पवईत ४५ वर्षीय इसमाची विहीरीत उडी मारून आत्महत्या; शोधकार्य सुरूच

रविराज शिंदे, रमेश कांबळे


वईतील गणेशनगर परिसरातील पडक्या विहीरीत उडी मारून एका ४५ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना आज (मंगळवारी) दुपारी चारच्या सुमारास घडली. मंगेश रामचंद्र मोरे(४५) असे या इसमाचे नाव असून, तो मनोरूग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.

आई, मुली आणि भावासह तो गणेशनगर येथील चाळीत राहत होता. आज दुपारी घरात झालेल्या किरकोळ वादाच्या रागातून  तो घराबाहेर धावत आला. घरापासून काहीच अंतरावर असणाऱ्या जुनाट, पडक्या ब्रिटिशकालीन विहीरीत उडी घेवून त्याने आत्महत्या केली.

काही प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मंगेशला वाचण्याचे अतूट प्रयत्न करण्यात आले. मात्र ५० फूट खोल व दलदल विहिरीत असल्यामुळे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

मंगेश याने यापूर्वी सुद्धा दोन वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न मात्र त्यावेळी त्याला वाचवण्यात यश प्राप्त झाले असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

घटनास्थळी दाखल झालेल्या मुंबई अग्निशमन दलाकडून रात्री उशीरापर्यंत शोधकार्य सुरूच होते. अंधार झाल्यामुळे उशिरा शोधकार्य थांबवण्यात आले असून, उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात येणार असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes