लोकलमधून पडून पवईतील तरुणाचा मृत्यू

मुंबईच्या जीवनवाहिनीचा तिसरा बळी, कोपर-डोंबिवली दरम्यान घडली घटना

आयआयटी l  रविराज शिंदे

ashishमुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या लोकलच्या गर्दीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून निष्पाप मुंबईकरांना यामुळे निष्कारण बळी पडावं लागत आहे. भावेश नकाते, नितीन चव्हाण या दोन तरूणांचा लोकलच्या गर्दीमुळे लटकत जाताना पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आपल्या मित्रांसोबत कल्याण येथे  फिरायला गेलेल्या पवईतील १७ वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची दुखद घटना काल सायंकाळी कोपर ते डोंबिवली दरम्यान घडली.

आशिष शंकर शेणे असे या तरूणाचे नाव असून, तो पवईमधील महात्मा फुलेनगर येथे राहत होता. भवन्स महाविद्यालयात शिकणारा आशिष गुरुवारी मित्रांसोबत कल्याण येथे फिरावयास गेलेला होता. संध्याकाळी ५.३० च्या दरम्यान फास्ट लोकलने घरी परतीचा प्रवास करत असताना डोंबिवली स्टेशन नंतर त्याला तुफान गर्दीला सामोरे जावे लागल्याने त्याने जवळपास लटकतच प्रवास सुरु ठेवला. कोपर स्टेशन येण्यापूर्वी लटकत असणाऱ्या आशिषला एका खांबाचा फटका लागल्याने तो बाहेर फेकला गेला आणि जखमी झाला.

मित्रांनी तात्काळ कोपर स्टेशनवर उतरून याबाबतची माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांच्या साहय्याने आशिषला डोंबिवली शास्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.

सदर घटनेमुळे लोकलमधील प्रवाशांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, लोकलमधील प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!