माणूसकी फाऊंडेशन पवईच्यावतीने ‘माझं पवई मी स्वछ ठेवणार’ या विचाराला घेऊन पवई तलाव आणि परिसरातील गार्डनमध्ये स्वछता मोहीम राबवण्यात आली. माणूसकी फाऊंडेशन चे पवई विभागाचे प्रतिनिधी रोशन पुजारी यांच्या आयोजनाखाली होळी आणि धुलीवंदनच्या दिवशी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्वछता मोहीम उपक्रमात गौतमनगर येथील लहान मुलांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला होता. संस्थेचे ५ […]
Tag Archives | Powai
महिलेचा खून करून, खाडीत फेकून पुरावा नष्ट करणाऱ्या दोघांना पवई पोलिसांनी केली अटक
पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार ऑगस्ट २०१९ रोजी दाखल झाली होती. याचा तपास सुरु असताना ८ महिन्यानंतर ही महिला हरवली नसून, महिलेचा खून झाला असल्याचे समोर येताच, पवई पोलिसांनी तिचा पूर्व पती आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. निसार सिकुर शेख (३२) आणि धुवचंद्र उर्फ लल्लन तिवारी (३४) अशी अटक […]
वसंथा मेमोरियल कॅन्सर सेंटरमध्ये १००० पेक्षा अधिक संशयितांचे स्क्रीनिंग्ज
वसंथा मेमोरियल कॅन्सर सेंटर, मुंबईने अजून एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. केंद्रात महिलांसाठी केल्या जाणाऱ्या गर्भाशय ग्रीवांच्या स्क्रिनिंगने १००० महिलांच्या तपासणीचा टप्पा पार केला आहे. १५ जून २०१९ रोजी विक्रोळी पश्चिमेकडील पार्कसाईट भागात सुरु करण्यात आलेल्या वसंथा मेमोरियल च्या नवीन केंद्राचे उद्घाटन झाल्यापासून ट्रस्ट या भागात महिलांमधील कर्करोग जागरूकता वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करीत आहे. […]
आयआयटी मुंबई जगातील ‘टॉप ५०’ इंजिनियरिंग संस्थांमध्ये; देशात पहिली
सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत इंजिनिअरिंग एंड टेक्नोलॉजी विभागात पवईतील आयआयटी मुंबई ने ‘टॉप ५०’मध्ये स्थान पटकावले आहे. याच क्रमवारीत आयआयटी मुंबई ने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग नुकतीच घोषित करण्यात आली आहे. यात इंजिनिअरिंग एंड टेक्नोलॉजी वर्गात पवई येथे असणाऱ्या आयआयटी मुंबईने जगात ४४वा क्रमांक पटकावला आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस इन्स्टीट्युट ऑफ […]
पवईकर विवेक गोविलकर यांच्या पुस्तकाला ‘प्रभाकर पाध्ये’ स्मृती पुरस्कार’
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे (कोमसाप) साहित्यकांना देण्यात येणारे विविध विभागातील वाड्.मयीन पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यंदाचा प्रतिष्ठीत ‘प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार’ पवईकर आणि विविध भाषेतील पुस्तकांचे परीक्षण लेखक आणि कादंबरीकार विवेक गोविलकर यांच्या ‘हा ग्रंथ सागरू येव्हडा’ या पुस्तकाला देण्यात आला आहे. यावेळी कवियत्री प्रज्ञा पवार यांना ‘कविता राजधानी’, तर कादंबरी विभागात ‘र. वा. दिघे […]
पवईचे स्वच्छता दूत: तरूणांनी हातात झाडू घेत केली शौचालयाची स्वच्छता; बसवले सीसीटिव्ही
@रविराज शिंदे पवईतील महात्मा फूले नगरातील शौचालयाची दयनीय अवस्था झाल्याचे पालिका ‘एस’ विभागाला वेळोवेळी कळवूनसुद्धा ते याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक तरुणांनी हातात झाडू घेत या शौचालयाची स्वच्छता केली. यामुळे त्रस्त रहिवाशांना दिलासा मिळाला असून, टाळाटाळ करणाऱ्या पालिकेला आणि जनप्रतिनिधींना सणसणीत चपराक मारली आहे. पवईतील आयआयटी भागाला लागून असणारा फूलेनगर परिसर हा असंख्य झोपड्या […]
लैंगिक छळाच्या आरोपाखाली तरुणाचे अपहरण करून लुटले
बहिणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करीत पवई पोलिसांच्या हद्दीत तीन अज्ञात इसमांनी एका २६ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्यांच्याजवळील मौल्यवान वस्तू लुटल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पवई पोलिसांनी याबाबत जबरी चोरीच्या आरोपाखाली भारतीय दंड संहिता कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. साकीनाका येथील एका आर्थिक सेवा कंपनीमध्ये तक्रारदार सुनील पाटील सहाय्यक म्हणून […]
बँकेच्या लॉकरमधून २३ लाखाची चोरी
प्रातिनिधिक छायाचित्र पवईतील हिरानंदानी येथील एका नामांकित बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलेल्या २३ लाखाच्या मौल्यवान वस्तूंवर अज्ञात व्यक्तींनी हात साफ केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये हिऱ्यांच्या आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. या संदर्भात चोरीचा गुन्हा दाखल करून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील हिरानंदानी […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये मराठी पाऊले पडली पुढे
२७ फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ पासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या दोन्हीचे औचित्य साधत पवई इंग्लिश हायस्कूल ने गुरुवार, २७ फेब्रुवारीला […]
किरकोळ वादातून आयआयटी पवई येथे तरुणाचा खून
हातगाडी लावण्याच्या वादातून गोखलेनगर येथे एका तरुणाचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवार (१९ फेब्रुवारी) १२.३० वाजता पवईत घडला. चाकूने छातीत भोकसून अमोल सुराडकर (२५) या तरुणाचा खून करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पवई पोलिसांनी शिताफीने सचिन सिंग आणि जितेंद्र उर्फ प्राण या दोघांना पळून जाण्याच्या तयारीत असताना कुर्ला येथून अटक केली आहे. या संदर्भात […]
