पवईमध्ये अपघात सत्र, वेगवेगळ्या ३ अपघातात तिघांचा मृत्यू

series accidentवईच्या रस्त्यांवर गुरुवारी रात्री ७ पासून शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ३ वेगवेगळे अपघात घडले. या तिन्ही अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या ३ तरुणांचा गाडीखाली येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवण्याच्या गुन्ह्यात अपघातास जबाबदार वाहनचालकांना अटक केली आहे.

गुरुवारची रात्र ही पवईतील रस्त्यांसाठी काळरात्र ठरली. रात्री ७ ते सकाळी ७ या वेळेत पवईच्या विविध तीन प्रमुख रस्त्यांवर झालेल्या अपघातात ३ तरुणांचा मृत्यू झाल्याने पवईमध्ये एकच खळबळ माजली होती.

पहिल्या अपघातात मरोळ येथे दुचाकी दुरुस्तीचे काम करणारा मोहम्मद आरिफ मोहम्मद तोसीफ शेख (२२), त्याच्याकडे दुरुस्तीसाठी आलेली मोटरसायकल पीबी ०२ एएच ६९६६ दुरुस्त झाल्यावर त्याची पाहणी करण्यासाठी साकी-विहार रोडवर आला होता. तो परतत असताना चांदिवली चौकातील आंबेडकर वाचनालयाजवळ त्याच्या पाठीमागून येणारा ट्रूक क्रमांक एमएच ०४ ईवाय ५८३६ याने जोरदार धडक दिल्याने तो गाडीवरून लांब उडून पडला व त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पवई पोलिसांनी त्याला राजावाडी रूग्णालय येथे नेले असता, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या गुन्ह्यात ट्रूक चालक निसार खान (३३) याला भादंवी कलम २७९, ३०४ (अ) सह मोटरवाहन कायदा १३४ (अ) (ब) तहत अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या अपघातात, गुरुवारी रात्री ११.१५ वाजता, स्थानिक भागात हॉटेलमध्ये काम करणारा मोहम्मद नोमान शेख (२२), आपले काम संपवून मोटरसायकल क्रमांक एमएच ०२ बीजी ६३९३ वरून जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड मार्गे जोगेश्वरीच्या दिशेने जात होता. मिलिंदनगर येथील सिग्नलवरून जात असताना रस्ता पार करत असणाऱ्या लोकांना पाहून त्याने आपल्या गाडीचा वेग कमी केला, त्याचवेळी त्याच्या पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रूक क्रमांक एमएच ०४ ईएल ८३८ च्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि शेखच्या गाडीला जोरदार टक्कर दिल्याने तो खाली पडला व त्याच्या डोक्यावरून ट्रूकचे पाठीमागील चाक गेल्याने तो गंभीररित्या जखमी झाला.

शेखला राजावाडी रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर जनतेच्या माराच्या भीतीने पळून गेलेला ट्रूक चालक शुक्रवारी सकाळपर्यंत पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

शुक्रवारी सकाळी घडलेल्या तिसऱ्या अपघातात, मिलिंद नगर येथे राहणारे केशव जाधव (६६) यांना एका अज्ञात वाहनाने उडवून गेल्याची घटना घडली आहे. राजावाडी रुग्णालयाला आणण्यापूर्वी त्यांचाही मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

  

, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!