पवईत तीन दिवसात २८ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

मंगळवार २६ मे रोजी ३, बुधवार २७ मे रोजी ९ तर गुरुवार २८ मे रोजी १६ कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) मिळून आले आहेत.पवई (Powai) परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह बाधितांचा आकडा २७० वर पोहचला असून, पाठीमागील तीन दिवसात यात २८ बाधितांची भर पडली आहे. यात मंगळवार २६ मे रोजी ३, बुधवार २७ मे रोजी ९ तर गुरुवार २८ मे रोजी १६ कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) मिळून आले आहेत. एका बाजूला पवईतील बाधितांचा कोरोनामुक्त होत रिकवरी रेट वाढत असतानाच मोठ्या प्रमाणात वाढणारी बाधितांची संख्या हा पवईकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. कधी चाळसदृश्य तर कधी इमारत भाग असा कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) मिळण्याचा पाठशिवणीचा खेळ आता थांबला असून, दोन्ही भागातही बाधित मिळू लागले आहेत.

मंगळवार २६ मे

या दिवशी मिळालेले तिन बाधित हे आयआयटी मार्केटजवळील चाळसदृश्य परिसरातील आहेत. गरीबनगर येथील बुद्धविहार जवळील भागात राहणारे ५१ वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील ४९ वर्षीय पुरुष, तर माता रमाबाई आंबेडकर नगर-२ येथील ४३ वर्षीय पुरुष यांचा यात समावेश आहे.  माता रमाबाई आंबेडकर नगर येथील बाधित तिथे राहत नसून, दुसरीकडे राहण्यास गेल्याची शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

बुधवार २७ मे

बुधवारी आयआयटी मार्केट जवळील गरीबनगर भागात ६१ वर्षीय महिला आणि ७३ वर्षीय महिला बाधित असल्याचे समोर आले आहे. यातील ७३ वर्षीय महिला भांडूप येथे शिफ्ट झाली असून, रुग्णालयात उपचार घेत आहे. गणेशनगर (पंचकुटीर) येथे सुद्धा याच दिवशी २ बाधितांची नोंद झाली असून, यात ६२ वर्षीय आणि ५८ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. टाटा पॉवर कॉलोनी येथील एका ७२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचेही समोर आले आहे.

मंगळवार २६ मे रोजी ३, बुधवार २७ मे रोजी ९ तर गुरुवार २८ मे रोजी १६ कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) मिळून आले आहेत.याच दिवशी हिरानंदानी येथील एक ५१ वर्षीय महिला, मिलिंद नगर येथील ६० वर्षीय पुरुष आणि साकीविहार येथील ४९ वर्षीय पुरुष यांचा अहवाल सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तसेच तिरंदाज व्हिलेज येथील ५८ वर्षीय महिलेला सुद्धा या विषाणूंचा संसर्ग झाला असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.

गुरुवार २८ मे

गुरुवारी बाधितांमध्ये मोठी वाढ पहायला मिळाली एकाच दिवसात पवईतील विविध परिसरात १६ बाधितांची नोंद झाली. ज्यात आरे कॉलोनी रोडवर असणाऱ्या वस्तींमध्ये ६६ वर्षीय पुरुष आणि ६५ वर्षीय महिला बाधित असल्याचे समोर आले. चैतन्यनगर येथील ३१ वर्षीय पुरुष आणि ६५ वर्षीय पुरुष यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आयआयटी मार्केट जवळील गरीबनगर भागातील ५० वर्षीय महिलेसह एकाच कुटुंबातील दोघे (५५ वर्षीय पुरुष आणि ५० वर्षीय महिला) यांना कोरोनाची लागण झाली आहे. गणेशनगर येथील २५ वर्षीय तरुण, मिलिंदनगर येथील ५५ वर्षीय पुरुष आणि लेकहोम येथील एका इमारतीतील एकविसाव्या माळ्यावर राहणारी व्यक्ती कोरोना बाधित मिळून आली आहे. तुंगागाव येथील ४० आणि ६५ वर्षीय पुरुष, साकीविहार रोडवरील इमारत भागात राहणारे ५९ वर्षीय पुरुष आणि ६२ वर्षीय महिला यांना सुद्धा संसर्ग झाला आहे. तसेच आयआयटी मेनगेट समोरील भवानी टॉवर येथील ६५ वर्षीय महिला आणि गौतमनगर येथील ३३ वर्षीय पुरुष यांचे अहवाल सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

मंगळवार २६ मे रोजी ३, बुधवार २७ मे रोजी ९ तर गुरुवार २८ मे रोजी १६ कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) मिळून आले आहेत.या २८ बाधितांमुळे पवईतील बाधितांची संख्या २७० झाली असून, पालिकेच्या नोंदीनुसार यातील १०५ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. १० लोकांचा मृत्यू झाला असून, इतर १५५ बाधितांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत.

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामट्विटरयूट्यूबवर फॉलो करू शकता.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!