Tag Archives | protest

raheja vihar protest

नशाखोरी रोखण्यासाठी रहेजाकर मैदानात

चांदिवली येथील रहेजा विहार भागात वाढत्या नशेखोरीला रोखण्यासाठी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे, रविवारी येथील रहिवाशांनी मैदानात उतरत धरणे आंदोलन करत आपला निषेध नोंदवला. बाहेरील भागातून येणाऱ्या मुलांमुळे येथे नशाखोरी वाढत असल्याचा आरोप करत येथील नागरिकांनी लेक साईड इमारत समोरील पालिका मैदानात मोठ्या प्रमाणात हजेरी लावत प्रशासना विरोधात हे धरणे आंदोलन केले. जवळपास […]

Continue Reading 0
IIT Students protest

आयआयटी मुंबईच्या पीएचडी विद्यार्थ्यांचे कॅम्पस गेटबाहेर आंदोलन

विद्यार्थी कॅम्पस बाहेर आंदोलन करताना रविराज शिंदे आयआय मुंबईतील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावतीने शुक्रवारी (२१ डिसेंबर) प्रशासना विरोधात घोषणाबाजी करत कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांतर्फे आयआयटीत निषेध रँली सुद्धा काढण्यात आली. यावेळी विविध विषयांवर पीएचडी करणारे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. आपल्या प्रमुख मागण्यासहित अस्तित्व टिकवण्यासाठी, जगण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी […]

Continue Reading 0
mumbai-consumers-protest-against-inflated-power-bills

वाढीव विज बिलांविरोधात नागरिकांचा साकीनाका कार्यालयावर मोर्चा

नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मुंबई उपनगरातील वीजग्राहकांना ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’ कंपनीकडून आलेल्या वाढीव बिलांमुळे येथील नागरिक त्रस्त झाले  आहेत.  या वाढीव बिलाविरोधात आज (बुधवार, १२ डिसेंबर) संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून अदानी कंपनीचा निषेध केला. आपला निषेध नोंदवण्यासाठी कंपनीच्या साकीनाका येथील वीज भरणा केंद्रावर नागरिकांचा मोर्चा धडकला. यावेळी चांदिवली, साकीनाका, मरोळ तसेच आसपासच्या विभागातील वीजग्राहक मोठ्या संख्येने रस्त्यावर […]

Continue Reading 0
BJP sangharshnagar protest

संघर्षनगरच्या रस्त्यावरून भाजपा आक्रमक; विकासकाच्या कार्यालयावर हल्लाबोल

चांदिवली संघर्षनगर भागात विकासक, पालिका, स्थानिक प्रतिनिधी सर्वांनीच दुर्लक्ष केल्यामुळे अजूनही येथील नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत. याबाबत सतत पाठपुरावा करूनही काहीच परिणाम जाणवत नसल्यामुळे शुक्रवारी स्थानिक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विकासक सुमेर कॉर्पोरेशनच्या कार्यालयावर हल्लाबोल करत धरणे दिले. बोरीवली राष्ट्रीय उद्यान आणि आसपासच्या परिसरात असणाऱ्या राहणाऱ्या हजारो परिवारांना दहा वर्षापूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन योजने […]

Continue Reading 0
rangoli andolan

रोड नुतनीकरणात होणाऱ्या दिरंगाई विरोधात शिवसेनेचे रांगोळी आंदोलन

पालिका रस्ते विभागाकडून आयआयटी, पवई येथील प्रशांत अपार्टमेंट रोडवर गेल्या दोन महिण्यापासून सिमेंटकॉक्रीट रोड निर्मितीचे काम सुरु आहे. रोड निर्मितीच्या कामात होणाऱ्या दिरंगाईमुळे लोकांना त्रास होत असल्याकारणाने शिवसेनेने आज रोडवर उतरत खोदकाम केलेल्या रस्त्यावर रांगोळी काढून आंदोलन केले. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी व्हिडीओ लिंकवर क्लिक करा.

Continue Reading 0
shivsena durgadevi sharma garden

आयआयटी, पवई येथील दुर्गादेवी शर्मा उद्यानातील झाडांच्या कत्तली विरोधात शिवसेनेचे श्रद्धांजली आंदोलन

पवई, आयआयटी येथील दुर्गादेवी शर्मा उद्यानात शिवसेनेच्या आमदार फंडातून सुरु असलेल्या कामाच्यावेळी लावलेली रोपटी स्थानिक नगरसेवकांच्या दबावाखाली पालिका ‘एस’ उद्यान विभागाने उपटून टाकून त्यांची हत्या केल्याचा आरोप करत शिवसेनच्यावतीने आज पवईमध्ये श्रद्धांजली आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी दुर्गादेवी शर्मा उद्यानात जमा होत उद्यानात काढून फेकलेल्या आणि सुकलेल्या रोपट्यावर सफेद कपडा टाकून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. […]

Continue Reading 0

हॉकिंग झोनला आयआयटीकरांचाही विरोध

पालिकेने ३ जानेवारी २०१८ रोजी आपल्या वेबसाईटवर घोषित केलेल्या हॉकिंग झोनच्या यादीमध्ये पवईतील हिरानंदानीतून हॉकिंग झोन हटवल्याचे दाखवत असतानाच आयआयटी भागात मात्र बनणाऱ्या हॉकिंग झोन्समध्ये वाढ केली आहे. या निर्णयामुळे येथील नागरिक सुद्धा निराश झाले असून, त्यांनी याला आपला कडक विरोध दर्शवला आहे. सोशल माध्यमातून याची जनजागृती करत लोकांनी पालिकेच्या समोर आपला विरोध ठेवला आहे. […]

Continue Reading 0
00

फेरीवाला क्षेत्राच्या विरोधात नागरिकांचा मोर्चा

@प्रमोद चव्हाण पालिका ‘एस’ वार्ड अंतर्गत येणाऱ्या पवईतील हिरानंदानी परिसरातील सर्व रस्त्यांना हॉकिंग झोन घोषित करण्यात आले आहे. फेरीवाले येण्याने होणाऱ्या त्रासाला रोखण्यासाठी आज संध्याकाळी ५ वाजता हिरानंदानी गार्डन रहिवाशी फेडरेशनतर्फे हिरानंदानी येथे शांततापूर्वक विरोध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध समाजसेवी संस्थांसह, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. अधिकृत […]

Continue Reading 0

शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे पवईत सरकार विरोधात निदर्शने

– अविनाश हजारे – ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सरकारविरोधी वणवा पेटला असतानाच, त्याची ठिणगी शहरी भागातही येऊन पोहोचली आहे. ठिकठिकाणी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक संस्था, संघटना पुढे येत आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डीवायएफआय व अन्य समविचारी संघटनेंच्यावतीने बुधवारी ७ जूनला पवईमध्ये सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी इतिहासात पाहिल्यांदाच शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसत […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!