पवईकर, भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर असल्याच्या संशयात पाकिस्तानने अटक केली आहे. भारतावर दबाव वाढवण्यासाठी कुलभूषण जाधव ‘रॉ’चे एजंट असल्याची व बलुचिस्तानमधील दहशतवादी, फुटीरतावादी व भारतीय गुप्तचर संघटना यांच्यात माहितीची देवाण घेवाणीचे काम करण्यात सहभाग असल्याची कबुली देत असलेली ध्वनीचित्रफित पाकिस्तान सरकार आणि लष्कराने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जारी केली आहे. मात्र भारत सरकारने पाकच्या या ध्वनीचित्रफितीची सत्यता आणि त्यात करण्यात आलेले आरोप पूर्णपणे नाकारले आहेत. सर्व गोष्टींची सत्यता पडताळण्यासाठी भारतीय उच्चायुक्तांना कुलभूषण यांची भेट घेण्याची मागणी भारताने केली आहे. मात्र पाकिस्तानने ती फेटाळून लावली आहे.
ध्वनीचित्रफीत पाहण्यासाठी येथे क्लिक करानौदलातील माजी अधिकारी आणि व्यावसायिक कुलभूषण जाधव यांना काही दिवसांपूर्वी बलूचिस्तान येथून अटक करण्यात आली आहे. भारतीय हेर असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याचप्रमाणे पाकने भारतावर ‘स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम’ पसरवण्याचा आरोप सुद्धा केला आहे.
पाकिस्तान लष्कराच्या आंतरसेवा जनसंपर्क प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम बाजवा व प्रांतिक माहिती मंत्री परवेझ रशीद यांनी एकत्रित पाकिस्तानमध्ये पत्रकार परिषद घेऊन, कुलभूषण जाधव यांच्या कबुलीनाम्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
यावेळी पाकिस्तानी पत्रकारांशी बोलताना रशीद यांनी सांगितले “बलुचिस्तान मध्ये रॉसाठी काम केल्याचे कुलभूषण जाधव यांनी कबूल केले आहे. जाधव भारतीय नौदलाचे सर्व्हिग अधिकारी आहेत. ते रॉच्या प्रमुखाला रिपोर्ट करत होते, ते राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनएसए) संपर्कात सुद्धा होते.”
“मी भारतीय नौदलाचा अधिकारी असून, २०२२ मध्ये सेवानिवृत्त होणार आहे. १४ वर्षाच्या सेवेनंतर २००२ पासून मी भारतातूनच गुप्त अभियाने सुरु केली, यासाठी मी हुसेन मुबारक पटेल हे नाव वापरतो. २००३ मध्ये मी इराणच्या चबाहारमध्ये एक छोटा उद्योग सुरु केला. मी काय करतोय हे कोणाच्याही लक्षात येत नव्हते. २००३-२००४ दरम्यान मी कराची दौरा केला. काही काळ रॉसाठी काम केल्यानंतर २०१३ मध्ये मी त्यात सहभागी झालो’, अशी कबुली कुलभूषण जाधव व्हिडीओमध्ये देताना दिसत आहेत.
भारत सरकारने या बाबत प्रतिउत्तर देताना ‘कुलभूषण हे ‘रॉ’चे एजंट नसून, त्यांचे इराणमधून अपहरण केले आहे. पाकिस्तानने जारी केलेली चित्रफित आम्ही पाहिली आहे, यातील मते वैयक्तिक व सत्य स्थितीवर आधारित नसल्याचे स्पष्ट होत आहे. दहशतवादी हल्ले आणि पठाणकोट हल्याच्या चौकशीवरून लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तानचे हे कारस्थान आहे. जाधव यांच्याशी उच्चायुक्तांना भेटू दिले जात नाही आहे, यावरून पाकिस्तानचे हे सगळे दावे आरोप पूर्णतः खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावून सांगितले आहे.
फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.