जयभिम  नगरमध्ये भीषण आग, वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचे हाल

@रविराज शिंदे

वईतील जयभीम नगर परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी पहाटे ४ वाजता घडली. सदर घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. मात्र, अतितापमान परिस्थितीत वीज खंडीत झाल्याने नागारिकांचे मात्र अतोनात  हाल झाले.

जयभीम नगर या डोंगराळ भागातील संपूर्ण परिसराला एमएसईबी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. ज्याचे ट्रान्सफॉर्मर परिसराच्या मुख्यप्रवेशद्वारावर बसविण्यात आले आहे. त्यामध्ये बिघाड होऊन शॉर्ट सर्किट झाल्याने बुधवारी पहाटे  स्फोट होत ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली.

स्थानिक रहिवाश्यांनी धावपळ करत आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आग आटोक्यात आली नाही. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या ३ गाड्यांचा मदतीने दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून, सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे अग्निशमक दलाकडून सांगण्यात आले.

घटना घडताच सुरक्षेचे उपाय म्हणून संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने नागरिकांचे मात्र ऐन उन्हाळ्यात अतोनात हाल झाले.

तब्बल १३ तासानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!