Tag Archives | thieves

Thrilling Daytime Burglary Shakes Crystal Palace, Powai

क्रिस्टल पॅलेस इमारतीत घरफोडी, १० लाखाची रोकड पळवली

पवईतील रामबाग येथील क्रिस्टल पॅलेस इमारतीत फ्लॅट फोडून चोरट्याने घरातील १० लाखाची रोकड पळवल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. घरातील महिला कामानिमित्त मुंबईबाहेर असताना चोरट्याने हा डाव साधला आहे. विशेष म्हणजे महिलेच्या वडिलांच्या रामबाग येथील घरात पाठीमागील आठवड्यात नोकराने चोरी केली असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपाली गुरव (बदललेले […]

Continue Reading 0
raj grandeur

मास्क घालून चोरट्यांची पवईत उच्चभ्रू इमारतीत चोरी

पवईतील एका उच्चभ्रू इमारतीत घुसत चोरट्यांनी दिवसाढवळ्या चोरी केल्याची घटना सोमवारी घडली आहे. विशेष म्हणजे आपली ओळख लपवण्यासाठी चोरट्यांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क लावत इमारतीत प्रवेश करून फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली. पाठीमागील काही दिवसांपासून पवईतील विविध भागात चोरीच्या काही घटना वाढलेल्या असून, अशीच एक धक्कादायक घटना पाठीमागील सोमवारी पवई परिसरात उघडकीस आली […]

Continue Reading 0
A Roman warrior statue of Rs 70 lakhs was stolen by digging a tunnel

बोगदा खोदून ५ स्टार हॉटेलमधून पळवला ७ लाखाचा रोमन योद्ध्याचा पुतळा

प्रातिनिधिक छायाचित्र एका पंचतारांकित हॉटेलच्या भिंतीखाली बोगदा खोदून रोमन योद्ध्याचा पितळी पुतळा चोरणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अलीकडेच अटक केली आहे. रोमन योद्ध्याच्या या ३०० किलोच्या पुतळ्याची किंमत ७ लाख रुपये आहे. चोरट्यांनी जंगलात लपवून ठेवलेले पुतळ्याचे तुकडे पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले आहेत. रॉयल पाम्सच्या आत असलेल्या इम्पिरियल पॅलेस या पंचतारांकित हॉटेलमध्ये चोरी झाल्याची तक्रार १२ […]

Continue Reading 0
nsg cmnd house theft

पवईत चोरट्यांनी फोडले दारूचे दुकान, ८.५ लाखाची दारू आणि रोकड लंपास

सोमवारी राज्य सरकारच्या परवानगीनंतर पवईतील एक दारूचे दुकान उघडले असता दुकानात ८.५ लाखाची चोरी झाल्याचे समोर आले आहे. मालकाने दुकान उघडले असता दुकानातील ७.५ लाख किंमतीच्या दारूच्या बाटल्या आणि १.१० लाखाची रोकड चोरट्यांनी पळवल्याचे लक्षात आले. पवई पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर […]

Continue Reading 0
Thieves Stolen Gas cylinders from house because they did not get valuable; Two arrested1

चोरीत मौल्यवान वस्तू मिळाल्या नाहीत म्हणून गॅस सिलेंडर पळवले; दोघांना अटक

चोर चोरी करायला गेला मात्र घरात काहीच सापडले नसल्यामुळे काय चोरी करावे याचा प्रश्न पडलेल्या चोरट्याने चक्क घरातील २ गॅस सिलेंडर पळवून नेल्याची घटना पवईत घडली आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी माग काढत सादिक उर्फ अव्वा अक्काफी शेख (२३) आणि सलमान उर्फ दस्तगीर अस्लम खान (२८) याला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. पवईतील […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

घरफोडीच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगाराला अटक

पवईतील तुंगागाव, केबीएम कंपाऊंड साकीविहार रोड भागात घरात घुसून घरातील मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नुकतीच अटक केली आहे. दिपक उर्फ लीचू जगबीर सारसर (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पवई पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या ३ गुन्ह्यांची उकल त्याच्या अटकेतून झाली आहे. पवईतील तुंगागाव, केबीएम कंपाऊंड साकीविहार […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

भररस्त्यात चाकूहल्ला करून चोरी करणाऱ्या टोळीला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवईत दोन जणांवर भररस्त्यात चाकूहल्ला करून, चोरी करून पळून गेलेल्या तिघांच्या टोळीला पवई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. अश्रफ ऊर्फ सोनू अमीन शेख, स्वॅलेन ऊर्फ सोहेल शाहनवाज चौधरी आणि फैजान मन्नान सय्यद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघांनाही न्यायालयाने १६ तारखेपर्यंत (शुक्रवार) पोलिस कोठडी सुनावली आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुले […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

चांगला, टापटिपीत पेहराव करून, मोठ्या घरातील इसम असल्याचे भासवत मोठ्या इमारतींमध्ये प्रवेश करून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. रवींद्र सुरावत (२१) असे अटक आरोपीचे नाव आहे. उमा मल्होत्रा मरोळ येथील अशोक टॉवरच्या पाचव्या मजल्यावरील घरात आपल्या परिवारासोबत राहतात. २ जानेवारीला काही कामानिमित्त त्या घराबाहेर गेल्या होत्या. परत आल्यावर […]

Continue Reading 1

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!