाबू भुरे (५०) यांच्यावर पद्मावती मंदिराजवळ मगरीने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच परिवारातील विजय भुरे याच्यावर ऑगस्ट २०१० मध्ये हल्ला करून मगरीने जीव घेतला होता. पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरींचे साम्राज्य आहे. तशा सूचना देणारे फलकही पवई […]
पवई, एव्हरेस्ट हाईट इमारतीमध्ये आग
पवईतील लेकहोममधील आगीच्या जखमा अजून ताज्या असतानाच, आज (बुधवारी) याच परिसरातील एव्हरेस्ट हाईट या गगनचुंबी इमारतीच्या १०व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १००३ मध्ये दुपारी ३.५० वाजता एसीत शोर्ट सर्किट होऊन आग लागली. मुंबई अग्निशमन दलाच्या ४ टँकर्स, ३ बंब, २ स्कायलिफ्टच्या साहय्याने काही तासांतच अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. स्थानिक नागरिक आणि कामगारांनी तत्परता […]
पवईत कारमधून लॅपटॉप, आयपॅड चोरी
पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कारची काच फोडून लॅपटॉप आणि आयपॅड चोरीस गेल्याची घटना काल पवईमध्ये घडली आहे. याबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे पार्किंगमध्ये गाड्या लावणाऱ्या मालक व चालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार हेमंतकुमार तरवरे हे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता पवईत कामानिमित्त आले होते. कामाच्या […]
डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान उदघाटनाच्या प्रतीक्षेत
रविराज शिंदे पवई तलाव आणि परिसर हे मुंबईकरांच्या पर्यटन स्थळाच्या यादीतील महत्वाचे ठिकाण आहे. या भागात सौंदर्यीकरण प्रकल्प राबवल्यापासून हा भाग मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला असतानाच, पवईतील एल-अँड-टी समोरील २२ एकर जागेवर विस्तारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मात्र अजूनही उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी १७ कोटीं रुपयांचा खर्च पालिकेतर्फे करण्यात आला असून, या […]
शुक्रवारी व शनिवारी पवई तलावावर मगर दर्शन
पवई तलाव भागात मॉर्निंग वॉकला येणारे, सकाळी कामावर जाणारे आणि पर्यटक अशा सर्वांना पवई तलावाच्या भागात जवळपास ८ फुटी मगरीचे दर्शन घडल्याने, शुक्रवारची सकाळ ही पवईकर आणि येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मगर दर्शन घडवणारी सकाळ ठरली. काही वेळाने तलावातील गाळ काढण्याचे काम करणारे यंत्र जवळ येताच मात्र ही मगर पुन्हा पाण्यात परतल्याने, याची खबर लागल्यावर उशिरा […]
पवई प्रेसवर पवईकरांच्या वतीने नगरसेवकांना दहा प्रश्न
महानगरपालिका निवडणूका आता काही महिन्यांवर आल्या आहेत. अशात सध्याचे नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नांवर काय काम केले? कोणत्या समस्यांचे निवारण केले? याचा लेखाजोखा समोर यावा म्हणून, पवईकरांचे प्रतिनिधित्व करत रिपब्लिकन पक्षाचे वार्ड क्रमांक ११५ चे अध्यक्ष विनोद लिपचा यांनी ‘पवई प्रेस’च्या माध्यमातून स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांना दहा प्रश्न विचारले आहेत. ज्याची उत्तरे त्यांनी स्वतः किंवा आपल्या […]
पवई तलावावर मगरींसोबत आता अजगरांचेही साम्राज्य
पवई तलाव भागात आता मगरीं सोबतच विविध जातीच्या साप आणि अजगरांचे साम्राज्य उभे होत आहे. गेल्या महिनाभरात पवई तलाव भागात किनाऱ्यावर अनेक मोठमोठाले अजगर रोडवर अथवा पदपथावर येऊ लागल्याने आता या भागात यांचे पण साम्राज्य असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र पवई तलाव भागात स्वच्छता मोहिम चालू असल्याने आता या अजगरांना लपण्यास जागा न उरल्याने ते […]
