सकाळ, दुपार, संध्याकाळ असे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे पवईकरांच्या डोक्याचा ताप आणि हिरानंदानी पवईच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न बनलेल्या हिरानंदानी हॉस्पिटल येथील चंद्रभान शर्मा चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पोद्दार शाळा प्रशासन आणि हिरानंदानी प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून संपुष्टात आलेला आहे. आता एसएम शेट्टी शाळेजवळ होणारया वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी मिटणार असा प्रश्न पवईकर उपस्थितीत करत आहेत. जोगेश्वरी […]
Tag Archives | sakinaka traffic division
वाहतूक कोंडीचा ‘महामार्ग’; जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर गर्दीच्या काळात व्यावसायिक तीन चाकी वाहनांना बंदी
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेव्हीएलआर) वाहतुक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रयोगाच्या निमित्ताने सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या काळात जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड वापरण्यास हलक्या व मध्यम व्यावसायिक तीन चाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे आणि या मार्गावरून चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे जेव्हीएलआरच्या दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत […]
अभिनेता जितेंद्र जोशींनी व्हिडीओ ट्विट करून केली पवईतील बेशिस्त वाहनचालकांची तक्रार
वाहतूकीच्या नियमांची पायमल्ली करणारे मुंबईत पदोपदी पहायला मिळतात. मात्र त्यांच्या या कृत्यामुळे इतर प्रवाशांना नाहक त्रास होत असतो याचे मात्र त्यांना भान नसते. अशाच प्रकारे पवई येथील जलवायू विहार भागात रस्त्यांवर वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांचा व्हिडीओ पवईकर अभिनेते जितेंद्र जोशी यांनी मुंबई पोलीस यांना ट्विट करत तक्रार केली आहे. ट्विटमध्ये त्यांनी मुंबई वाहतूक पोलीस […]
पवईत शालेय वेळेत शाळेजवळ वाहने पार्क करताय? सावधान ! भरावा लागू शकतो ५००० रुपयांचा दंड
साकीनाका वाहतूक विभागाकडून गुरुवारी शाळेजवळ आणि मुख्य रस्त्यांवर पार्क गाड्यांवर करण्यात आली कारवाई. दुपारी १२ ते १ वेळेत शाळेजवळ आणि त्याच्या मुख्य रस्त्यांवर नो पार्किंग’. पवई भागात सध्या वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशात शालेय वेळेत पालक, शालेय विद्यार्थ्यांना घेवून येणारी खाजगी वाहने रस्त्यांवर पार्क केल्याने वाहतूक कोंडी जास्तच वाढत असते. या समस्येवर […]
बेजबाबदारपणे उभ्या शालेय बस, खाजगी वाहने आणि पालकांच्या गाड्यांमुळे हिरानंदानी जाम
एस एम शेट्टी शाळा, पोद्दार स्कूल आणि हिरानंदानी प्री-पायमारी स्कूल यांच्या वाहनांमुळे हिरानंदानी आणि जलवायू विहार भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही यात काहीच फरक पडला नसून, शाळेच्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने दिवसेंदिवस उग्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. याबाबत आता वाहतूक विभाग सुद्धा हतबल झालेला दिसत असून, नक्की करायचे काय? हा […]
अपघात रोखण्यासाठी साकीनाका वाहतूक विभागाची रस्ता सुरक्षा जनजागृती
साकीनाका वाहतूक विभाग आणि डन अंड ब्राडस्ट्रीट इन्फोर्मेशन सर्विसेस प्रायवेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने अपघात रोखण्यासाठी ‘३० व्या रस्ता सुरक्षा अभियान २०१९’ अंतर्गत पवईच्या रस्त्यांवर जनजागृती उपक्रम राबवला गेला. यावेळी साकीनाका वाहतूक विभागाचे पोलीस उप-निरीक्षक जगदाळे आणि पोलीस उप-निरीक्षक भटकर यांनी वाहनचालकांना मार्गदर्शन केले. राज्यात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असतात. अपघातात […]
विना हेल्मेट जाताना तरुणांना अडवणाऱ्या पोलिसाला तरुणाच्या वडिलांकडून मारहाण; तिघांना अटक
हेल्मेटशिवाय फिरत असणाऱ्या १९ वर्षीय तरुण बाईकर, त्याच्या मित्राला रोखणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्याची घटना पवईत घडली. एलएन्डटी येथे पोलिसांनी विनाहेल्मेट आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या लोकांच्यावर कारवाईसाठी लावलेल्या नाकाबंदीत हा प्रकार घडला. तिघा आरोपीना सरकारी कामात अडथळा आणण्याच्या गुन्ह्यात अटक करून पवई पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी तिथे ही धिंगाणा घातला. नशेत गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांना […]
पवई, चांदिवली पाच तास थांबली
प्रमोद चव्हाण, रविराज शिंदे, रमेश कांबळे “मुंबापुरी आणि मुंबईकर कितीही संकटे आली तरी कधीच थांबत नाहीत” असे म्हटले जाते. मात्र, मुंबईचा भाग असणारे पवई आणि चांदिवली आज जवळपास ५ तास वाहतूक कोंडीत थांबली. पवई आणि चांदिवली भागात सकाळी ९ वाजल्यापासूनच वाहतूक कोंडी निर्माण होण्यास सुरुवात झाली होती, त्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास पाच तास शाळेच्या […]
वाहतूक कोंडीतून सुटका: हिरानंदानीतील सेन्ट्रल एव्हेन्यू रोड आणि मेन स्ट्रीटवर ‘नो पार्किंग’
@प्रमोद चव्हाण वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणाऱ्या वायू आणि ध्वनी प्रदूषणात पवई दुसऱ्या स्थानावर असल्याचे नुकत्याच एका सर्वेक्षणातून समोर आले होते. मात्र आता यातील वाहतूक कोंडी या समस्येतून तरी हिरानंदानी लवकरच सुटणार आहे. येथील सेन्ट्रल एव्हेन्यू रोड आणि मेन स्ट्रीटला “नो पार्किंग झोन”घोषित करण्यात आले आहे. तसे संदेश देणारे फलकही ठिकठिकाणी लावण्यात आले असून, […]
बेजाबदारपणे उभ्या शालेय बस आणि पालकांच्या गाड्यांमुळे पवईमध्ये वाढतोय वाहतूक कोंडीचा प्रश्न
शैक्षणिक वर्षाचा शाळेचा पहिला दिवस उजाडला आणि पवईच्या रस्त्यांवर ‘राजा उदार आन जनता बेजार’ अशी अवस्था सकाळी सकाळी पवईकरांनी अनुभवली. कामाला जाणाऱ्यांची गडबड आणि त्यात शाळेत मुलांना घेवून येणारे बस चालक आणि पालक अशा दोघांनीही शाळेच्या आवारात भर रस्त्यांवर लावलेल्या गाड्यांमुळे पवईचे सगळे रस्ते सकाळी-सकाळी ‘हाउस फुल्ल’ झाले होते. आधीच पावसाळ्यात गाड्यांच्या कमी झालेल्या वेगांवर […]