@संजय पाटील
तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचे प्रमाण कमी होत आहे. जे पाहता विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या बीएमएम विभागाने ‘पुस्तोकोत्सवाचे’ आयोजन केले आहे. या पुस्तोकोत्सवाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते होणार आहे.
चित्रशताब्दी, जत्रा, बायोस्कोप, माध्यमगड अशा संकल्पना घेऊन गेल्या काही वर्षात माध्यम महोत्सव यशस्वीरित्या पार पडला आहे. यावर्षी सुद्धा माध्यम महोत्सव ‘पुस्तोकोत्सव’ या संकल्पनेवर आधारीत आहे.
१५, १६, १७ डिसेंबर रोजी साठ्ये महाविद्यालयात पुस्तोकोत्सव भरवण्यात येणार आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांना ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्याशी संवाद साधता येईल. ‘करर्म इन्फ्रास्ट्रॅक्टर’ हे या पुस्तोकोत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत.
पुस्तोकोत्सवाच्या निमित्ताने नामवंत प्रकाशकांची पुस्तक येथे उपलब्ध होणार आहेत. ज्यात मेहता, प्रसाद, प्रथम, डायमंड, मनोविकास, परममित्र व टार्गेट सारख्या प्रकाशंकांचा समावेश आहे.
पुस्तोकोत्सवाच्या बरोबरीनेच चर्चासत्र, व्याख्यान अशा दर्जेदार कार्यक्रमांच आयोजन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी अनेकविध स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.
भारतीय साहित्यात महत्वाचे योगदान दिलेल्या साहित्यिकांची ओळख करून देण्यासाठी पोस्टरचे स्वतंत्र दालन हे या महोत्सवाचे एक प्रमुख वैशिष्ट्य असेल.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.