बिहार येथील एका २५ वर्षीय तरुणाने साकीनाका मेट्रो स्थानकात मेट्रोसमोर येऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ९.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. मेट्रोच्या समोर आत्महत्येची ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे सेवा बराचकाळ विस्कळीत झाली होती. मात्र, काही तासाच्या खोळंब्यानंतर हळूहळू सेवा पूर्वपदावर आली. बिहारच्या मधुबनी येथील उदय कुमार मिश्रा (२५) हा सकाळी ९.२० वाजता घाटकोपरकडे जाणारी […]


