बेस्ट बसने तरुणाला उडवले; जागीच मृत्यू

शनिवारी सकाळी पवई मिलिंदनगर भागात १०.४५ वाजता सिग्नलजवळ रोड पार करत असताना एका अज्ञात बेस्ट बस चालकाने तरुणाला उडवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राकेश नंदलाल पाटील (२४) असे तरुणाचे नाव आहे. पोलीस अज्ञात चालकाचा शोध घेत आहेत.

या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई मिलिंदनगर येथे आपल्या परिवारासह राहणारा राकेश हा विद्यार्थी होता. सकाळी १०.४५ दरम्यान आपल्या काही मित्रांना भेटण्यासाठी तो आपल्या मिलिंदनगर येथून घरातून निघाला होता. कॉम्प्लेक्सच्या बाहेर जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर असणाऱ्या सिग्नलजवळून रस्ता पार करत असताना एका भरधाव वेगात जाणाऱ्या बेस्ट बसने त्याला जोरदार धडक दिली.

जोरदार धडक बसल्याने तो सरळ रोडवर तोंडावर पडल्याने त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. अपघात होताच बेस्ट चालकाने गाडीसह तेथून लगेच पळ काढला. असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

‘त्याला त्वरित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.’ असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

भादवि कलम २७९, ३०४ (अ) सह मोटर वाहन कायदा कलम १३४ (ए) (बी) नुसार गुन्हा नोंद करून पवई पोलीस पाहिजे आरोपी बस चालकाचा शोध घेत आहेत.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes