पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कारची काच फोडून लॅपटॉप आणि आयपॅड चोरीस गेल्याची घटना काल पवईमध्ये घडली आहे. याबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे पार्किंगमध्ये गाड्या लावणाऱ्या मालक व चालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार हेमंतकुमार तरवरे हे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता पवईत कामानिमित्त आले होते. कामाच्या ठिकाणी त्यांनी आपली कार क्रमांक एमएच ०२ सीजी ९२३९ पार्किंगमध्ये पार्क करून ठेवली होती. दुपारी काम आटोपून परत निघण्यासाठी ते जेव्हा आपल्या कार जवळ आले, तेव्हा पाहतात तर काय कारची काच फोडून कारमध्ये ठेवलेला लॅपटॉप व आयपॅड चोरीस गेला होता. याबाबत त्यांनी त्वरित पवई पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.
याबत बोलताना पोलीस उप निरीक्षक तुषार गरुड यांनी सांगितले, ‘पार्किंगमधील सुरक्षाव्यवस्थेच्या कमीचा फायदा उठवत चोरट्याने चोरी केली आहे. नजर ठेवून प्रथम त्याने कारच्या डाव्या बाजूकडील काचेला आघात करून, फोडून त्यातून लॅपटॉप व आयपॅड चोरी केले आहे. याबाबत आम्ही भादवी कलम ३७९, ४२७ नुसार गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.’
पवई परिसरात घडलेली ही पहिली घटना नसून, या पूर्वीही कारची काच फोडून कारमधून लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल व किमती वस्तू चोरी होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. विशेषतः हिरानंदानी भागात अशा प्रकारच्या अनेक घटना घडत असतात. ज्याला पाहता हिरानंदानी समूहातर्फे एसटीएफ आणि पवई पोलिसांच्यावतीने विशेष पोलिस पथक अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी परिसरात तैनात आहेत. परिणाम स्वरूप असे गुन्हे करणारे अनेक चोरटे पकडले सुद्धा गेले आहेत. मात्र शुक्रवारी घडलेल्या गुन्ह्यामुळे परिसरात पुन्हा एकदा एक नवीन गॅंग कार्यरत झाली असल्याने पार्किंगमध्ये गाड्या लावणाऱ्या मालक व चालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
No comments yet.