आयआयटीच्या मुलाचा घात कि अपघात?

prashnदिड महिन्यांपासून गायब असणारा व कर्जतच्या जंगलात भ्रमंतीसाठी गेलेला आयआयटी मुंबईचा (पवई) विद्यार्थी श्रीनिवास चंद्रशेखरचा मृतदेह कर्जत तालुक्यातील सांडशी जंगलात डोंगरकपारीत आढळून आला. २५ ऑक्टोबर रोजी कर्जतच्या जंगलात भ्रमंतीसाठी गेलेला श्रीनिवास अचानक गायब झाला होता. याची माहिती हॉस्टेल सहकार्यांनी त्याच्या पालकांना दिल्यानंतर, आईवडिलांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दिली होती. शेवटी शोधपथकाला शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता त्याचा मृतदेह डोंगरकपारीत आढळून आला, त्यामुळे हा घात कि अपघात अशी चर्चा आहे.

मूळचा गुवाहाटीचा असणारा श्रीनिवास चंद्रशेखर भोगराजू (२९) हा पवई येथील आयआयटीमध्ये शिक्षण घेत होता. त्याला भ्रमंती आणि ट्रेकिंगची आवड असल्याने सुट्टीच्या काळात तो हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मित्रांसोबत तर कधी कधी एकटाच ट्रेकिंग किंवा भ्रमंतीसाठी जात असे.

त्याच्या मित्रांनी पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार, ‘२५ ऑक्टोबरला श्रीनिवास एकटाच कर्जत येथील उंच डोंगर ‘ढाक’वर ट्रेकिंगसाठी सकाळी ७ वाजता निघून गेला होता. जेव्हा रात्री उशिरापर्यंत तो हॉस्टेलवर परतला नाही, तेव्हा त्याच्या सहकार्यांनी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. अखेर मित्रांनी त्याच्या आई-वडिलांना फोन करून ही माहिती दिली.’

आईवडिलांनी आपल्या नातेवाईकांना व शक्य असेल तेथे फोन करून मुलाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु काही उपयोग झाला नाही. अखेर तो कर्जतला फिरायला गेला होता या माहितीच्या आधारे त्यांनी तेथील पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग नोंद केली.

पोलिसांनी लगेच तपासी पथक पाठवून शोध सुरु केला, आदिवासी लोकांना त्याचे फोटो दाखवून माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशनला कळवण्यासाठी सांगण्यात आले. ट्रेकिंग करताना अपघात घडला असण्याची शक्यता पाहता त्या दृष्टीकोनातूनही तपास सुरु होता, परंतु सर्व काही निष्फळ ठरले. शेवटी तेथील दाट जंगलात तो रस्ता चुकून अडकून पडला असल्याची शक्यता पाहता पोलिसांनी जंगल भागात शोध सुरु केला होता.

११ डिसेंबरला स्थानिक आदिवासींना सांडशी येथील डोंगर कपारीत एक मृतदेह आढळून आला. पोलिसांना वर्दी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहा शेजारी एक काळी बॅग पडली होती. त्यात त्याचे ओळखपत्र, डेबिट कार्ड, टीशर्ट आढळून आले, ज्यावरून दीड महिन्यांपासून पोलीस ज्याचा शोध घेत आहेत तो श्रीनिवासच असल्याची खात्री झाली.

कर्जत पोलीस त्याच्या मृत्यूचे नक्की कारण काय आहे याचा शोध घेत आहेत.

   

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

One Response to आयआयटीच्या मुलाचा घात कि अपघात?

  1. Tushar Patil December 16, 2015 at 4:01 pm #

    त्याचीच मस्ती त्याला नडली असे मला वाटतेय.एकटा ट्रेकला जायची काय गरज होती. ते हि ढाक सारखा.
    तो हरवल्या नंतर किती तरी ट्रेकर्स ग्रुप त्याला शोधण्यासाठी गेले होते अक्खा ढाक बहिरीचा जंगल ढुंढालला होता त्यांनी किती दिवस सर्व बाजूने शोधत होते. आणी हा अचानक 45 दिवसाने कसा काय भेटला ते हि समजत नाही.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!