पवईत जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर धावत्या ट्रकला आग
पवई – जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरून निघालेल्या एमएच ०४ एचडी १२७० धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना रविवारी सकाळी पवईत घडली. इंजिनमध्ये बिघाड होऊन धावत्या ट्रकला आग लागल्याचे वाहनचालकाने सांगितले. वाहनाच्या टायरला आणि डिझेल टँकला याची झळ बसली. स्फोट होण्यापूर्वीच अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर आयआयटी […]
डोक्यात हातोडी घालून पत्नीचा खून; आरोपी पतीला अटक
पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून खून करुन पळून गेलेल्या आरोपी पतीला पवई पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या आहेत. अजित नारायण लाड (६७) असे या आरोपी पतीचे नाव आहे. त्यांच्यावर त्याची पत्नी शिला अजित लाड (६५) हिची हत्या केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता १९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली […]
पवईत सुरक्षा रक्षकाचा खून करून पसार झालेल्या आरोपीला दिल्लीतून अटक
२ खून करून उत्तरप्रदेश पोलिसांच्या हातावर तुरी देत १२ वर्ष पसार असणाऱ्या आरोपीला पवई पोलिसांनी गुन्ह्याच्या ३ महिन्यातच ठोकल्या बेड्या. पवईतील तुंगागाव येथील लोढा सुप्रीम या रहिवाशी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पाठीमागील वर्षी २७ ऑक्टोबरला पवईत घडला होता. इमारतीच्या पार्किंग परिसरात सुरक्षा रक्षक रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांना मिळून आला होता. इमारतीत लिफ्ट ऑपरेटर […]
पवईत महिलेचा राहत्या घरात खून; पती बेपत्ता
पवईतील शिवशक्तीनगर येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय महिला शीला अजित लाड यांचा अज्ञात व्यक्तीने तिच्या राहत्या घरात खून केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली आहे. खून झालेल्या ठिकाणी पोलिसांना तिच्या नवऱ्याने लिहलेली सुइसाईड नोट मिळून आली असून, तो बेपत्ता आहे. या संदर्भात पवई पोलीस भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. गारमेंट कामगार […]
पवई पोलीस ठाणेच्या वपोनि पदी सुधाकर कांबळे
पवई पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) अनिल फोपळे हे सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या जागी वपोनि म्हणून सुधाकर कांबळे यांनी नुकताच पदभार सांभाळला आहे. भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पोलीस दलात सेवा बजावणे पसंत केले आहे. कांबळे हे १९९६च्या बॅचचे अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी डोंगरी, पायधुनी, एमएचबी, आझाद मैदान पोलीस ठाणे अशा अतिसंवेदनशील भागातील पोलीस […]
मराठी अभिनेत्रीच्या विनयभंग प्रकरणी तिघांविरुद्ध साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
५ फेब्रुवारीला पुणे येथील रांजणगाव येथे कार्यक्रमात सादरीकरण करत असताना मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या एका अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नृत्य तारका म्हणून प्रसिद्ध असणारी ही अभिनेत्री चांदिवली येथील नहार कॉम्प्लेक्समध्ये राहते. अभिनेत्रीचा विनयभंग केल्यानंतर तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. ज्यानंतर या अभिनेत्रीने साकीनाका […]
भविष्य निर्वाह निधी मिळवून देण्याच्या नावाखाली ७ लाखाचा ऑनलाईन गंडा
चांदिवली येथे राहणाऱ्या आणि एका नामांकित पेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकारयाला भविष्य निर्वाह निधी (पीएफ) मिळवून देण्याच्या बहाण्याने ७ लाखाला ऑनलाईन गंडविल्याची घटना नुकतीच पवईत समोर आली आहे. २१.५४ लाख रुपये त्याच्या पीएफ खात्यात जमा असून, ते मिळवण्यासाठी विविध फीच्या नावावर भामट्यांनी त्यांना ७ लाखाचा गंडा घातला आहे. १० वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले […]
स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२० अंतर्गत पवईतील भिंती चिञमय
@रमेश कांबळे, सुषमा चव्हाण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२०’ अंतर्गत पवईतील पदपथाला लागून असणाऱ्या संरक्षक भिंतीवर आकर्षक चिञे काढून त्यातून स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे. पालिकेच्या ‘एस’ विभागान्तर्गत तयार होत असलेल्या या चित्रनगरीमुळे पवईतील रस्ते चित्रमय तर होणारच आहेत, मात्र यातून विविध संदेश सुद्धा नागरिकांना दिले जात आहेत. विविध पक्ष, संघटनांच्या भिंतीवरील जाहिराती आणि […]
मेट्रो-६ भूमिगत करण्याच्या समर्थनात पवईत सह्यांची मोहीम
आज, रविवार (२ फेब्रुवारी) संध्याकाळी ४.३० ते ६.३० यावेळेत चांदिवली डी-मार्टजवळ भूमिगत मेट्रो-६ समर्थनात सह्यांची मोहिम राबवली जाणार आहे. पवईतील विविध भागात भूमिगत मेट्रो -६ च्या समर्थनात सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. आज रविवार (२ फेब्रुवारी) चांदिवली डी-मार्टजवळ आणि रहेजा विहार येथे ही मोहिम राबवली जाणार आहे. संध्याकाळी ४.३० ते ६.३० यावेळेत भूमिगत मेट्रोच्या मागणीच्या […]