प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जुन्या ५०० आणि १००० रुपयाच्या ‘नोट बंदी’च्या घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनात पवईतील नागरिकांनी आज (शनिवारी) संध्याकाळी एका रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत मोठ्या प्रमाणात समाजातील विविध स्तरातील लोक सहभागी झाले होते.
“मोदीजी काले धन के सर्जिकल स्ट्राईक मे हम आपके साथ हैं”, “काळे धन के खिलाफ आप का संघर्ष वंदनीय हैं”, “मोदिजी काला धन साफ करो, हम आपके साथ हैं” अशा घोषणांनी आज पवई दुमदुमली. निमित्त होते ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जुन्या ५०० आणि १००० रुपयाच्या ‘नोट बंदी’च्या घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनात पवईतील नागरिकांनी काढलेली समर्थन रॅली.
या रॅलीला समर्थन देण्यासाठी विधान परिषद सदस्य व मुंबई उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष आर एन सिंह, मुंबई भाजपा उपाध्यक्ष अमरजित सिंह, उत्तर भारतीय संघ युवा मोर्चा अध्यक्ष संजय सिंह, एस बी गिरी, सि एन गर्ग, सि डी सिंह, एंथनी डिसुजा, विष्णू गावडे, मंदा चव्हाण, सदाशिव पाटील, गुरप्रीत सिंह, योगेश खन्ना आदि मान्यवरांसह मोठ्या प्रमाणात पवईकर उपस्थित होते.
‘खोट्या चलनाच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला ढिसाळ बनवणाऱ्या आणि ब्लॅक मनी साठवून ठेवणाऱ्या लोकांसाठी प्रधानमंत्री यांनी घेतलेला हा निर्णय एक चपराक आहे. त्यांच्या या निर्णयाचे भारताचा प्रत्येक सामान्य नागरिक समर्थन करतो. त्यांना समर्थन दाखवण्यासाठीच या रॅलीचे आयोजन केले गेले आहे’ असे यावेळी आवर्तन पवईशी बोलताना आर एन सिंह म्हणाले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.