Tag Archives | Indian Institute of Technology

Canteen-employee-arrested-for-pepping-after-iit-bombay-student-complained-against-him

आयआयटी – पवईमध्ये १८ वर्षीय विद्यार्थ्याची वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पवई परिसरात असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेच्या (IIT-Bombay) कॅम्पसमध्ये असलेल्या वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. दर्शन रमेशभाई सोळंखी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मृत विद्यार्थी हा मूळचा गुजरातमधील अहमदाबादचा असून, केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेकला प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आहे. आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट […]

Continue Reading 0
iit powai

आयआयटी मुंबई देशात पुन्हा नंबर वन

जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी ‘क्यूएस युनिव्हर्सिटी रँकिंग’ नुकतीच जाहीर झाली आहे. या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत पुन्हा बाजी मारत देशातील विद्यापीठांमध्ये आयआयटी मुंबई नंबर एकवर कायम राहिले आहे. आयआयटी मुंबईने जागतिक क्रमवारीत १७२ वा क्रमांक मिळवला आहे. शैक्षणिक प्रतिष्ठा, संस्थेची प्रतिष्ठा, शिक्षक विद्यार्थी सरासरी, शिक्षकांची कामगिरी, परदेशी शिक्षकांची सरासरी, परदेशी विद्यार्थ्यांची सरासरी असे निकष लक्षात घेत […]

Continue Reading 0
iit powai

मुंबई आयआयटीतील विद्यार्थीनीना विषबाधा

मुंबई आयआयटीमधील मुलींच्या हॉस्टेल क्रमांक १० मधील विद्यार्थीनीना गोड खाण्यातून विषबाधा झाल्याचे सोमवारी समोर आले आहे. ही विषबाधा शनिवारी झाल्याचे समोर येत असून, सुरुवातीला नाकारणाऱ्या आयआयटी प्रशासनाने सोमवारी सायंकाळी उशिरा मान्य केले. विषबाधेमुळे २५ विद्यार्थीनीना आयआयटीच्या अंतर्गत रुग्णालयात दाखल करून, उपचारानंतर सर्वांना सोडून देण्यात आले असल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र शेवटची बातमी हाती आली तोपर्यंत काही […]

Continue Reading 0
प्रातिनिधीक

टम – टम गेल्या, इलेक्ट्रीक बग्गीज आल्या

आयआयटी मुंबई विद्यार्थ्यांच्या कॅम्पस भ्रमंतीसाठी १० इलेक्ट्रीक बग्गीज जानेवारी अखेर पासून होणार दाखल. व्यवस्थापनाने १७ मिनी बस सेवा ज्यांना टम-टम म्हणून ओळखले जात होते त्यांना बंद केल्याच्या काही महिन्यांनंतरच ई-बग्गीज सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीन कॅम्पस पुढाकाराचे पुढील एक पाऊल म्हणून इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी-बी) कॅम्पस परिसरात प्रवासी वाहतुकीसाठी जानेवारीच्या अखेरीस १४-सीटर […]

Continue Reading 0
sofiya

सोफियाला भावली भारतीय संस्कृती; आयआयटी टेकफेस्टमध्ये दिली विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची उत्तरे

@रविराज शिंदे, सुषमा चव्हाण सौदी अरेबियाचे नागरिकत्व प्राप्त झालेल्या “सोफिया रोबोट”ने काल (शनिवारी) आयआयटी पवईमध्ये सुरु असणाऱ्या टेकफेस्टमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नारंगी – पांढरी साडी नेसलेल्या सोफियाने यावेळी त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच नमस्ते इंडिया! मी सोफिया! अशी सुरुवात करत तिने उपस्थितांची मने जिंकली. आशिया खंडातील सर्वात मोठा असा विद्यान – […]

Continue Reading 0
suicide

आयआयटी कॅम्पसमध्ये प्रोफेसरच्या मुलीची आत्महत्या

आयआयटी कॅम्पसमधील केंद्रीय विद्यालयात बारावीत शिकणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थिनीने कॅम्पसमध्येच असणाऱ्या शिवालिक इमारतीच्या १४व्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे वडील हे आयआयटीमध्ये प्रोफेसर असल्याचे बोलले जात आहे. सरोजा नांबियार (बदललेले अडनाव) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. पवई पोलिसांनी याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!