सकाळी रस्त्याने चालत जाणाऱ्या एका मासे विक्रेत्यास आयआयटी, चैतन्यनगर सर्कलवर कारने धडक देऊन जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत पवई पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवण्याच्या गुन्ह्यात गाडी चालक श्रीमती खंडेलवाल याना अटक केली असून, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआयटी फुलेनगर येथे राहणारे धिराव प्रसाद (६५) हे मासे विक्रीचा व्यवसाय करतात. शुक्रवारी सकाळी ते मासे विक्रीसाठी चैतन्यनगर येथून जात असताना, त्यांच्या पाठीमागून येणारी कार क्रमांक एमएच ०३ बीडब्लू १७०९ गाडीने त्यांना पाठीमागून धडक दिली. ज्यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित पवई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सदर घटनेत पवई पोलिसांनी भादंवि कलम 279, 338 नुसार गुन्हा नोंद करून घेत घटनेस कारणीभूत खंडेलवाल याना अटक केली असून, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
No comments yet.