मनसे उपाध्यक्ष उदय सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन

हाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) महाराष्ट्र उपाध्यक्ष उदय सावंत यांचे आज मीरारोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. टागोरनगर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. साईश्रद्धा अपार्टमेंट, गोदरेज हॉल समोर, विक्रोळी पूर्व येथून आज संध्याकाळी त्यांची अंतयात्रा निघणार असून, टागोरनगर स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मनसेच्या स्थापनेपासून विक्रोळी विधानसभा परिसरात पायाबांधणीच्या कामापासून महाराष्ट्रभर मनसेच बळकटीकरन करण्यात सावंत यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. २०१४ निवडणुकीच्या काळात नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी आपले जबाबदारी पार पाडली होती.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी याबाबत हळहळ व्यक्त करताना आपला वाघ हरवल्याची खंत यावेळी व्यक्त केली.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes