हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पडून चिमुरडी जखमी, मृत्यूशी देतेय झुंज

asdवईतील एका नामांकित हॉटेलमध्ये साडेसहा वर्षाची चिमुरडी शुक्रवारी स्विमिंग पूलमध्ये पडून गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या हिरानंदानी रुग्णालयात उपचार चालू असून, ती अत्यावस्थेत असल्याबद्दल बोलले जात आहे. याबाबत नातेवाईकांनी हॉटेल प्रशासन विरोधात कोणत्याही प्रकरचा गुन्हा दाखल केला नसून, आम्ही अधिक तपास करत असल्याचे पवई पोलिसांनी सांगितले.

मध्यप्रदेशची असणारी आस्था रमानी ही एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आपल्या परिवारासोबत मुंबईमध्ये आली आहे. शुक्रवारी पवईतील एका नामांकित हॉटेलमध्ये लग्न समारंभ चालू असताना आस्था स्विमिंग पूल भागात इतर मुलांसोबत खेळत होती. खेळताना अचानक ती स्विमिंग पूलमध्ये पडली आणि गंभीररित्या जखमी होऊन बेशुद्ध पडली. डॉक्टर असणाऱ्या नातेवाईकांनी लगेच प्रथमोपचार सुरु केले, परंतु त्याने जास्त काही फरक पडत नसल्याने, रुग्णवाहिका बोलावून तिला सीपीआर देत हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे तिच्या पालकांनी पोलीस जवाबात म्हटले आहे.

याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले, “डॉक्टरांच्या नुसार मुलीला हॉस्पिटलमध्ये आणले तेव्हा तिच्या हृदयाची हालचाल थांबलेली होती. तिला सीपीआर देत हॉस्पिटल पर्यंत आणलेले होते, ज्यानंतर लगेचच तिला वेंटीलेटरवर टाकून उपचार सुरु करण्यात आले असून मुलगी अत्यावस्थेत आहे.”

ते पुढे म्हणाले, “नक्की अपघात कशामुळे झाला आहे हे कोणासच माहिती नाही. नातेवाईक किंवा पालकांकडून हॉटेल विरोधात कोणतीही तक्रार नोंदवली गेली नाही. आम्ही अधिक तपास करत आहोत.”

हॉटेल प्रशासनाने माध्यमांशी बोलताना याबाबत दिलगिरी व्यक्त करत ‘आम्ही पोलीस तपास, नातेवाईक, आणि रूग्णालय सर्वाना आवश्यक ती सर्व मदत करत असून, मुलीच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहोत’ असे सांगितले.

  

, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!