पवईकरांनी गिरवले योगाचे धडे

योग हा ५००० वर्षांपूर्वीचा भारतात जन्मलेला शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक आभ्यास आहे. शरीर आणि मन दोन्ही निरोगी, तणावमुक्त राखणाचे काम योग करतो. ११ डिसेंबर २०१४ मध्ये युनायटेड नेशन्स महासभेने २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केले. ज्यानंतर संपूर्ण जगभर २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. याचाच भाग म्हणून पवईमध्ये सुद्धा या दिवशी अनेक स्वयंसेवी संस्था, शाळा, रहिवाशी सोसायटी, जेष्ठ नागरिक गृप यांनी योगा दिनाचे आयोजन केले होते. याच दिवसाचा आवर्तन पवईने घेतलेला आढावा.

आयआयटीचे बॉम्बेचे विद्यार्थी योगा करताना

आयआयटीचे बॉम्बेचे स्टाफ आणि कुटुंबातील सदस्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

आयआयटी बॉम्बेने विद्यार्थी, फॅकल्टी, स्टाफ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आयआयटी बॉम्बे समुदायाच्या सदस्यांच्या उत्साहपूर्ण सहभागासह चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.

चांदिवली मेगारुगास योग शिबीर

गेल्या दीड दशकात असंख्य योग साधकांना प्रशिक्षित करणारे श्री दीपक परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पवईकरांनी एक उल्लेखनीय योग शिबीराचा अनुभव घेतला. चांदिवली येथील मेगरुगास सभागृहातील शांत वातावरणात, योगी डीवाईन सोसायटी आणि जलजा फाऊंडेशनच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवई स्वामीनारायण मंदिराचे आध्यात्मिक प्रमुख श्री भरतभाई आणि वाशीभाई यांच्या उपस्थितीत तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी योगाची अनुभूती घेतली.

पवई इंग्लिश हायस्कूल

पवई इंग्लिश हायस्कूलच्या पूर्व प्राथमिक वर्गाचे विद्यार्थी योगाचे धडे गिरवताना

पवईमधील एस एम शेट्टी शाळा, पवई इंग्लिश हायस्कूल, हिरानंदानी फौंडेशन स्कूल, गोपाल शर्मा मेमोरीअल स्कूल, ज्ञान विद्यामंदिर शाळेतील शिक्षकांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांसोबत योगाचे धडे गिरवले.

गोपाल शर्मा मेमोरीअल स्कूल

ऑल मुंबई असोसिएशन ऑफ़ स्पोर्ट्स एंड फिटनेस फॉर ऑल

ऑल मुंबई असोसिएशन ऑफ़ स्पोर्ट्स एंड फिटनेस फॉर ऑल तर्फे आयआयटी, पवई येथे विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात आले. स्थानिक नगरसेवक वैशाली पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. फिटनेस गुरु रमेश जाधव यांनी देशाच्या भविष्यांना योगाचे धडे दिले.

एस एम शेट्टी शाळा

गोपाल शर्मा मेमोरीअल शाळेतील शिक्षक योगाचे धडे गिरवताना

गोल्डन ओक इमारतीतील महिलांनी आपल्या दररोजच्या दगदगीतून निघत योग दिवसाच्या कार्यक्रमात घेतलेला उस्फुर्त सहभाग

 

रहेजा विहार येथील मपेल लीफ सोसायटीत तरुणांसह जेष्ठ नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला

हिरानंदानी येथील गोल्डन ओक इमारतीतील महिलांनी आपल्या दररोजच्या दगदगीतून बाहेर पडत इमारत परिसरात आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात उस्फुर्त सहभाग घेतला. तर रहेजा विहार येथील मपेल लीफ सोसायटीत अरुण किरपेकर आणि शैला किरपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली “आम्ही सदृढ तर देश सदृढ” हे ब्रीदवाक्य घेवून शरीराला योगाकार दिला. भारतीय सशस्त्र दलातील आजी-माजी अधिकाऱ्यांचे वास्तव्यस्थान असणाऱ्या जलवायू विहार येथे माजी नौदल अधिकाऱ्याची पत्नी विजया सिंग यांच्या नेतृत्वात योग दिवस साजरा करण्यात आला.

 

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!