“परिसरातील पाण्याच्या समस्येचा पाठपुरावा मी शिवसेना शाखाप्रमुख या नात्याने गेली अनेक महिने करत आहे. या संपूर्ण मंजुऱ्या या शिवसेनेच्या पाठपुराव्यातून झालेल्या आहेत आणि याचे संपूर्ण श्रेय हे शिवसेनेचेच आहे. याचे श्रेय लाटू इच्छिणाऱ्यांनी पाठपुराव्याचे पुरावे द्यावेत” – निलेश साळुंखे – शाखाप्रमुख ११५. “शाखाप्रमुख हे मंजुरीच्या स्तरावर असणाऱ्या प्रकल्पांची माहिती मिळवून पत्रव्यवहार करून नेहमीच श्रेय लाटण्याचा […]
Tag Archives | powai news
उंदीर स्टाईल ज्वेलरी शॉपची लूट
अनोळखी चोराने उंदराप्रमाणे भुयारी मार्ग खोदून, मध्यरात्री ज्वेलरी शॉपमध्ये घुसून, दुकानातील १.७ लाखाची चांदिचे दागिने लुटून घेवून गेल्याची अनोखी घटना साकिनाका पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. दुकानाच्या जवळून जाणाऱ्या ड्रेनेज लाईन सोयीचा आधार घेत, चोरट्याने भुयारीमार्ग बनवून दुकानात प्रवेश करत ही चोरी केली आहे. याबाबत साकिनाका पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे. […]
भिमजल्लोष २०१६ ची कार्यकारिणी जाहीर
आयआयटी / अविनाश हजारे महामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य जयंतीसाठी गठीत झालेल्या “भिमजल्लोष २०१६” ची कार्यकारिणी अखेर जाहीर झाली आहे. १४ फेब्रुवारी रोजी आयआयटी, महात्मा फुलेनगर येथील पंचशील बुद्ध विहारमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत या कार्यकारिणीचे गठन झाले असून, विभागातील युवा कार्यकर्त्यांवर भिमजल्लोष यशस्वी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ […]
शुक्रवारी व शनिवारी पवई तलावावर मगर दर्शन
पवई तलाव भागात मॉर्निंग वॉकला येणारे, सकाळी कामावर जाणारे आणि पर्यटक अशा सर्वांना पवई तलावाच्या भागात जवळपास ८ फुटी मगरीचे दर्शन घडल्याने, शुक्रवारची सकाळ ही पवईकर आणि येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मगर दर्शन घडवणारी सकाळ ठरली. काही वेळाने तलावातील गाळ काढण्याचे काम करणारे यंत्र जवळ येताच मात्र ही मगर पुन्हा पाण्यात परतल्याने, याची खबर लागल्यावर उशिरा […]
सुरक्षा व्यवस्थेला भेदत ऑफिसमध्ये १२ लाखाची चोरी
हिरानंदानी येथील डेल्फी इमारतीत घुसून एका चोरट्याने एकाच कंपनीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील ऑफिसमध्ये घुसून १० लाखाचे दागिने आणि २ लाखाची रोख रक्कम असा १२ लाखाच्या संपत्तीवर हात साफ केला आहे. विशेष म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराभोवती कपडा गुंडाळून चोरी करणाऱ्या चोरट्याने या चोरीची साधी कल्पनाही सुरक्षा व्यवस्थेला लागू न देता व आपली ओळख पूर्णपणे लपवून […]
अजून एक दिशाहिन बंदुकीची गोळी हिरानंदानीत
दिशाहीन बंदुकीच्या गोळीने टोरीनो इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला आपले शिकार बनवण्याच्या घटनेला एक आठवडाही उलटला नसेल कि, अजून एक अशीच दिशाहीन गोळी हिरानंदानीतील एवलॉन इमारतीत २६व्या मजल्यावरील घरातील बाथरूममध्ये पोहचली. याबाबत पवई पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र बैलेस्टिक तज्ञांनी पाहणी करून, मिळालेली गोळी ही जवळच्या अंतरावरून आल्याचे […]
पार्कसाईटमध्ये पुन्हा सिलेंडर स्फोट, ३ जणांचा दुर्देवी मृत्यू
रविराज शिंदे वीज मीटर बॉक्समध्ये लागलेल्या भीषण आगीत घरातील दोन सिलेंडरचा स्फोट होऊन एका महिलेसह दोन मुलांचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना काल शनिवारी पार्कसाईट येथे घडली. अग्निशमन दलाच्या ४ फायर इंजिन आणि ३ पाण्याच्या बंबाच्या मदतीने तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. ४ महिन्यापूर्वीच विक्रोळी पार्कसाईट येथील सिलेंडर स्फोटात सात जणांना […]
नोकरीचे आमिष दाखवून १९ वर्षीय मुलीला साकिनाका येथे डांबून ठेवणाऱ्याला अटक
