बुध्दिस्ट प्रेरणा ग्रुप आयआयटी, पवई विभागतर्फे ०८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधत “जागर नारी शक्तीचा” कार्यक्रमाचे आयोजन चंद्रमणी बुध्दविहार, माता रमाबाईनगर केले होते. यावेळी उपस्थित कवींनी महिलांचा आदर करणाऱ्या कविता सादर करून नारीचा गुणगौरव केला.
कार्यक्रमासाठी मुंबई शहरासह, पालघर, कल्याण, भिंवडी, पुणे येथील कवींनी उपस्थितीत राहून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमासाठी पार्श्वगायक अरविंद मोहीते, निवेदिका अर्चना अ.मोहीतेसह, बुध्दिस्ट प्रेरणा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे व सहकारी सुध्दा उपस्थित होते.
निवेदिका अर्चना मोहिते यांनी माता रमाई यांच्या जीवनावर बोलतानाच आजची महिला आणि महिला दिनाचे महत्त्व यावर विचार मांडले. पार्श्वगायक अरविंद मोहिते यांनी यावेळी त्यांचे सोन्या मोत्यांची माळ हे गीत सादर केले; तर अथर्व मोहिते यांनी महात्मा जोतिबा फुले यांचा पोवाडा सादर करुन प्रेक्षकांचे मन जिंकले.
या कार्यक्रमाला बौध्द विकास मंडळाचे कार्यकर्ते, बुध्दिस्ट प्रेरणा ग्रुपचे सदस्य, युथ पॉवरसंघटनेचे सदस्य यांच्यासह परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित लावली.
जागर करताना मंजू सराठे, हरिश्चंद्र धिवार, भट्टू जगदेव, बुध्दराज गवळी, प्रकाश वानखेडे, दादासाहेब यादव, सचिन कांबळे, नटराज मोरे, प्रतिक कांबळे आदी कवींनी आपल्या कविता सदर करून कार्यक्रमात रंगात आणली.
सुंदर कवी संमेलनाने जागर नारी शक्तीचा उत्कृष्ट पार पडला..
प्रतिकजी खूपच छान झालं कालच कवी सम्मेलन.
सुंदर कवी संमेलनाने जागर नारी शक्तीचा उत्कृष्ट पार पडला.