प्राणी मित्र सुनिष सुब्रमण्यम कुंजू यांना ‘बिल्ड इंडिया’ पुरस्कार प्रदान
प्राणी हक्क कार्यकर्ता आणि प्लॅण्ट अॅण्ड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी – मुंबई व एनव्हीरो केअर वेलफेयर सोसायटीचे संस्थापक मा. श्री. सुनिष सुब्रमण्यनम कुंजू यांना नवी दिल्ली येथे आयोजित एकविसाव्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक समारोह २०१५ मध्ये ‘बिल्ड इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, भरात देशाला विविध क्षेत्रात […]
पवई तलाव स्वच्छता मोहिमेला अखेर सुरुवात
स्थानिक आणि पर्यावरण प्रेमींनी कडक विरोध दर्शवला असतानाही, अखेर पवई तलाव स्वच्छता मोहिमेला सुरुवात झालेली आहे पवई तलावाची दिवसेंदिवस होत चाललेली दुर्दशा सावरण्याचा खटाटोप करणाऱ्या पालिका प्रशासनाने अखेर त्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. ७.१५ करोड खर्च करून पवई तलाव स्वच्छता आणि ५ वर्ष त्याच्या देखभालीचे काम किंजल कंस्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले असून, तलाव […]
आजपासून ३ दिवस पवई उद्यान व तलाव भागात थांबण्यास बंदी
आजपासून तीन दिवस, म्हणजेच २५, २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी पवई तलाव आणि उद्यान परिसरात पर्यटक आणि नागरिक यांना संध्याकाळी ५ नंतर थांबण्यास मनाई करण्यात आलेली आहे. शरद पोर्णिमाचे (कोजागरी पोर्णिमा) निमित्त साधत ही बंदी महापालिकेतर्फे घालण्यात आलेली आहे. पवई तलाव आणि परिसर हे पूर्व उपनगरातील पर्यटन स्थळांपैकी सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणून मानले जाते. रविवारी […]
पवई तलाव स्वच्छता मोहिमेला स्थानिकांचा विरोध, महापालिकेचा नवा ‘फंडा’ संशयाचा भोवर्यात
पवई / अविनाश हजारे पवई तलाव आणि परिसर सुशोभिकरणासाठी आजवर जवळपास १०० करोड रुपये खर्च केल्यानंतरही, ‘जैसे थे’ असणाऱ्या परिस्थितीला सावरण्यासाठी, सांडपाणी, कचरा, टाकाऊ पदार्थामुळे प्रदूषित झालेला पवई तलाव पुन्हा एकदा चकाचक करण्याची योजना महापालिकेने हाती घेतली आहे. यासाठी ७.१५ करोड रुपये खर्च ही मंजूर करण्यात आलेला आहे. हा सगळा खटाटोप आपले खिसे भरण्यासाठी तर […]
पवईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा
“हिरानंदानीचा राजा” – तेजस्विनी महिला सेवा संस्था आणि हिरानंदानी ग्रुपच्या वतीने संस्कृती जपण्याचे काम या गणेशोत्सवाच्या निमित्ताने केले गेले आहे. देखाव्यातून दुर्ग-किल्ले यांची महाराष्ट्राला लाभलेली अद्वितीय संपदा दाखवण्याचा प्रयत्न व त्यांची जपणूक याबद्दल संदेश दिला गेला आहे. किल्यामध्ये विराजमान असणाऱ्या बाप्पारुपी राजाच्या सेवेत असणारा मूषक वाद्यवृंद खूप उत्तमरित्या सादर केला आहे. “पवईचा सम्राट” – स्टार […]
गौरी-गणपती विसर्जन
प्रमोद चव्हाण
बाप्पा पावला; पावसाची दमदार हजेरी, झाडे उन्मळून पडली
मुंबईमध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाट आणि वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे हवेत बराच गारवा निर्माण झाला होता. पवई भागात वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ईडन इमारत परिसरात उभे असणारे एक झाड उन्मळून पडले. लागूनच असणाऱ्या सुरक्षा भिंतीवर हे झाड पडल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारचे मोठे नुकसान झाले नाही. पावसाने दडी मारल्याने राज्यावर दुष्काळाचा डोंगर […]