आपल्या गरीब कुटूंबाला मदतीचा हात देण्यासाठी नोकरीच्या शोधात असणाऱ्या नालासोपारा येथील १९ वर्षीय मुलीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून, रविवारी साकिनाका येथे बंदिस्त खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. याबाबत मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईनवर मुलीने फोन करून मदतीची साद घालताच साकिनाका पोलिसांनी परिसरात सर्च मोहीम राबवून मुलीची सुटका केली. मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर अपहरण करणाऱ्या दुकलीतील एकाला सोमवारी […]
रोहित वैमुला आत्महत्येच्या निषेधार्थ पवईकरांचा रास्ता रोको
ठिकठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्ते व जनतेचा मूक मोर्चा, रास्ता रोको आणि कॅन्डेल मार्च हैद्राबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वैमुला याच्या आत्महत्येचे पडसाद देशभर उमटत असताना, शनिवारी सकाळी आयआयटी पवई येथील नागरिकांनी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून व काही काळ रास्ता रोको करून आपला निषेध नोंदवला. युथ पॉवर सह धम्मदीप सोशल कल्चरल असोसिएशन, साय्यमो व्हुमन संस्था, स्वराज्य युथ […]
हिरानंदानीत सुरक्षा रक्षक दिशाहिन बंदुकीच्या गोळीचा शिकार
घाटकोपर पोलीस प्रशिक्षण केंद्रातून दिशाहिन झालेल्या बंदुकीच्या गोळीने मंगळवारी हिरानंदानी येथील टोरिनो इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रकाश दास (२८) यास आपले टार्गेट बनवले. सुरक्षा रक्षकाच्या मानेत घुसलेली गोळी पवई हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून काढण्यात आली असून, तो आता पूर्णपणे बरा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत पवई पोलिसांनी गोळी चाचणीसाठी पाठवून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला […]
पार्कसाईटमधील उद्यान वाचविण्यासाठी जनता एकवटणार, काळे झेंडे दाखवून करणार विरोध
रविराज शिंदे पार्कसाईट येथील ४० वर्ष जुन्या सुभेदार रामजी मालोजी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकी पाठीमागे स्थानिक नगरसेवकाचा हे उद्यान हडपण्याचा डाव आहे, असा आरोप करीत स्थानिक व आंबेडकरी जनता उद्यान वाचवण्यासाठी या विरोधात एकवटली आहे. रविवारी १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उद्घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून जनता याला विरोध दर्शवणार आहे. पार्कसाईट येथे महानगरपालिकेचे ४० […]
खोट्या नावाने नोकरी मिळवून, ४ लाखाची चोरी करणाऱ्या मोलकरणीला पवईमध्ये अटक
सावधान इंडिया मालिकेतून प्रेरित होऊन अनेक महाविद्यालीन मुलींना चित्रपट क्षेत्रात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवल्याचे तपासात उघड काम मिळवून देणाऱ्या संस्थेत खोटी कागदपत्रे सादर करून, पवईमधील रहेजा विहार येथे एका व्यावसायिकाच्या घरात २४ तास मोलकरणीचे काम मिळवून, त्यांचा विश्वास संपादन करून ३.५ लाखाचे दागिने आणि ५० हजाराच्या रकमेवर हात साफ करणाऱ्या वैजयंती मोरेश्वर कामत […]
शॉर्ट सर्किटमुळे इंदिरानगरमध्ये आग, जीवितहानी नाही
रविवारी रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान इंदिरानगर येथील चाळीत असलेल्या इलेक्ट्रिक मिटर बॉक्सला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अर्ध झोपेत असणाऱ्या लोकांना आगीची माहिती मिळताच स्थानिकांची धावपळ उडाली, मात्र दक्ष नागरिक व पोलीस यांच्या सतर्कतेमुळे आणि वेळेत पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा धोका टळला. पवई आयआयटी येथे मोठ्या प्रमाणात बैठ्या चाळीचे जाळे आहे. यापैकी इंदिरानगर येथील […]
पवईकरांच्या समस्या आता कार्टून बॅनरच्या माध्यमातून
