वसंथा मेमोरियल कॅन्सर सेंटर, मुंबईने अजून एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. केंद्रात महिलांसाठी केल्या जाणाऱ्या गर्भाशय ग्रीवांच्या स्क्रिनिंगने १००० महिलांच्या तपासणीचा टप्पा पार केला आहे. १५ जून २०१९ रोजी विक्रोळी पश्चिमेकडील पार्कसाईट भागात सुरु करण्यात आलेल्या वसंथा मेमोरियल च्या नवीन केंद्राचे उद्घाटन झाल्यापासून ट्रस्ट या भागात महिलांमधील कर्करोग जागरूकता वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करीत आहे. […]
Tag Archives | vikhroli
पवईत भगवा फडकला – चांदिवलीतून दिलीप लांडे तर विक्रोळीतून सुनील राऊत विजयी
महाराष्ट्र राज्य विधानसभा २०१९ निवडणुकीचे निकाल गुरुवारी २४ ऑक्टोबरला घोषित करण्यात आले असून, पवईत शिवसेनेच्या उमेदवारांना पवईकरांनी पसंती दर्शवली आहे. चांदिवली मतदार संघातून दिलीप भाऊसाहेब लांडे तर विक्रोळी मतदार संघातून सुनील राऊत याना पवईकरांनी पसंती दर्शवत निवडून दिले आहे. विक्रोळी विधानसभेची निवडणूक एकतर्फी झाल्याप्रमाणे राऊत यांच्या झोळीत आली. मात्र चांदिवली विधानसभेत गेल्या २ दशकापासून आमदार […]
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाचे दागिने पळवले; हिरानंदानीतील घटना
आपले काम संपवून घरी परतत असणाऱ्या ७६ वर्षीय वृद्धाला पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने भामट्यांनी पळवल्याची घटना मंगळवारी पवईतील हिरानंदानी भागात घडली. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून सिसिटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील विजयविहार इमारतीत राहणारे विलास बांदेकर (७६) मंगळवारी सकाळी हिरानंदानी येथील आपल्या बँकेच्या शाखेत […]
वृद्धेला पोलीस असल्याचे सांगून २ लाखाचे सोन्याचे दागिने लांबवणारया भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात आपल्या मुलीच्या उपचारासाठी आलेल्या एका ६२ वर्षीय वृद्ध महिलेला पोलीस असल्याची बतावणी करून, २ लाखाचे दागिने लांबवणाऱ्या चोरट्याला अडीच महिन्यानंतर अखेर पोलिसांनी मालवणी येथून अटक केली आहे. गुलझार अली (३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मालवणी येथे इस्टेट एजंटचे काम करतो. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधा गौंडर (६२) […]
पवईत शाळेजवळ विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न?
पवई आयआयटी येथील एका नामांकित शाळेबाहेरून एका विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना काल दुपारी पवईत घडली. याबाबत शाळा प्रशासनाने पवई पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत शाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवई, आयआयटी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाचवीत शिकणार अनिकेत (बदलेले नाव) हा दुपारी १२.४५ वाजता शाळा सुटल्यानंतर आपल्या […]
वीजवाहिनीला आग लागल्याने पवईमध्ये वीज पुरवठा खंडित
टाटा पॉवरच्या वीजकेंद्रातील वीजवाहिनीला आग लागल्याने बुधवारी सकाळी पवईसह पूर्व उपनगरातील विक्रोळी, विद्याविहार आणि घाटकोपर परिसरातील वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. जवळपास दोन तासाने सव्वाअकरा वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला. भर उन्हाळ्यात बत्तीगूल झाल्याने उन्हाच्या पहाऱ्यात उकाड्याने येथील नागरिक घामाघूम झाले होते. टाटा पॉवरने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साळसेत येथील वीजकेंद्रातील वीजवाहिनीला शोर्टसर्किटमुळे आग लागल्यामुळे […]
मोदी सरकारच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जन आंदोलन
मोदी सरकारच्या काळात जिवनावश्यक वस्तूंच्या झालेल्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज संध्याकाळी ५ वाजता विक्रोळी स्टेशन येथे जन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. भाजीपाल्यासह गॅसचे व पेट्रोलच्या वाढीव दरामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे समर्थक आज रस्त्यावर उतरले होते. गेल्या आठवड्यात एलिफिस्टन रोड येथे रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या घटनेतील […]
शिक्षणाच्या अधिकारासाठी पवईकराची उपशिक्षण अधिकाऱ्याकडे धाव
कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सरकारने शिक्षणाधिकार कायदा मंजूर केला आहे. मात्र मुंबईतील काही शाळा यांना बगल देत पैसे उकळण्याचे काम करत आहेत. असेच एक पिडीत आणि पवईकर गौतम अंगरखे यांनी शाळेच्या या व्यवहाराला वैतागून सरळ उपशिक्षण अधिकाऱ्यांकडे धाव घेत तक्रार केली आहे. गौतम अंगरखे यांनी आपल्या सहा वर्षाचा मुलगा ईशान याच्या पहिल्या […]