पवई ते साकीनाका मेट्रो एसी बस सेवा सुरु

साकीनाका मेट्रो स्थानक, साकीविहार रोड, बूमरैंग, चांदिवली फार्म रोड, लेक होम, जलवायू विहार, हिरानंदानी केसिंगटन, डी-मार्ट, गलेरिया मार्गे बीजी हाउस अशा ५ किमी मार्गावरून ही बस सेवा आहे.

CityFloवईमध्ये कामासाठी येणाऱ्या लोकांसाठी व पवईमधून इतर भागात कामासाठी जाणाऱ्या लोकांच्या सेवेसाठी सिटीफ्लो तर्फे साकीनाका मेट्रो स्थानक ते पवई अशी नवीन बस सेवा सुरु करण्यात आली आहे. साकीविहार रोड, चांदिवली मार्गे हिरानंदानीपर्यंत ही सेवा असणार आहे. या भागात कामासाठी येणाऱ्या लोकांना रिक्षावाल्यांचे भाडे नाकारणे, तासनतास वाहनांची वाट बघत बसणे व प्रवाशांची बस मधील गर्दी यातून सुटका झाली आहे. मोबाईल ऍपच्या माध्यमातून ७ दिवस आधीपासून आपल्या प्रवासासाठी तिकीट बुक करता येणार आहे.

आयआयटीच्या माजी-विद्यार्थ्यांनी शहरी भागात कामानिमित्त घरातून बाहेर पडणाऱ्या लोकांचे प्रवासात होणारी दुरवस्था पाहता, सिटीफ्लोची निर्मिती करून याच मार्गांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रवाशांना छोट्या छोट्या प्रवासासाठी वातानुकुलीत बस सेवा सुरु केली. यामध्ये पुढचे पाऊल टाकत मेट्रोने साकीनाका स्थानक आणि पुढे विविध मार्गाने पवईमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांसाठी मेट्रोसोबत करार करत सिटीफ्लो २५ सिट मिनीबसच्या माध्यमातून शटल सेवा सुरु केली आहे.

Screenshotबस मार्ग: साकीनाका मेट्रो स्थानक, साकीविहार रोड, बूमरैंग, चांदिवली फार्म रोड, लेक होम, जलवायू विहार, हिरानंदानी केसिंगटन, डी-मार्ट, गलेरिया मार्गे बीजी हाउस अशा ५ किमी मार्गावरून ही बस सेवा आहे.

बस वेळ: साकीनाका ते पवई – सकाळी ९.५० ते ११.५० पर्यंत, दुपारी: २.३० ते ५.१० पर्यंत. पवई ते साकीनाका – सकाळी ९.५० ते १२.३० पर्यंत, दुपारी: ३.१० ते ५.१० पर्यंत.

या सुविधेमुळे पवईत कामानिमित्त येणाऱ्या अनेक लोकांचे प्रश्न मिटले आहेत. त्यांच्या मते तासनतास वाहनाची वाट बघत बसणे, रिक्षावाल्यांना कराव्या लागणाऱ्या विनवण्या यापासून आमची पूर्ण सुटका झालेली आहे. १५ – २० रुपयात वातानुकुलीत बसमधून होणारा प्रवास हा नक्कीच परवडणारा ठरत आहे. मुळात सकाळी ऑफिस काळात प्रवाशांची बरीच गर्दी बेस्ट बसमध्ये असते, त्या गर्दीतून खास करून सुटका मिळाली आहे. शिवाय बस सेवेची वेळ ही सर्वांना सोयीस्कर अशीच असल्याने अनेक प्रवासी आता रिक्षा आणि खाजगी वाहनांना बगल देत सिटीफ्लोची सेवेचा लाभ घेत आहेत.

पवईमधून इतर भागात असणाऱ्या सुविधा: पवई ते बोरीवली, पवई ते ठाणे

पवईमधून भविष्यात सुरु होणाऱ्या सुविधा: पवई ते नवीमुंबई, पवई ते बीकेसी, पवई ते मिरा-भायंदर

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!