गौतमनगरमध्ये तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

@रविराज शिंदे
वईतील गौतमनगर पाईपलाईन येथे एका २३ वर्षीय तरूणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. जतिन रामचंद्र परब (२३) असे तरूणाचे नाव असून, तो परिवारासह गौतमनगर परिसरात राहतो.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आई-वडिलांना विना काही सांगताच जतिन घरातून बाहेर पडला होता. रात्रभर मुलगा घरी परतला नसल्याने आई-वडिलांनी सकाळी आसपास शोध शोध केली. मित्रांना फोन करून माहिती घेतली मात्र तो मिळून आला नाही.

शोधाशोध सुरु असतानाच जतिनचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत स्थानिकांना आढळून आला.

घटनेची माहीती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रूग्णालयात पाठविला.

“त्याच्या आत्महत्येमागचे नेमकं कारण समजले नसून, आम्ही अधिक तपास करत आहोत,” असे यावेळी बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes