पवईत गांजा, ड्रग्स, मद्यप्राशन करून सामान्य नागरिकांना त्रास देणारी टोळी सक्रीय झाली आहे. या टोळीने संपूर्ण पवईला हैराण केले आहे. यांच्या विरोधात नागरिक आणि पोलीस सहकार्याने कसा आळा बसेल या विषयाला घेवून आज दुर्गादेवी शर्मा उद्यान, आयआयटी पवई येथे संध्याकाळी ८ वाजता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई म्हाडेश्वर यावेळी मार्गदर्शन करतील.
गांजाडी, गर्दुले, नशेखोर लोकांच्या टोळींनी पवई परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अराजकता माजवली आहे. यामुळे पवईत अशांतता पसरली असून, गुन्हेगारी प्रकरणांमध्ये भयंकर वाढ झाली आहे. रविवारी नशेत बेधुंद लोकांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी चैतन्यनगर येथे ५ तरूणांवर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पवई परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिक आता घरातून बाहेर निघायला सुद्धा घाबरत आहेत.
हे पाहता नागरिकांच्या मधील अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची भीती नष्ट व्हावी. जनता आणि पोलीस यांच्या सहकार्याने अशा लोकांना चांगलाच धडा शिकवला जावा, या उद्देशाने सायंकाळी ८ वाजता दुर्गादेवी उद्यान, गोखले नगर आयआयटी येथे पवई पोलिसांकडून जनजागृती आणि मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले गेले आहे. यावेळी पवई पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई महाडेश्वर हे मार्गदर्शन करणार आहेत.
तरी पवईतील सर्व नागरिकांनी या शिबीरात उपस्थित रहावे असे आवाहन पवई पोलिस ठाणे व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.