अनेक वर्ष समस्यांशी लढणाऱ्या पवईकरांनी पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेट, आंदोलन, लोकप्रतिनिधींसाठी बनवलेली माध्यमे अशा अनेक प्रकारे आपल्या समस्या लोकप्रतिनिधीं समोर मांडल्या आहेत, परंतु त्याचे निवारण सोडा, साधे उत्तर सुद्धा लोकप्रतिनिधींकडून मिळत नाही आहे. म्हणूनच लोकप्रतिनिधींना आपल्या समस्या समजावून देण्यासाठी स्थानिक जनतेने आता लोकप्रतिनिधी वापरात असलेल्या बॅनरबाजी या माध्यमाचाच वापर केला आहे. मात्र या बॅनरवर अक्षरातून नव्हे तर […]
फुलेनगरमध्ये पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीस अटक
एक रुपया देण्याचे आमिष दाखवून, पवईमधील फुलेनगर भागात राहणाऱ्या एका ५४ वर्षीय क्रूरकर्म्याने, आपल्या शेजारी राहणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी घडली आहे. या प्रकरणी क्रूरकर्म करणारा अशोक चाळके यास पवई पोलिसांनी अटक केली असून, वैद्यकीय तपासणी करून उद्या न्यायालयात सादर केले जाणार आहे. पिडीत मुलगी ही आपल्या आई वडिलांसह आयआयटी येथील […]
पवई प्रेसवर पवईकरांच्या वतीने नगरसेवकांना दहा प्रश्न
महानगरपालिका निवडणूका आता काही महिन्यांवर आल्या आहेत. अशात सध्याचे नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नांवर काय काम केले? कोणत्या समस्यांचे निवारण केले? याचा लेखाजोखा समोर यावा म्हणून, पवईकरांचे प्रतिनिधित्व करत रिपब्लिकन पक्षाचे वार्ड क्रमांक ११५ चे अध्यक्ष विनोद लिपचा यांनी ‘पवई प्रेस’च्या माध्यमातून स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांना दहा प्रश्न विचारले आहेत. ज्याची उत्तरे त्यांनी स्वतः किंवा आपल्या […]
संघर्षनगरकरांना मिळाला पर्यायी रोड
संघर्षनगरकरांची पर्यायी मार्गाची फरपट आता संपली असून, बिल्डिंग क्रमांक ३२ पासून महाराष्ट्र काटा, खैराणी रोड पर्यंतच्या पर्यायी रस्त्याचे काम नगरसेवक निधीतून केले गेले आहे. या रस्त्यामुळे गेल्या ७ वर्षापासून पर्यायी मार्गासाठी संघर्षनगरकरांची चाललेली फरपट थांबली असून, घाटकोपर, साकिनाका या भागातून येणाऱ्या छोट्या गाड्यांना आता फिरून येण्याची गरज उरलेली नाही. या रस्त्याच्या मार्गे सरळ संघर्षनगरमध्ये प्रवेश […]
आयआयटीच्या मुलाचा घात कि अपघात?
दिड महिन्यांपासून गायब असणारा व कर्जतच्या जंगलात भ्रमंतीसाठी गेलेला आयआयटी मुंबईचा (पवई) विद्यार्थी श्रीनिवास चंद्रशेखरचा मृतदेह कर्जत तालुक्यातील सांडशी जंगलात डोंगरकपारीत आढळून आला. २५ ऑक्टोबर रोजी कर्जतच्या जंगलात भ्रमंतीसाठी गेलेला श्रीनिवास अचानक गायब झाला होता. याची माहिती हॉस्टेल सहकार्यांनी त्याच्या पालकांना दिल्यानंतर, आईवडिलांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दिली होती. शेवटी शोधपथकाला शुक्रवारी संध्याकाळी ७ […]
हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पडून चिमुरडी जखमी, मृत्यूशी देतेय झुंज
पवईतील एका नामांकित हॉटेलमध्ये साडेसहा वर्षाची चिमुरडी शुक्रवारी स्विमिंग पूलमध्ये पडून गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या हिरानंदानी रुग्णालयात उपचार चालू असून, ती अत्यावस्थेत असल्याबद्दल बोलले जात आहे. याबाबत नातेवाईकांनी हॉटेल प्रशासन विरोधात कोणत्याही प्रकरचा गुन्हा दाखल केला नसून, आम्ही अधिक तपास करत असल्याचे पवई पोलिसांनी सांगितले. मध्यप्रदेशची असणारी आस्था रमानी ही एका नातेवाईकाच्या लग्नासाठी […]
लोकलमधून पडून पवईतील तरुणाचा मृत्यू
मुंबईच्या जीवनवाहिनीचा तिसरा बळी, कोपर-डोंबिवली दरम्यान घडली घटना आयआयटी l रविराज शिंदे मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या लोकलच्या गर्दीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून निष्पाप मुंबईकरांना यामुळे निष्कारण बळी पडावं लागत आहे. भावेश नकाते, नितीन चव्हाण या दोन तरूणांचा लोकलच्या गर्दीमुळे लटकत जाताना पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आपल्या मित्रांसोबत कल्याण येथे फिरायला गेलेल्या पवईतील […]