Tag Archives | rajawadi hospital

hatya

संपत्तीच्या वादातून पुतण्याने केला काकीचा खून

पवईतील फिल्टरपाडा येथे राहणाऱ्या एका तरुणाने संपत्तीच्या वादातून आपल्याच काकीचा खून केल्याची घटना पवईत मंगळवारी घडली. यानंतर तरुणाने स्वतःवर घाव करून घेत पवई पोलीस ठाणेत हजर झाला. रईसा शेख (४५) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव असून, तिचा पुतण्या तौसीफ शेख (२६) याला पवई पोलिसांनी उपचारानंतर अटक केली आहे. “मंगळवारी सकाळी रईसा आणि तौसीफ यांच्यात संपत्तीच्या […]

Continue Reading 0
injured

हिरानंदानी लेबर कॅम्पमध्ये पाण्याची टाकी पडून ७ कामगार जखमी, दोघांची स्थिती गंभीर

आज सकाळी हिरानंदानी कॉम्प्लेक्स, पवई येथील कामगार शिबिरात (लेबर कॅम्प) एक प्रचंड प्लास्टिकची पाण्याची टाकी पडून, सात बांधकाम मजूर जखमी झाल्याची घटना घडली. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी खैरलाल अलाम (३५) याला हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर स्थितीत असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी कामगार जितेंद्र निषाद (२१), रुपचंद निषाद […]

Continue Reading 0
IMG_7399

पवई क्रेन अपघात: अजून एक कामगाराचा मृत्यू, क्रेन चालकाला अटक

पवईमध्ये क्रेनचा भाग कोसळून घडलेल्या अपघातात मृतांची संख्या चार झाली आहे. रामनाथ सिंग (३८) याचा केईएम रुग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. निष्काळजीपणा बाळगल्याप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून क्रेनचालक मोहमद ताहेर (२४) याला अटक केली आहे. १ जानेवारीला पवईतील आयआयटी येथे आदिशंकराचार्य मार्गवर मलनिसारण वाहिनीचे काम सुरु असताना क्रेनचा भाग कोसळून तिथे काम करणाऱ्या […]

Continue Reading 0
IMG_7383

पवईत क्रेनचा भाग कोसळून तिघांचा मृत्यू, २ जखमी

पवईतील आयआयटी येथे आदिशंकराचार्य मार्गवर मलनिसारण वाहिनीचे काम सुरु असताना क्रेनचा भाग कोसळून तिथे काम करणाऱ्या ३ कामगारांचा मृत्यू झाल्याची आणि २ कामगार जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रामेश्वर समय (४०), सत्यनारायण सिंग (४०), रामनाथ सिंग (३८), विश्वनाथ सिंग (४५) आणि परेश सिंग (४२) […]

Continue Reading 2
fire in khairani road

खैरानी रोडवर फरसाण दुकानाला आग, १२ जणांचा मृत्यू

चांदिवलीतील खैरानी रोडवरील भानू फरसाण स्वीट दुकानाला भीषण आग लागल्याची घटना आज पहाटे ४.१५ वाजता घडली. या आगीत होरपळून १२ कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या ३ फायर इंजिन व ४ पाण्याच्या बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, बचावकार्य सुरु आहे. खैरानी रोडवरील मखारीया कम्पाऊंडमध्ये गाळा क्रमांक १ मध्ये […]

Continue Reading 0
घटनास्थळ

पवई येथील चिमुरडीच्या हत्ये प्रकरणी दोघांना अटक

तुंगागाव येथील चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात पवई पोलिसांनी रवी सोलंकी (२१) व इरफान (२१) अशा दोघांना आज (शनिवारी)अटक केली असून, अंधेरी कोर्टात दोघांना सादर करण्यात आले असता त्यांना अधिक तपासासाठी पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे. आजी-आजोबा आणि आत्यासोबत पवईतील साकिविहार रोडवरील तुंगागाव मुरली चाळीत […]

Continue Reading 3
घटनास्थळ

तुंगा परिसरातून हरवलेल्या लहान मुलीचा सापडला मृतदेह

तुं गा परिसरातून गायब झालेल्या श्रीया अजय मेश्राम, हिचा मृतदेह आज (बुधवारी) दुपारी १ वाजता तुंगा परिसरातील कृष्णा बिजनेस पार्क भागातील झाडीत, सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीच्या टाकीत आढळून आला आहे. रविवार रात्री ११ पासून तुंगागाव, साकीविहार रोड परिसरातून श्रीया गायब होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात घेऊन जाण्यात आला असून, पोलिसांनी अपहरण, बलात्कार, हत्या व पोस्का […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes