घरी पोहचल्यावर मुलीने तिच्या आईला घडला प्रसंग सांगितल्यानंतर दोघींनी पवई पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला. ट्युशन क्लासमध्ये शिकणाऱ्या एका १३ वर्षाच्या मुलीला केबिनमध्ये बोलावून तिच्याशी लैंगिक संबंधाबाबत बोलत अश्लील वागणूक दिल्याप्रकरणी पवई पोलिसांनी गुरुवारी एका ४२ वर्षांच्या ट्युशन शिक्षकाला प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ओफेंस (पोक्सो) कायद्यांतर्गत अटक केली आहे. सचिन गुलाब हांडे असे […]
Tag Archives | Powai Police
तरुणीचे विवस्त्र व्हिडीओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला राजस्थानमधून अटक
पवई पोलिसांच्या हद्दीतील मरोळ भागात राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीशी प्रेमाचे नाटक करून, व्हिडीओ चॅट दरम्यान तिचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करून, ते सोशल माध्यमात टाकण्याची धमकी देवून ते टाळण्यासाठी पैशाची मागणी करून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला पवई पोलिसांनी बारनेर, राजस्थान येथून अटक केली आहे. जतिन कुमार रमेश कुमार सिकरानी (वय १९) असे अटक आरोपीचे नाव आहे. […]
सात दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
गणेश विसर्जन घाटाजवळ होमगार्ड अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू
पवई येथे शनिवारी रात्री घडलेल्या हिट अँड रन अपघातात एका २५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण हा होमगार्ड अधिकारी होता. शनिवारी रात्री कर्तव्यावरुन परतत असताना हा अपघात घडला. पवई पोलिसांनी याबाबत अज्ञात वाहनचालकाविरुध्द निष्काळजीपणे आणि हयगयीने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन काशिनाथ धुमक यांना शनिवारी मरोळ […]
दिड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जणेत, ढोल-ताशे आणि बॅंजोच्या निनादासह आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात दिड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपती बाप्पाचे मंगळवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. सोमवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दिड दिवस पाहूणचार घेतल्यानंतर मंगळवारी […]
सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्यांना पोलिसांनी काढायला लावल्या उठाबशा
सार्वजनिक ठिकाणी नशा करायला बसताय? सावधान! तुम्हाला काढायला लागू शकतात उठाबशा. वायरल होणारया एका व्हिडीओमध्ये पवईत सार्वजनिक खेळाच्या मैदानात काही तरुण आपले कान पकडून उठाबशा काढताना दिसत आहेत. नाही, ही कोणत्याही शाळेने किंवा कॉलेजने आपल्या विद्यार्थ्यांना दिलेली शिक्षा नाही, तर पवई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्या तरुणांना दिलेली शिक्षा आहे. तरुणांना कायद्याच्या कचाट्यात अडकवून ठेवण्यापेक्षा […]
पॅसेंजर म्हणून प्रवास करून पवईत रिक्षावाल्यांना लुटणारी टोळी गजाआड
पवई, साकीनाका भागात रात्रीच्या वेळी रिक्षात प्रवास करून रिक्षाचालकांना लुटणाऱ्या टोळीतील दोघांच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर त्यांच्या अजून एका साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. इम्रान पिरमोहम्मद शेख (वय २१ वर्षे), शिवम उर्फ गुड्डू ब्रम्हदेव झा (वय २० वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पाहिजे आरोपी युनुस उर्फ शेरू जावेदअली सैयद याचा […]
धार्मिक विधीच्या नावाखाली चोरी करणाऱ्या महिलेविरोधात पवई पोलिस ठाण्यात गुन्हा
तुमच्या घरात आर्थिक चणचण आहे का? मुलबाळ होत नाही का? मग मी सांगते तो उपाय करा, असे सांगून धार्मिक विधी करण्याच्या निमित्ताने घरात घुसून, घरातील मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला आहे. तुमच्या घरात आर्थिक चणचण आहे का?, तुम्हाला मुलबाळ होत नाही का?, मी त्यासाठी उपाय करते, असे कारण सांगून घरात घुसत धार्मिक विधी करण्याच्या निमित्ताने […]
एल अँड टी एमराल्ड आयल इमारतीत भटक्या कुत्र्यावर क्रूरता करणाऱ्या सुरक्षा रक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल
प्राणीमित्र कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर पवई पोलिसांकडून गुन्हा नोंद पवईतील एल अँड टी एमराल्ड आयल इमारतीत एका भटक्या कुत्र्याला मारहाण करत क्रूरता दर्शवणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या विरोधात अखेर २३ ऑगस्टला पवई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पवई पोलिस याचा अधिक तपास करत असून, मुंबईतून पसार झालेल्या आरोपी सुरक्षा रक्षकाचा शोध घेत आहेत. प्राणीमित्र, प्राणी हक्क कार्यकर्ते, […]
आयआयटी कॅम्पसमधून वायर चोरी करणाऱ्या टोळीसह भंगारवाल्याला अटक
आयआयटी पवई कॅम्पस भागातील सुरक्षा व्यवस्थेला भेदत, येथील तांब्याच्या वायर चोरी करणाऱ्या टोळीच्या तीन लोकांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शुक्रवारी उशिरा अटक केली आहे. या गुन्ह्यातील सगळा चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगारवाल्याला सुद्धा पवई पोलिसांनी अटक करत संपूर्ण चोरीचा माल हस्तगत केला आहे. राहूल नारायण तायडे (२६), संतोष बाबासाहेब गोरे (२६), विनोद राजाराम गुलगे […]
पवईत नामांकीत हॉटेलमधून चालणार्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड, ३ पिडीत महिलांची सुटका
सोशल मीडियामध्ये वेश्याव्यवसायाची जाहिरात करून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवले जात होते. एका नामांकीत हॉटेलमधील कॅशियरसोबत हातमिळवणी करून सोशल मिडिया, वेबसाईट जाहिरातींच्या माध्यमातून पवईत चालणार्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखा कक्ष सातने पर्दाफाश केला आहे. रविवारी हॉटेल रिलॅक्स इन रेसीडेन्सी हॉटेलमध्ये छापा मारत, संबंधित सेक्स रॅकेटमधील पीडित ३ महिलांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये हॉटेलच्या कॅशिअरला […]
९ हजारांच्या परताव्याच्या नावाखाली ठगाने बँक खात्यातून सव्वा लाख उडवले
परदेश वारीच्या वेळी केलेल्या नाश्त्याचे नऊ हजार रुपये ट्रव्हल एजेन्सीकडून परत मिळविण्याच्या नादात एका गृहिणीला सव्वा लाख रुपयाचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. पवई पोलीस ठाण्यात यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पवई पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या ३९ वर्षीय तक्रारदार गृहिणीने मार्च महिन्यात पर्यटन सुविधा देणाऱ्या एका नामांकित कंपनीच्या वेबसाईटवरून सिंगापूर येथे फिरण्यास जाण्यासाठी […]
पवईत शालेय वेळेत शाळेजवळ वाहने पार्क करताय? सावधान ! भरावा लागू शकतो ५००० रुपयांचा दंड
साकीनाका वाहतूक विभागाकडून गुरुवारी शाळेजवळ आणि मुख्य रस्त्यांवर पार्क गाड्यांवर करण्यात आली कारवाई. दुपारी १२ ते १ वेळेत शाळेजवळ आणि त्याच्या मुख्य रस्त्यांवर नो पार्किंग’. पवई भागात सध्या वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशात शालेय वेळेत पालक, शालेय विद्यार्थ्यांना घेवून येणारी खाजगी वाहने रस्त्यांवर पार्क केल्याने वाहतूक कोंडी जास्तच वाढत असते. या समस्येवर […]
पवई तलावात पोहायला गेलेल्या १६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू
पवई तलावात आपल्या मित्रांसोबत पोहायला आलेल्या १६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल (सोमवारी) संध्याकाळी ६.२० वाजता पवई तलाव भागात घडली. सत्यम गुप्ता असे या मुलाचे नाव असून, तो विक्रोळी टागोरनगर येथील रहिवाशी होता. याबाबत पवई पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विक्रोळी येथील टागोरनगर भागात राहणारे काही तरुण काल संध्याकाळी पवई […]
पूर्व वैमनस्यातून पवईत एकाचा खून
मोबाईल चोरीच्या वादाचे कारण पुढे करत पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना काल (शनिवार) रात्री ८.३५ वाजण्याच्या सुमारास पवईत घडली. विनोद पाल उर्फ काली असे मृत तरुणाचे नाव आहे. या गुन्ह्यात शैलेंद्र उर्फ नन्नु यादव आणि रघू राजभर यांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि पाल याचा एकेकाळचा मित्र […]
पवईत जेव्हीएलआरवर दोघांचा संशयास्पद मृत्यू
पवई येथील जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर एक तरुण आणि एक महिला दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांना संशयास्पद रित्या रोडवर सापडले होते. त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. यातील आयआयटी मेनगेट बसस्टॉप पासून काही अंतरावर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या विद्यार्थ्याचा ब्रेन हेमरेजमुळे मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत हिरानंदानी बसस्थानकाजवळ रस्त्यावर एक महिला मृतावस्थेत पोलिसांना मिळून आली होती. तिच्या शरीरात […]
पवई पोलिसांनी पकडला ३७ किलो गांजा; दोघांना अटक
पवई परिसरात मोठ्या ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना विकण्यासाठी आणलेल्या ५.५ लाखाच्या गांजासह पवई पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. अनिकेत अमर पवार (२४), सुरेश झोकु गुप्ता (३८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कलम ८ (क) सह २० एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करून, त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पवई पोलिसांनी […]
कुलभूषण जाधव खटल्यात १५-१ मतांनी निकाल भारताच्या बाजूने
पवईकर आणि माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव खटल्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) आज निकाल सुनावला. ६.३० वाजता सुरु झालेल्या या निकालात भारताच्या बाजूने निकाल देण्यात आलेला आहे. १६ न्यायमूर्तींनी दिलेल्या या निकालात १५ विरुद्ध १ असा निर्णय भारताच्या पारड्यात पडला. केवळ पाकिस्तानच्या न्यायमूर्तींनी या विरोधात आपले एक मत नोंदवले. या निर्णयामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला […]
पवई पोलिसांनी वाचवले ब्रिटिश नागरिकाचे प्राण, ब्रिटिश हाय कमिशनकडून कौतुक
नैराश्यात असणारा एक ब्रिटिश नागरिक आत्महत्येच्या प्रयत्नात असताना, दीड तास दरवाजातील पत्र टाकण्यासाठी असणाऱ्या जागेतून त्याची मनधरणी करत, पवई पोलिसांनी दाखवलेल्या संयम आणि प्रसंगावधानामुळे त्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. सॅम कॉलर्ड (६०) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ब्रिटीश नागरिकाचे नाव आहे. आजारपणाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलले होते असे समोर आले आहे. याबाबत ब्रिटिश हाय […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती
तरुण पिढीला सहज उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांमुळे अनेक तरुण, तरुणी त्याच्या आहारी गेली आहेत. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे लहान मुलांवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणे सुद्धा नवीन नाहीत. अशावेळी आपल्या विद्यार्थ्यांना काय योग्य आणि काय अयोग्य; एक वाकडे पाऊल आयुष्य कसे उध्वस्त करू शकते याची जाणीव करून देण्यासाठी पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये २६ जून, “जागतिक अंमली पदार्थ […]