आयआयटी कॅम्पसमध्ये प्रोफेसरच्या मुलीची आत्महत्या

बारावीच्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांना घेऊन चिंतीत असल्याने कॅम्पसमधील शिवालिक इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून केली आत्महत्या – पवई पोलीस

suicideयआयटी कॅम्पसमधील केंद्रीय विद्यालयात बारावीत शिकणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थिनीने कॅम्पसमध्येच असणाऱ्या शिवालिक इमारतीच्या १४व्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे वडील हे आयआयटीमध्ये प्रोफेसर असल्याचे बोलले जात आहे. सरोजा नांबियार (बदललेले अडनाव) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. पवई पोलिसांनी याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.

मंगळवारी रात्री ८.३० वाजता इमारतीजवळ असणाऱ्या सुरक्षारक्षकाने इमारतीच्या प्रांगणात काहीतरी पडल्याचा जोरदार आवाज ऐकला, ते पाहण्यासाठी गेला असता एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्याला दिसून आली. ज्याबाबत त्याने अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर, पवई पोलिसांनी तिला राजावाडी रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे जाण्यापूर्वीच तिचा मृत्य झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

“आत्महत्या करणाऱ्या मुलीचे वडील आयआयटीमध्ये प्रोफेसर असल्याने संपूर्ण परिवार कॅम्पसमध्येच असणाऱ्या ‘बि टाईप’ बंगल्यात राहत आहे. गेली काही महिने तिला बारावीच्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांना घेऊन ती चिंतीत होती, ज्यामुळे मंगळवारी तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे प्रथमर्शनी समोर येते आहे” असे आवर्तन पवईशी बोलताना नाव प्रसिद्ध न-करण्याच्या अटीवर पवई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

“परीक्षेत मिळणाऱ्या गुणांचा ताण तिच्यावर असला तरीही, तिच्या आत्महत्येमागे इतर काही कारण आहे का? याचा तपास आम्ही करत आहोत”, असे पोलीस निरीक्षक घावटे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कॅम्पसमध्ये घडलेली ही पहिली घटना नाही आहे. जानेवारी महिन्यात आयआयटी मधील प्राध्यापकाच्या २० वर्षीय मुलाने कॅम्पसमध्ये चाकूने भोकसून आत्महत्या केली होती. सोशल मीडियावरील त्याच्या एका पोस्टमुळे पालक आणि बहिणीसोबत झालेल्या वादानंतर या तरुणाने चाकूने भोकसून आयुष्य संपवले होते.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!